Home » Blog » Ambedkar : पहेलगामचे हल्लेखोर कुठे आहेत?

Ambedkar : पहेलगामचे हल्लेखोर कुठे आहेत?

कसला जल्लोष?, प्रकाश आंबेडकरांचा मोदींना प्रश्न

by प्रतिनिधी
0 comments
Ambedkar

मुंबई : प्रतिनिधी :  पहेलगाम हल्ल्यातील दहशतवादी कुठे आहेत? अद्याप हल्लेखोर पकडले गेले नाहीत. मग तुम्ही जल्लोष कसला करताय?  असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे.

गेल्या महिन्यात २२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहेलगाममधील बैसरन येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. देशातील सर्व यंत्रणा हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. पण अजूनही एकही हल्लेखोर सापडला नाही. हल्लेखोरांमध्ये दोन पाकिस्तानी नागरिक आणि दोन काश्मीरीचे रहिवाशी आहेत. असे जम्मू काश्मीर पोलिसांनी सांगितले होते.

पहेलगाम हल्ल्याचा तपास आणि हल्लेखोरांना पकडण्याची जबाबदारी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवण्यात आली आहे. पण अजूनही दहशतवादी सापडलेले नाहीत. हल्लेखोर अजूनही पहेलगाम परिसरात आहेत, असा तपास यंत्रणांचा अंदाज आहे. त्यांचा शोध घेतला जात आहे. या हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर मोहिमे अंतर्गत भारतीय वायुदलाने पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्धवस्त केले. त्यामुळे कुख्यात दहशतवाद्यांसह १०० दहशतवाद्यांच्या खात्मा करण्यात आला. त्यानंतर पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली. त्याला भारतीय सैन्यदलाने चोख प्रत्युत्तर दिले. त्यानंतर दोन्ही देशांनी युद्ध विरामाचा निर्णय घेतला.

पाकिस्तानमधील ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याने भारतात अनेकांनी जल्लोष केला. भाजपनेही देशभर तिरंगा रॅली काढण्यात येत आहेत. पण जिथून सुरूवात झाली त्या पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अद्याप पकडण्यात आलेले नाहीत. यावरुन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी एक्स पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की ‘‘मोदी, पहलगाम हल्ल्यास जबाबदार दहशतवादी कुठे आहेत त्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पिडितांच्या पत्नी अद्याप न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही”

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00