काठमांडू : प्रतिनिधी : तिबेटमध्ये झालेला भूकंप आणि त्यानंतर आलेल्या प्रचंड महापुरामुळे नेपाळमध्ये महाप्रलय आला आहे. रसुवा जिल्ह्यातील भोटे काशी नदीला अचानक आलेल्या पुरांमुळे १०० जणांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे. २९१ परदेशी पर्यटक बेपत्ता असून त्यामध्ये १०५ भारतीयांचा समावेश आहे. तसेच नेपाळचे ३२ पोलिस आणि सशस्त्र पोलिस दलाचे ९ जवान बेपत्ता असल्याची माहिती पुढे आले आहे. नदीच्या दोन्ही बाजूच्या गावांना मोठा फटका बसला असून महाप्रलयाच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये महापुराचे रौद्ररुप दिसून आले आहेत. नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या बिहार राज्यातही सतर्कतेचे आदेश दिले आहेत. (Massive damage caused by severe floods in Nepal)
तिमुरे, स्याफू बेसी परिसराला फटका
नेपाळ तिबेट सीमेवर भोटे कोशी नदीच्या पाण्याची पातळी बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास अचानक वाढली. पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने पूल उधवस्त झाले. अनेक हॉटेलमध्ये आणि घरामध्ये पाणी घुसले. तिमुरे आणि स्याफू बेसी परिसराला मोठा फटका बसले. रस्ते, पुल, वाहनांचे मोठे नुकसान झाले. जलविद्युत प्रकल्पांच्या पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले. चीनच्या बाजूला असलेल्या ग्यारोंग बंदरालाही पुराचा मोठा फटका बसला आहे. (Massive damage caused by severe floods in Nepal)
३८४ प्रवासी बेपत्ता
भारतातून नेपाळमध्ये पर्यटक गेले असून १०५ पर्यटकांचा संपर्क होऊ शकला नाही. २९१ परदेशी नागरिक आणि ९३ नेपाळी असे ३८४ प्रवासी बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. अमेरिका, मलेशिया, युके, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, नेदरलँडमधील प्रवाशांचा समावेश आहे. संपर्कात नसलेले बहुतांशी पर्यटक हे कैलास मानसरोवर यात्रेसाठी तिबेटला जाणारे यात्रेकरू असल्याचे मानले जाते. बचाव पथकांकडून बेपत्ता नागरिक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचा शोध सुरू आहे. नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी सांगितले की, पोलिस आणि लष्करी जवानांसह आपत्कालीन पथके बाधित भागात पाठवण्यात आली आहेत. नदीकाठावर राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. (Massive damage caused by severe floods in Nepal)