Home » Blog » Opposition attacks Mahayuti: महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री आहे का?

Opposition attacks Mahayuti: महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री आहे का?

महिला वकिलाला झालेल्या मारहाणीवरून महायुती सरकारवर टीकेची झोड

by प्रतिनिधी
0 comments
Opposition attacks on Mahayuti

मुंबई : बीडमधील अंबाजोगाई तालुक्यातील एका महिलेला सरपंच आणि त्याच्या समर्थकांनी केलेल्या मारहाणीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात टीकेची राळ उडवून दिली आहे. महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री आहे का, असा सवाल करत असेल तर संबंधित आरोपींना तत्काळ अटक करा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटानेही महायुती सरकारवर जोरदार टीका केली.(Opposition attacks on Mahayuti)

एका वकील महिलेला संरक्षण नसेल, तर सामान्य महिलांचे काय, असा प्रश्न उपस्थित करून प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री असेल तर प्रशासनाने तत्काळ दोषींवर गुन्हा दाखल करावा, आरोपींना अटक करावी तसेच त्यांना कठोर शासन करावी.

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या एका महिलेने गावातील ध्वनिप्रदूषणाविरोधात कार्यालयीन तक्रार केली. या कारणावरून सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी शेतात नेऊन बेदम मारहाण केली. काठ्या आणि लोखंडी पाईपने जबर मारहाण केली. त्यामुळे ती बेशुद्ध पडली. नंतर तिला केवळ एका रात्रीत रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. महिलांच्या सुरक्षिततेबाबत सरकारची काय भूमिका आहे,  ते यातून दिसते, अशी टीकाही सपकाळ यांनी केली आहे. (Opposition attacks on Mahayuti)

महाराष्ट्र बिहारच्याही पुढे : रोहिणी खडसे

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते ॲड. जितेंद्र आव्हाड यांच्यासह महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनीही महायुती सरकारच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे. यासंबंधी ‘एक्स’वर पोस्ट करत राग व्यक्त केला.‘‘मुख्यमंत्री महोदय हे फोटो पहा आणि तुम्हाला झोप कशी लागते ते सांगा? डीजेच्या आवाजाचा त्रास होत असल्याने तक्रार केल्याने एका महिला वकिलाला सरपंचाने कार्यकर्त्यांसह मिळून बेदम मारहाण केली. ही घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील एका गावात घडली आहे. लाठ्या-काठ्या आणि पाईपच्या मदतीने केलेल्या या मारहाणीत महिला वकील जबर जखमी झाल्या आहेत. वकील महिलेला जर मारहाण होत असेल तर या राज्यात कायद्याचा धाक किती आहे हे दिसून येते. या घटनेमुळे महाराष्ट्र बिहारच्याही पुढे गेलाय, असे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे,’’ अशी टीका करत त्यांनी गृहमंत्रालयाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले.

घटना काय?
बीड जिल्ह्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर तेथील गुन्हेगारीच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. डीजेच्या आवाजाचा त्रास होत असल्याची तक्रार केल्यामुळे एका महिला वकिलाला गावच्या सरपंचाने कार्यकर्त्यांसोबत मिळून बेदम मारहाण केली. ही घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात घडली. लाठ्या काठ्या आणि पाईपच्या मदतीने ही मारहाण झाल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे. मारहाणीने तिची पाठ काळी निळी झाली आहे. तसे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यावरून महायुती सरकारवर टीकेचे झोड उठली आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00