Home » Blog » पानसरे हत्येतील आरोपी सनातनचा साधक समीर गायकवाडचा मृत्यू

पानसरे हत्येतील आरोपी सनातनचा साधक समीर गायकवाडचा मृत्यू

by प्रतिनिधी
0 comments
Pansare murder accused Gaikwad dies

सांगली : प्रतिनिधी : ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड यांचा मृत्यू झाला. तो सनातन संस्थेचा  साधक होता. पानसरे हत्येतील प्रमुख संशयित म्हणून त्याला अटक झाली होती. सध्या तो जामिनावर होता. चार वर्षापूर्वी त्याची जामिनावर मुक्तता झाली होती. तो सांगलीत रहात होता. (Pansare murder accused Gaikwad dies)

समीर गायकवाड याचा आज मंगळवारी सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पहाटेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. काल सोमवारी मध्यरात्री सुमारास त्याला त्रास जाणवू लागल्याने त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. सकाळी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण कळणार आहे. (Pansare murder accused Gaikwad dies)

पानसरे यांची हत्या १६ फेब्रुवारी २०१५ मध्ये कोल्हापुरात झाली होती. पानसरे यांच्यावर जवळून गोळ्या झाडल्या होत्या. उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला. पानसरे यांच्या हत्येनंतर संशयाची सुई हिंदुत्वादी संघटनाकडे होती. पोलिसांनी सुरवातीला सनातनवर संशय व्यक्त केला होता. त्यातच सनातनचा साधक समीर गायकवाडवर पोलिसांनी नजर ठेवली होती. समीर गायकवाडच्या मोबाईलवर नजर ठेवली होती. मैत्रिणीबरोबर बोलताना त्याने आता पानसरे झाला, आता वागळे करु असा तीन वेळा उल्लेख झाल्यानंतर तत्कालिन कोल्हापूर पोलिस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांच्या नेतृत्वाखाली समीर गायकवाडला अटक करण्यात आली. त्याचे मोबाईल दुरुस्तीचे दुकान होते.  अटकेनंतर कोल्हापूर वकीलांनी त्यांचे वकीलपत्र नाकारले होते. त्यानंतर हिंदूत्ववादी संघटनांच्या वकीलांनी त्याचे वकिलपत्र घेतले होते. गायकवाड तपासात सहकार्य करत नव्हता. तो ध्यानाला बसत असल्याने पोलिसांना तपासात अडचणी आल्या होत्या. त्याला थर्ड डिग्री लावू नये असे आदेश गृहखात्याने दिल्याने पोलिसांच्या तपासावर मर्यादा आल्या होत्या. गायकवाड याच्या अटकेनंतर हिंदू जनजागरण समितीच्या डॉ. वीरेंद्र तावडेला अटक झाली होती. त्यानंतर पोलिसांनी दाभोळकर, पानसरे, गौरी लंकेश यांच्या हत्येची तपासात सांगड घालण्याचा प्रयत्न केला होता. सध्या या खटल्याची सुनावणी सुरू आहे.  (Pansare murder accused Gaikwad dies)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00