कोल्हापूर : प्रतिनिधी : राजकारणात चढ उतार येत असतात. मात्र नाराज कधी व्हायचे नसते. लोकसभा, विधानसभा आणि गोकुळच्या निवडणूकीत पराभव झाला. पण आम्ही कधी एकटे पडलो आहोत असे म्हटले नाही, असा टोला भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांना मारला. (Mahadik Criticized Patil)
आमदार सतेज पाटील यांनी जिल्ह्याच्या राजकारणात आपण एकटे पडलो आहेत, अशी भावना व्यक्त केली होती. पाटील यांच्या या वक्तव्याचा खासदार महाडिक यांनी चांगलाच समाचार घेतला. २०१९ च्या निवडणूकीत माझा घात झाला. विधानसभेला अमल महाडिक यांचा पराभव झाला. गोकुळममधील आमची सत्ता गेली. मात्र आम्ही कधीच नाराज झालो नाही. आम्ही नाराज होऊन टीव्ही फोडला नाही किंवा गाव सोडून गेलो नाही अशा शब्दात महाडिक यांनी पाटील यांच्यावर टीका केला. (Mahadik Criticized Patil)
जिल्ह्यातील सहकारी संस्थांमध्ये पक्षीय राजकारण नसतो असा दावा जिल्ह्यातील नेते मंडळी करत असताना खासदार यांनी या मताला छेद देत गोकुळचा अध्यक्ष हा महायुतीचाच असल्याचा पुनरुच्चार केला. विरोधकांचे संचालक आजही गोकुळमध्ये असून ते निवडणूकीच्या अनुषंगाने कामला लागला आहे. गोकुळची निवडणूक वर्षभरात होणार असून महायुतीची सत्ता गोकुळवर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (Mahadik Criticized Patil)
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश सुरू आहे याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, भाजपमध्ये निवडणूक लढवण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आहेत. त्यामुळे अन्य पक्षातील प्रवेश करणाऱ्या पक्षातील स्थिती पाहूनच निर्णय घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. (Mahadik Criticized Patil)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ११ वर्षाच्या कारकिर्दीत देशाची प्रगती झाली आहे असा दावा केला. मोदी यांच्या कामामुळे राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. जनतेला आपण जबाबदार असतो हे त्यांनी दाखवून दिला आहे. २०१४ नंतर विकासाचे राजकारण देशातील नागरिकांना पहायला मिळाले, असा दावाही त्यांनी केला. (Mahadik Criticized Patil)