Home » Blog » Revanth Reddy : आपण किती राफेल विमाने गमावली? : रेवंत रेड्डी

Revanth Reddy : आपण किती राफेल विमाने गमावली? : रेवंत रेड्डी

by प्रतिनिधी
0 comments
Revanth Reddy

हैद्राबाद : तेलगंनाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी भाजपच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन सिंदूरच्या हाताळणीवर जोरदार टीका केली. पाकिस्तानसोबात अचानक झालेल्या युद्धबंदीवर आणि पारदर्शकतेच्या अभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सशस्त्र दलाच्या सन्मानार्थ आयोजित रॅलीला संबोधित करताना रेड्डी यांनी केंद्रावर एकतर्फी दृष्टीकोन असल्याचा आरोप केला. आपण किती राफेल विमाने गमावली? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. (Revanth Reddy)

पाकिस्तानसोबत युद्धबंदीची घोषणा करण्यापूर्वी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात अपयशी ठरल्याबद्दल मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी गुरुवारी भाजपाप्रणित एनडीए सरकारवर तीव्र हल्ला चढवला .त्यांनी केंद्राच्या एकतर्फी दृष्टिकोनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि अलिकडच्या लष्करी सहभागाचे व्यवस्थापन करण्यात रणनीती, धैर्य आणि पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप केला. (Revanth Reddy)

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सशस्त्र दलांच्या सहभागाच्या सन्मानार्थ आयोजित ‘जय हिंद’ रॅलीला संबोधित करताना रेवंत म्हणाले: “राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी सर्वपक्षीय बैठकीला हजेरी लावली तेव्हा त्यांनी केंद्राला पूर्ण पाठिंबा दिला आणि स्पष्टपणे सांगितले की भारताने पाकव्याप्त काश्मीर (पीओके) परत मिळवला पाहिजे. तरीही, हल्ल्याच्या चार दिवसांतच सरकारने अचानक युद्धबंदीची घोषणा केली. युद्धबंदीसाठी घाई का केली? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर हे उघड करेपर्यंत देश अंधारात होता. “

रेवंत यांनी लष्करी कारवाईबाबत स्पष्टतेच्या अभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि केंद्राला पाकिस्तानच्या प्रतिसादाचा परिणाम उघड करण्यास सांगितले.”आपण किती राफेल विमाने गमावली? त्या चार दिवसांत नेमके काय घडले?”, असा प्रश्न त्यांनी विचारला.  या प्रश्नांवर मोदी सरकार पुढे न आल्याबद्दल टीका केली. (Revanth Reddy)

पंतप्रधानांवर टीका करताना त्यांनी म्हटले: “मोदी हे रद्द झालेल्या १००० रुपयांच्या नोटेसारखे आहेत. जर राहुल गांधी पंतप्रधान असते तर आपण आतापर्यंत पीओके परत मिळवले असते. १९७१ च्या संघर्षादरम्यान इंदिरा गांधींनी चीनविरुद्ध युद्ध पुकारले आणि अमेरिकेला कडक इशारा दिला. आज भारताला अशाच प्रकारच्या नेतृत्वाची गरज आहे,” असे ते म्हणाले.

२०२० मध्ये चिनी सैन्याशी झालेल्या संघर्षात भारतीय लष्कराचे कर्नल बी संतोष बाबू यांच्या मृत्युनंतर चीनविरुद्धच्या निष्क्रियतेबद्दल मुख्यमंत्र्यांनी मोदी सरकारवर टीका केली.”पंतप्रधानांनी चीनविरुद्ध कोणतीही निर्णायक कारवाई का केली नाही? आपल्या सैनिकांच्या बलिदानानंतरही कोणतीही धाडसी प्रतिक्रिया का दिली नाही?” असा सवाल रेवंत यांनी केला,

भाजपच्या देशव्यापी तिरंगा रॅलींकडे लक्ष वेधत, रेवंत यांनी त्यांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “हे रॅली खरोखर पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळी आणि आपल्या शहीद सैनिकांना सन्मानित करण्यासाठी आहेत का – की फक्त एक राजकीय स्टंट आहे? देशभक्ती ही तुमच्या पक्षाची खाजगी मालमत्ता नाही. ती संपूर्ण देशाची आहे,” असे ते म्हणाले. (Revanth Reddy)

त्यांनी काँग्रेस पक्षाच्या त्यागाच्या वारशाचा पुनरुच्चार केला आणि गांधी कुटुंबाने देशसेवेसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे हे लक्षात आणून दिले. “काँग्रेस नेहमीच देशासाठी उभा राहिला आहे. राहुल गांधी पंतप्रधान होईपर्यंत आम्ही अथक परिश्रम करू. या कठीण काळात भारताला त्यांच्यासारख्या धाडसी, निर्णायक नेत्याची गरज आहे.”

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00