Home » Blog » एशियाडमध्ये २८ वर्षानंतर भारताला वेटलिफ्टिंगमध्ये पदक; मीराबाई चानूने पटकावले रौप्य

एशियाडमध्ये २८ वर्षानंतर भारताला वेटलिफ्टिंगमध्ये पदक; मीराबाई चानूने पटकावले रौप्य

by प्रतिनिधी
0 comments
Mirabai Chanu wins silver medal

नवी दिल्ली : जपानमधील नागोया एशियाड क्रीडा स्पर्धेत ४९ किलो वजनी गटात भारताच्या मीराबाई चानूने रौप्य पदक पटकावले. तब्बल २८ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर अशियाई स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये पदक मिळाले आहे. मीराबाईने १९८ किलो वजन उचलले. (Mirabai Chanu wins silver medal)

२८ वर्षानंतर भारताला वेटलिफ्टिंगमध्ये पदक

१९९८ मध्ये बँकॉक अशियाई स्पर्धेत मल्लेश्वरीने रौप्य पदक जिंकले होते. त्यानंतर भारताला अशियाई स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये पदक मिळवले नव्हते. २००२ मधील अशियाई स्पर्धेत भारताला पदक मिळाले नव्हते तर २००६ मध्ये दोहा येथे आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाने डोपिंग चाचण्यात खेळाडू दोषी ठरल्याने भारतीय वेटलिफ्टिंग महासंघावर बंदी घातल्याने भारतीय संघाने स्पर्धेत भाग घेतले नव्हता. २०१० मध्ये ग्वांगझू एशियाडमध्ये भारताचे १२ वेटलिफ्टर सहभागी झाले होते पण त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले होते. २०१४ मध्ये इंचिओनमध्येही भारतीय संघाला पदक मिळाले नव्हते. यावेळी मीराबाई चानूही भारतीय संघात होते. २०२३ मध्ये मीराबाईचे पदक थोडक्यात हुकले होते. दुखापतीमुळे तिला क्लिन आणि जर्कचा अंतिम प्रयत्न पूर्ण न करता आल्याने तिला संधी मिळाली नव्हती. (Mirabai Chanu wins silver medal)

ऑलिंपिक,एशियाड, जागतिक स्पर्धेत पदक प्राप्त करण्याची मीराबाईची किमया

नागोया एशियाडमध्ये मात्र मीराबाईने पदक पटकावण्याची संधी साधली. मीराबाईने १९८ किलो वजन उचलले. स्नॅचमध्ये ८७ किलो आणि क्लिन आणि जर्कमध्ये १११ किलो वजन उचलून भारताची अशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकांची २८ वर्षांची प्रतिक्षा संपवली. री सॉन्गने २१५ किलो वजन उचलण्याचा विक्रम प्रस्थापित करत सुवर्णपदक जिंकले. इंडोनिशियाच्या लुलुक डायनाने १९१ किलो वजन उचलत ब्राँझ पदक मिळवले. मीराबाईच्या अशियाई स्पर्धेतील  पदकाने तिने ऑलिंपिक, राष्ट्रकुल, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक मिळवून सर्व स्पर्धामध्ये पदक मिळवण्याची किमया साधली. (Mirabai Chanu wins silver medal)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!