Home » Blog » NEET-PG Exam: नीट-पीजी परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घ्या

NEET-PG Exam: नीट-पीजी परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घ्या

by प्रतिनिधी
0 comments
NEET-PG Exam

नवी दिल्ली : नीट-पीजी २०२५ परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेऊ नये, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय परीक्षा मंडळाला शुक्रवारी (३० मे) दिले. दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेतल्यास मनमानी निर्माण होईल असे निरीक्षणही कोर्टाने नोंदवले. (NEET-PG Exam)

राष्ट्रीय परीक्षा मंडळाच्या (NBE) NEET-PG २०२५ दोन शिफ्टमध्ये घेण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती एन.व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.

पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी नीट-पीजी २०२५ एकाच शिफ्टमध्ये घेण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश न्यायालयाने एनबीईला दिले. १५ जून रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी आवश्यक व्यवस्था करण्यासाठी अजूनही वेळ शिल्लक असल्याचे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले.(NEET-PG Exam)

‘‘दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेतल्याने मनमानी निर्माण होते. त्यामुळे सर्व उमेदवार एकाच पातळीवर राहत नाहीत. कोणत्याही दोन प्रश्नपत्रिका कधीही एकाच पातळीच्या अडचणीच्या किंवा सोप्या असल्याचे म्हणता येणार नाही. त्यात फरक असला पाहिजे’’, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यासाठी पुरेशी केंद्रे नसल्याचा एनबीईचा युक्तिवाद फेटाळून लावताना, ‘‘परीक्षा फक्त एका शहरात नाही तर संपूर्ण देशात घेतली पाहिजे. या देशातील तांत्रिक प्रगती लक्षात घेता, परीक्षा मंडळाला एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यासाठी पुरेशी केंद्रे सापडली नाहीत हे मान्य करण्यास आम्ही तयार नाही,’’ असे न्यायालयाने म्हटले आहे.

या वर्षीची परीक्षा १५ जून २०२५ रोजी होणार आहे. एका शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यासाठी केंद्रे निवडण्यासाठी परीक्षा मंडळाला अद्याप दोन आठवड्यांपेक्षा जास्त वेळ आहे.(NEET-PG Exam)

त्यानुसार आम्ही प्रतिवादींना एका शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यासाठी पुढील व्यवस्था करण्याचे आणि पूर्ण पारदर्शकता राखली जाईल आणि सुरक्षित केंद्रे निवडली जातील याची खात्री करण्याचे निर्देश देतो, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

न्यायालयाने आपल्या आदेशात याचिकाकर्त्यांची तक्रारही नोंदवली : ‘‘दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेतल्याने मनमानी होते आणि समान संधी मिळू शकत नाही. दोन शिफ्टमधील प्रश्नपत्रिका कधीही समान काठिण्य पातळीच्या असू शकत नाहीत. गेल्या वर्षी त्या टप्प्यातील तथ्ये आणि परिस्थिती पाहता ती दोन शिफ्टमध्ये घेण्यात आली असावी. परंतु परीक्षा मंडळाने एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्याची व्यवस्था करण्याचा विचार करायला हवा होता,’’

हेही वाचा :
पंतप्रधानांना टॅरिफ हवा आहे, टॅरिफवर चर्चा नको : काँग्रेस
अमेरिकन न्यायालयाकडून ‘टेरिफ’ बेकायदेशीर

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00