कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा परिषदेची निवडणूक लागणार आहे. या पार्श्वभूमीवर अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. ग्रामविकास विभागाने यासंबंधीची अधिसूचना नुकतीच काढली आहे. (Kolhapur ZP reservation)
सर्वसाधारण महिलेसाठी अध्यक्षपद राखीव झाल्यामुळे जिल्ह्यातील दिग्गज नेतेमंडळींची त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू होणार आहे. (Kolhapur ZP reservation)
कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदारसंघाची प्रारुप रचना जाहीर झाली. जिल्हा परिषदेच्या मतदार संघात एक गणाने वाढ झाली आहे. आता जिल्हा परिषदेचे ६८ गण असणार आहेत. यापूर्वी ६७ गण होते. तसेच पंचायत समितीसाठी १३६ गण असणार आहेत. अनेक गावांची अदलाबदल झाल्याने निवडणूकीचे गणित बदलणार असून त्यादृष्टीने राजकीय पक्षांना आखणी करावी लागणार आहे. (Kolhapur ZP reservation)
गेल्या जिल्हा परिषद निवडणूकीनंतर हुपरी, शिरोळ, आजरा, हातकणंगले या पाच नगरपालिका आणि नगपंचायती झाल्या आहेत. यातील क्षेत्र वगळून नव्याने जिल्हा परिषद आणि पंचायत प्रभाग रचना करण्यात आली आहे. आता या प्रभाग रचनेचा विषयही न्यायालयात गेला आहे.
ठाणे, कोल्हापूर, सांगली, लातूर, अमरावती, गोंदिया, गडचिरोली या जि. पं.चे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठीतर पुणे, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, यवतमाळचे अध्यक्षपद सर्वसाधारणसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
राज्यातील अन्य जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचे आरक्षणही जाहीर करण्यात आले आहे. ते असे :
जि.प. आणि पडलेले आरक्षण
१.ठाणे – सर्वसाधारण (महिला)
२.पालघर – अनुसुसूचित जमाती
३. रायगड- सर्वसाधारण
४.रत्नागिरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
५.सिंधुदुर्ग – सर्वसाधारण
६.नाशिक – सर्वसाधारण
७.धुळे – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
८.नंदूरबार- अनुसूचित जमाती
९.जळगांव – सर्वसाधारण
१०.अहिल्यानगर अनुसूचित जमाती (महिला)
११.पुणे – सर्वसाधारण
१२.सातारा- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
१३.सांगली – सर्वसाधारण (महिला)
१४.सोलापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
१५.कोल्हापूर- सर्वसाधारण (महिला)
१६.छत्रपती संभाजीनगर -सर्वसाधारण
१७.जालना – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
१८.बीड – अनुसूचित जाती (महिला)
१९.हिंगोली -अनुसूचित जाती
२० नांदेड – नागरिकांचा मागास प्रवर्ग
२१.धाराशिव – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
२२.लातूर – सर्वसाधारण (महिला)
२३.अमरावती – सर्वसाधारण (महिला)
२४.अकोला – अनुसूचित जमाती (महिला)
२५.परभणी – अनुसूचित जाती
२६.वाशिम अनुसूचित जमाती (महिला)
२७. बुलढाणा -सर्वसाधारण
२८.यवतमाळ सर्वसाधारण
२९.नागपूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
३०.वर्धा- अनुसूचित जाती
३१.भंडारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग
३२.गोंदिया – सर्वसाधारण (महिला)
३३.चंद्रपूर – अनुसूचित जाती (महिला)३४.गडचिरोली – सर्वसाधारण (महिला)