Home » Blog » Debate on Operation Sindoor: ‘ऑपरेशन सिंदूर’वर सोमवारी चर्चा

Debate on Operation Sindoor: ‘ऑपरेशन सिंदूर’वर सोमवारी चर्चा

by प्रतिनिधी
0 comments
Debate on Operation Sindoor

नवी दिल्ली : संसद अधिवेशनादरम्यान दोन्ही सभागृहांत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. तसेच जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सलग पाचव्या दिवशी, शुक्रवारी (२५ जुलै) संसद अधिवेशनाचे कामकाज होऊ शकले नाही. (Debate on Operation Sindoor)

दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब करण्यात आले. तसेच सोमवारी, २८ जुलै रोजी ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होईल, असे सांगण्यात आले.

दरम्यान, ज्येष्ठ अभिनेते आणि राजकीय नेते कमल हासन यांच्यासह तामिळनाडूतील चार नवनिर्वाचित राज्यसभा खासदारांनी सभागृहाच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. (Debate on Operation Sindoor)

दरम्यान, अधिवेशनादरम्यान सातत्याने होत असलेला गोंधळ दूर करण्यासाठी, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी चारपेक्षा जास्त सदस्य असलेल्या पक्षांच्या लोकसभेच्या नेत्यांची बैठक बोलावली. या बैठकीनंतर सोमवारी (२८ जुलै २०२५) लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होईल असे सांगण्यात आले.

सकाळपासून गोंधळातच कामकाज सुरू झाले. ते स्थगित करण्यात आले. दुपारी २ वाजता लोकसभेचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर, अध्यक्षस्थानी असलेल्या जगदंबिका पाल यांनी पुन्हा घोषणाबाजी सुरू असतानाच कामकाज सुरू ठेवले. (Debate on Operation Sindoor)

अध्यक्षांनी निदर्शने करणाऱ्या खासदारांना हिंदीत संबोधित केले. ते म्हणाले, “या निदर्शनांचा फायदा कोणाला होत आहे? जनतेला तर निश्चितच नाही. आपण कामकाज चालवू शकत नाही. पैशांचा अपव्यय होत आहे.”

ते म्हणाले, सदस्यांची खाजगी विधेयकेही सरकारी विधेयकांइतकीच महत्त्वाची आहेत आणि त्यावर चर्चा झाली पाहिजे.

केंद्रीय कायदा राज्यमंत्री अर्जुन मेघवाल म्हणाले की, गोवा राज्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये अनुसूचित जमातींच्या प्रतिनिधित्वाचे पुनर्समायोजन विधेयक चर्चेसाठी प्रलंबित आहे. विरोधामुळे ते मांडता आले नाही, याकडे लक्ष वेधून तुम्ही अनुसूचित जमातींच्या विरोधात आहेत का?, असा सवाल त्यांनी विरोधकांना उद्देशून केला.

खासदारांनी आठवड्याच्या शेवटी त्यांच्या मतदारसंघात जावे आणि संसदेचे कामकाज असेच सुरू ठेवायचे, असे विचारून या, अशी उद्वीगनता अध्यक्षांनी व्यक्त केली. ते म्हणाले, “हे सभागृह ऐतिहासिक आहे. सभागृहाने अनेक कायदे मंजूर केले आहेत, अनेक चर्चा पाहिल्या आहेत.” असे सांगत त्यांनी सभागृहाचे कामकाज सोमवार (२८ जुलै) पर्यंत तहकूब केले.

बिहार प्रश्नावरून जोरदार निदर्शने

दरम्यान, बिहारमधील मतदार यादीच्या सुधारणेवर विरोधी पक्षांनी लोकसभेत जोरदार निदर्शने सुरूच ठेवली. सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर लगेचच, विरोधी पक्षांच्या सदस्यांनी बिहारमधील मतदार यादीच्या सुधारणेचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला.

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी निदर्शने करणाऱ्या सदस्यांना प्रश्नोत्तराच्या सत्रात कामकाज सुरू ठेवण्यास सांगितले. श्री. बिर्ला म्हणाले की, सभागृहात घोषणाबाजी करणे आणि फलक फडकावणे योग्य नाही. सरकार आणि विरोधी पक्षाच्या प्रतिनिधींना बोलावून चर्चा घडवून आणण्यात येईल, मांडलेले मुद्दे सोडवण्यास मदत करू शकेन, असे ते म्हणाले.

तरीही त्यांच्या विनंतीला न जुमानता, निदर्शने सुरूच राहिली. शेवटी बिर्ला यांनी लोकसभेचे कामकाज तहकूब केले.

हेही वाचा :
नरेंद्र मोदींनी इंदिरा गांधीना मागे टाकले
शाळा कोसळून सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू, २९ जखमी

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00