Home » Blog » Eighth Pay Commission : आठव्या वेतन आयोगाची स्थापना ; ५० लाख कर्मचाऱ्यांना लाभ

Eighth Pay Commission : आठव्या वेतन आयोगाची स्थापना ; ५० लाख कर्मचाऱ्यांना लाभ

by प्रतिनिधी
0 comments
Eighth Pay Commission

नवी दिल्ली : प्रतिनिधी : केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. आठवा वेतन आयोगाच्या घोषणेनंतर तब्बल दहा महिन्यानंतर वेतन आयोगाची स्थापना झाली आहे. ५० लाख कर्मचारी आणि ६५ लाख निवृत्ती वेतनधारकांना याचा फायदा होणार आहे. (Eighth Pay Commission)

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली. हा आयोग १८ महिन्यात आपल्या शिफारशी सादर करतील. नवीन वेतन आयोगाच्या अध्यक्षा न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई असतील. त्याचबरोबर प्रा. पुलक घोष आणि पंकज जैन यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. मंत्रालये, राज्ये व कर्मचारी ही समिती स्थापन करण्यात आली आहे. समिती वेतन संरचना आणि भत्ते यामध्ये सुधारणा करेल. १८ महिन्याच्या आत या समितीला अंतिम अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. (Eighth Pay Commission)

केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी देऊन जवळपास दहा महिन्याचा कालावधी उलटून गेल्यानंतर समितीची स्थापना केली आहे. ५० लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि ६५ लाख निवृत्तीवेतनधारकांना या नवीन वेतन सुधारणेचा फायदा होणार आहे. (Eighth Pay Commission)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00