Home » Blog » भांडणात लुकाकोची मध्यस्थी आणि बेल्जियमची विजयी मुसंडी

भांडणात लुकाकोची मध्यस्थी आणि बेल्जियमची विजयी मुसंडी

by प्रतिनिधी
0 comments
Lukaku intervenes in the dispute

नवी दिल्ली : सेनेगलविरुद्ध बेल्जियमचा संघ ८६ व्या मिनिटापर्यंत ०-२ असा पिछाडीवर होता. तत्पूर्वी मैदानावर निराश झालेल्या बेल्जियम कर्णधार आणि एका खेळाडूंमध्ये शाब्दिक भांडणे झाली. त्यावेळी संघातील अनुभव खेळाडू लुकाकुने हस्तक्षेप करत परिस्थिती शांत झाली. लुकाकोने गोल केला आणि त्यानंतर वाद झालेल्या दोन्ही खेळाडूंनी मदत करत गोल केला आणि सामना बरोबरीत आणला. आणि जादा वेळेत पेनेल्टीवर गोल करत बलाढ्य सेनेगलला ३-२ अशी मात देत फिफा वर्ल्डकपच्या अंतिम १६ संघात प्रवेश केला. आता बेल्जियमची लढत यजमान अमेरिकेशी होणार आहे. (Lukaku intervenes in the dispute)

सेनेगलची २-० अशी आघाडी

बेल्जियम आणि सेनेगल यांच्यातील सामना चुरशीचा होता. सामन्याच्या २५ व्या मिनिटाला हबीब दियाराने गोल करुन सेनेगलचे खाते उघडले. दुसऱ्या हाफमध्ये इस्माईला सारने गोल करत सेनेगलची आघाडी दुप्पट केली. सेनेगेलने दोन गोल करत सामन्यात आघाडी घेतली होती. बहुतांश सामन्यात सेनेगलचे वर्चस्व होते.

लुकाकोची मध्यस्थी आणि गोल

दुसऱ्या हाफमध्ये सुरवातीला गोल केल्याने बेल्जियमच्या विजयाची आशा मावळू लागली. मैदानावर त्यावेळी बदली खेळाडू लुकाको उतरला. यावेळी बेल्जियममधील दोन खेळाडूंमधील वाद उफाळून आला. कर्णधार युरी टिलेमन्स आणि लिआंद्रो टोसार्ड यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक म्हणजे भांडणे झाली. यावेळी लुकाकेने मध्यस्ती करत दोन्ही खेळाडूंना बाजूला सारत परिस्थिती शांत केली. तसेच संघाला बरोबरी मिळवून देण्यासाठी दोघांना चिअरअपही केले. आणि तिथून बेल्जियमच्या विजयाची पटकथा रचली गेली. (Lukaku intervenes in the dispute)

बेल्जियमची बरोबरी

८२ व्या मिनिटापर्यंत दोन गोलने पिछाडीवर असलेल्या बेल्जियमचा अनुभवी स्ट्रायकरने लुकाकुने ८६ व्या मिनिटाला गोल केला. त्यानंतर तीन मिनिटांनी ट्रोसार्डने पेनल्टी एरियात एक आकर्षक क्रॉस दिला. टायलेमन्सने उंची उडी घेत हेडरद्वारे बरोबरीचा गोला केला. त्यानंतर सामना जादा वेळेत गेला.

पेनल्टीवर बेल्जियम विजयी

जादा वेळेत नाट्य घडले. सेनेगलच्या लॅमिन कॅमाराने पेनल्टी एरियामध्य टिलेमन्सचा पाडले. बराच वेळ मुख्य पंचांनी व्हीएआर चा आधार घेत बेल्जियमला पेनल्टी बहाल केली. सेनेगलच्या खेळाडूंनी पेनल्टी एरियाला घेराव घातला. जवळपास सात मिनिटे हा घोळ सुरू होता. १२५ व्या मिनिटाला टिलेमन्सने पेनल्टीवर अचूक फटका मारत बेल्जियमला विजय मिळवून दिला. (Lukaku intervenes in the dispute)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00