Home » Blog » काशीतील हिंदुंची मंदिरे उध्वस्त करणाऱ्या मोदी- योगींनी माफी मागावी  : नाना पटोले

काशीतील हिंदुंची मंदिरे उध्वस्त करणाऱ्या मोदी- योगींनी माफी मागावी  : नाना पटोले

by प्रतिनिधी
0 comments
Modi and Yogi should apologize

जमीर काझी : मुंबई : स्वतःला हिंदु धर्माचे रक्षक समजणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व योगी आदित्यनाथ यांनी राजमाता अहिल्याबाईंनी काशीत बांधलेला पवित्र मणिकर्णिका घाट उध्वस्त केला, हा तमाम हिंदू तसेच धनगर समाजाचा अपमान आहे. मोदी-योगी यांनी हिंदुंच्या अस्मितेवर घाला घातला आहे. विकासाच्या नावाखाली हिंदुंच्या अस्मितेशी खेळण्याचा त्यांना काही अधिकार नाही, त्यांनी जाहीरपणे माफी मागावी, असा घणाघाती हल्ला काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी केला. बुधवारी काशीमध्ये जाऊन या घटनेचा निषेध करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Modi and Yogi should apologize)

पटोले प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ‘अहिल्याबाई होळकर यांनी न्याय, धर्म आणि लोककल्याणासाठी राज्य केले, हिंदु धर्मासाठी पवित्र अशा काशी विश्वनाथ आणि सोमनाथ मंदिरांसह अनेक मंदिरांची पुनर्बांधणी केली. काशी हे केवळ एक शहर नसून हिंदु समाजासाठी अत्यंत मानाचे व पवित्र अध्यात्मिक केंद्र आहे. पंतप्रधान मोदी तेथून तीनवेळा निवडून आले आहेत. मात्र काशीच्या विकासाच्या नावाखाली नरेंद्र मोदी यांनी शेकडो मंदिरे तोडली आणि आता अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला मणिकर्णिका घाट उध्वस्त केला त्यांची प्रतिमाही तोडली. मणिकर्णिका घाटावर अंत्यसंस्कार केल्याने आत्म्याला थेट मोक्ष मिळतो, अशी हिंदु धर्मात धारणा आहे, हे ५१ शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. हिंदु धर्मासाठी पवित्र अशा घाटावर बुलडोझर चालवून मोदी व योगी यांनी हिंदु समाजाचा घोर अपमान केला आहे. तर असे काही घडलेच नाही, जे दाखवले जाते ते एआय (AI) दृश्य आहे, असा कांगावा स्वतःला संत म्हणवणारे, भगवे कपडे घालणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सांगत आहेत. होळकर कुटुंबातील काही लोकांनी काशीला जावून वस्तुस्थिती पाहिली व सरकारला पत्र पाठवले आहे. मी उद्या काशीला जाऊन वस्तुस्थिती पाहणार आहे व मोदी – योगी सरकारचा निषेध करणार आहे, असे त्यांनी सांगितले. (Modi and Yogi should apologize)

 ‘दावोस’मधील करारांचे पुढे काय होते?… राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुंतवणूक आणण्यासाठी यावर्षीही दावोसला गेले आहेत पण ही फक्त ‘इव्हेंट’बाजी आहे. यापूर्वीही लाखो कोटीचे करार झाल्याचा दावा केला. एवढी मोठी गुतंवणूक राज्यात आली तर मग बेरोजगारी का वाढली, याचे उत्तर द्यावे. राज्यात मोठ्या प्रामणात उद्योग यावेत, ही अपेक्षा आहे पण सरकार करत असलेले दावे आणि वस्तुस्थिती यात मोठी तफावत आहे. राज्य कर्जबाजारी झाले आहे, सरकारकडे पगार करण्यासाठी पैसे नाहीत, कंत्राटदारांची बिले थकली आहेत. विकासकामासाठी पैसे नाहीत आणि मुख्यमंत्री दावोसमध्ये कोट्यवधी रुपयांची उधळण करत असल्याची टीका पटोले यांनी केली. (Modi and Yogi should apologize)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00