कोल्हापूर : प्रतिनिधी : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत विवेकानंद शिक्षण संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे यांना विधान परिषदेतमध्ये पाठवण्याचा ठाम निर्धार शिक्षकांनी केला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर विभागाच्या वतीने शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवन, ‘कोल्हापूर जिल्हा शिक्षकांचा निर्धार मेळावा’अत्यंत उत्साहात झाला. शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत कौस्तुभ गावडे यांच्या विजयाची पताका फडकवण्यासाठी सर्व शिक्षकांनी संघटित होऊन काम करण्याचा ठाम निर्धार या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला. या निर्धार मेळाव्याला कोल्हापूर जिल्ह्यातील 30 शाखांमधील हजारो शिक्षक, शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रमुख मान्यवर, पदाधिकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Confidence placed in Kaustubh Gawde at the teachers’ gathering)
या मेळाव्यात बोलताना मान्यवरांनी स्पष्ट केले की, यापूर्वी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने तीन वेळा पुणे विभागाचा शिक्षक आमदार निवडून दिला आहे. आणि या प्रत्येक वेळी विवेकानंद शिक्षण संस्थेतील शिक्षकांची नेहमीच मोलाची साथ लाभली आहे. याच विश्वासाच्या जोरावर आणि गुरुदेव कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांच्या बळावर आगामी पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत निश्चितपणे ऐतिहासिक विजय संपादन करण्याचा निर्धार करुन प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. (Confidence placed in Kaustubh Gawde at the teachers’ gathering)
संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या कोल्हापूर विभागाचे प्रमुख डॉ. श्रीराम साळुंखे, संस्थेचे आजीव सेवक व कोल्हापूर जिल्हा प्रचार प्रमुख भूपाल कुंभार, प्राचार्या डॉ. श्रुती जोशी, सातारा जिल्हा विभागप्रमुख शशिकांत काटे, आजीव सेवक अजितकुमार देसाई, प्राचार्य पी.एस.चव्हाण, मा.आर.डी.पाटील, विरेन भिर्डी हुसैन पठाण यांनी आपल्या मनागेतामधून, कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी सर्व शिक्षकांनी जीवाचे रान करुन विक्रमी शिक्षक मतदार नोंदणी केली आहे. या कामगिरीच्या जोरावर आपला विजय निश्चित आहे, असे प्रतिपादन केले. (Confidence placed in Kaustubh Gawde at the teachers’ gathering)
जुनी पेन्शन योजना मिळवणे प्रमुख ध्येय
यावेळी शिक्षक मित्र कौस्तुभ गावडे म्हणाले २००५ अगोदरच्या सेवेत असलेल्या सर्व शिक्षकांना विनाअट जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी व्यापक काम सुरु असून शिक्षकांना सेवानिवृत्त झाल्यानंतर सन्मानाने जीवन जगण्यासाठी जुनी पेन्शन योजना़ मिळवणे हे प्रमुख ध्येय आहे, अस शिक्षकांच्यावर लादली जाणारी अशैक्षणिक कामे रद्द करण्यासाठी विधानपरिषदेमध्ये शिक्षकांच्या हक्काचा कर्तबगार सदस्य जाणे गरजेचे आहे.
वाढीव तुकड्यांच्या अनुदानासाठी पाठपुरावा करणार
दीर्घकाळ सेवा बजावलेल्या शिक्षकांच्या सेवा सुरक्षेला बाधा न आणता टीईटी सक्ती रद्द करावी, आवश्यक प्रशिक्षण आणि उपाययोजना यासाठी प्रयत्न करणे, पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती प्रक्रिया वर्षभर नियमितपणे सुरू राहण्यासाठी पाठपुरावा करणे, शिक्षण क्षेत्राला भ्रष्टाचारापासून मुक्त करणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती आणि आवश्यक विषय शिक्षकांची नियुक्ती आणिअनुदानास पात्र संस्था व वाढीव तुकड्यांना वेळेत अनुदान मिळावे यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे कौस्तुभ गावडे म्हणाले.
उद्योगाभिमुख प्रशिक्षण वाढावे आणि विद्यार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्ये मिळावीत यासाठी प्रयत्न करणे, आरटीई अंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शुल्काशी संबंधित शाळांना मिळणारे अनुदान शैक्षणिक वर्षांच्या अखेरीस किंवा निश्चित वेळापत्रकानुसार प्राप्त व्हावे, यासाठी स्पष्ट धोरण व कालबद्ध निधी वितरणासाठी पाठपुरावा करणे, सर्व कार्यरत शिक्षकांच्या आरोग्य विम्याची सुविधा कॅशलेस व्हावी, यासाठी पाठपुरावा करणे असे शिक्षकांचे सर्व प्रलंबीत प्रश्न पुढील सहा वर्षात सोडविण्यासाठी सर्व शिक्षक माझ्या पाठीशी ठाम उभे असल्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास कौस्तुभ गावडे यांनी व्यक्त केला. (Confidence placed in Kaustubh Gawde at the teachers’ gathering)