Home » Blog » NDA first women passing parade : ‘एनडीए’त महिलांच्या पहिल्या तुकडीचा पदवीदान

NDA first women passing parade : ‘एनडीए’त महिलांच्या पहिल्या तुकडीचा पदवीदान

by प्रतिनिधी
0 comments
NDA first women passing parade

पुणे : प्रतिनिधी : भारतात प्रथमच १७ महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीनं पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमीमधून (एन.डी.ए.) पदवी प्राप्त केली. त्यामधून ३०० हून अधिक पुरुषांनी पदवी प्राप्त केली. सैन्यदलाचे माजी प्रमुख आणि मिझोरमचे राज्यपाल जनरल व्ही. के. सिंह हे पासिंग आउटचे पाहुणे होते. (NDA first women passing parade)

२०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगानं (युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन) महिलांना संरक्षण अकादमीमध्ये अर्ज करण्याची परवानगी दिली. त्यामुळे महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीनं २०२२ मध्ये एनडीएच्या १४८ व्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. एनडीएचे कॅडेट कॅप्टन उदयवीर नेगी यांनी १४८ व्या या परेडचे नेतृत्व केले.

एनडीएमधून महिला कॅडेट्सची पहिली तुकडी उत्तीर्ण होत आहे. अधिक समावेशकता आणि सक्षमीकरणाच्या दिशेनं आपल्या ऐतिहासिक टप्पा गाठल्याचं मिझोरामचे राज्यपाल सिंह यांनी सांगितलं. तरुणी नारी शक्तीचं हे प्रतीक आहे. हे केवळ महिला विकासाचं नव्हे तर महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचे प्रतीक आहे. या तरुणींपैकी एक महिला सर्वोच्च पदांवर पोहोचेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. (NDA first women passing parade)

एनडीएचे कमांडंट व्हाइस अॅडमिरल गुरचरण सिंह यांनी गुरुवारी महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीच्या पदवीदान समारंभाचं कौतुक केलं.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00