Home » Blog » Maha Aghadi manifesto : महाआघाडीचा ‘बिहार का तेजस्वी प्राण’ जाहीरनामा प्रसिद्ध

Maha Aghadi manifesto : महाआघाडीचा ‘बिहार का तेजस्वी प्राण’ जाहीरनामा प्रसिद्ध

by प्रतिनिधी
0 comments
Maha Aghadi manifesto

पटना : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणूकीसाठी राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस महाआघाडीने मंगळवारी “बिहार का तेजस्वी प्राण” या शीर्षकाचा आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. एनडीएकडून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात महाआघाडीने लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे आणले आहे. (Maha Aghadi manifesto)

जाहिरनामा प्रकाशन कार्यक्रमाला  आरजेडी नेते तेजस्वी यादव, विकासशील इंसान पार्टी (व्हीआयपी) प्रमुख मुकेश सहानी, काँग्रेस नेते पवन खेरा आणि सीपीआय (एमएल) नेते दीपांकर भट्टाचार्य उपस्थित होते. लोकसभेतील विरोधी पक्षनेते काँग्रेसचे खासदार राहूल गांधी गैरहजर होते.

यावेळी बोलताना काँग्रेस नेते पवन खेरा म्हणाले, विरोधी पक्षांच्या आघाडीने त्यांचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांची घोषणा केली आणि त्यांचा जाहीरनामाही प्रसिद्ध केला. सत्ताधारी एनडीएवर टीका करताना खेरा यांनी त्यांची निवडणूक आश्वासने केवळ “जुमला” म्हणून फेटाळून लावली. (Maha Aghadi manifesto)

प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी

‘तेजस्वी का प्राण’ असे नाव असलेल्या महागठबंधनच्या जाहीरनाम्यातील महिला विकास, रोजगार, शिक्षण या मुद्द्यांना प्राध्यान्य दिले आहे. निवडणूक महाआघाडीला सत्ता मिळाल्यानंतर सरकार स्थापन झाल्यानंतर २० दिवसांच्या आत, राज्यातील प्रत्येक कुटुंबातील किमान एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याची हमी देणारा कायदा करण्याचे वचन दिले आहे. महागठबंधनने वक्फ (दुरुस्ती) विधेयक स्थगित करण्याचे आणि वक्फ मालमत्तांचे व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि कल्याणकारी बनवण्याचे आश्वासन दिले आहे. (Maha Aghadi manifesto)

आरक्षणात वाढ करण्याचे आश्वासन

जाहीरनाम्यात पंचायत आणि महानगरपालिका संस्थांमध्ये अति मागासवर्गीयांसाठी सध्याचे आरक्षण २० टक्क्यांवरून ३० टक्के करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. अनुसूचित जातींसाठी, कोटा १६ टक्क्यांवरून २० टक्के करण्यात येईल, तसेच अनुसूचित जमातींसाठीही आरक्षणात प्रमाणानुसार वाढ करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.

महिलांना दरमहा २५०० रुपये

अंतर्गतमाई-बहीन मान योजना एक डिसेंबरपासून महिलांना दरमहा २,५०० रुपये मिळतील, तसेच पुढील पाच वर्षांसाठी दरवर्षी ३०,००० रुपये मिळतील.  याव्यतिरिक्त, प्रत्येक कुटुंबाला दरमहा २०० युनिट मोफत वीज मिळेल. सरकार स्थापन झाल्यानंतर २० महिन्यांच्या आत संपूर्ण बिहारमध्ये रोजगार हमी योजना लागू केली जाईल.जन स्वास्थ्य सुरक्षा योजनेअंतर्गत प्रत्येक व्यक्तीला २५ लाख रुपयांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा देण्याचे आश्वासन या आघाडीने दिले.जीविका दिदीस यांना कायमस्वरूपी सरकारी नोकरीचा दर्जा देण्यात येईल आणि त्यांना मासिक ३०,००० रुपये वेतन दिले जाईल.

सर्व पिकांना आधारभूत किंमत

सर्व पिके किमान आधारभूत किमतीवर खरेदी केली जातील, मंडई आणि बाजार समित्या पुनरुज्जीवित केल्या जातील. एपीएमसी कायदा पुनर्संचयित केला जाईल.राज्यभरात आयटी पार्क स्थापन केले जातील. कंत्राटी सरकारी कर्मचाऱ्यांना नियमित केले जाईल. बोधगया येथील बौद्ध मंदिरांचे व्यवस्थापन बौद्ध समुदायाच्या लोकांकडे सोपवले जाईल याचा उल्लेख जाहीरनाम्यात केला आहे. (Maha Aghadi manifesto)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00