कोल्हापूर; प्रतिनिधी : जागोजागी उखडलेले रस्ते, त्यात पावसामुळे शहरातील सर्वच रस्त्यांची झालेली चाळण आणि आता शहरभर उडणारे धुलीकणांचे लोट यामुळे शहराची हवा बिघडून गेली आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या दिवाळी सणादरम्यान मोठ्या प्रमाणात फोडण्यात आलेले फटाके यामुळे प्रदूषणात आणखी भरच पडली आहे. त्यामुळे नागरिकांना सर्दी-खोकल्यासह घशाचा त्रास जाणवू लागला आहे. या पार्श्वभूमीवर आलेल्या तक्रारीनुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
शहरातील खराब रस्त्यांमुळे हवेतील धूलिकणांचे प्रमाण वाढले आहे. या धुलीकलणांमुळे हवा आणखी प्रदूषित होऊन नागरिकांना मोठा त्रास होत आहे. याबाबत कॉमन मॅन संघटनेचे अॅड. बाबा इंदुलकर यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत मंडळाने कोल्हापूर महानगरपालिकेला नोटीस बजावली आहे. सात दिवसांत उत्तर न दिल्यास महापालिकेवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. हवा प्रदूषण प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम १९८१ नुसार कोल्हापूर महापालिका प्रदूषण प्रतिबंधक क्षेत्रात आहे. शहरातील हवेची गुणवत्ता ढासळल्याने केंद्र सरकारने कोल्हापूर शहराचा समावेश राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमात केला आहे. या कार्यक्रमांतर्गत देशातील १३० प्रदूषित शहरांमधील हवेची गुणवत्ता सुधारण्यात येत आहे. त्यानुसार शहरातील हवा प्रदूषण कमी करण्यासाठी प्रभावी पावले उचलून हवेची गुणवत्ता सुधारण्याची जबाबदारी महापालिकेवर आहे.
तक्रारी बेदखल
दाभोळकर कॉर्नर ते किरण बंगला, माऊली चौक ते गोखले कॉलेज आदीसह शहरातील बहुसंख्य रस्ते उकरण्यात आले, पण दोन वर्षापासून डांबरीकरण केले नाही. त्यामुळे बहुसंख्य रस्त्यावर खड्याचे साम्राज्य तसेच दगड माती आणि ड्रेनेजचे पाणी यामुळे होणारा चिखल याचा प्रचंड त्रास नागरिकांना होत आहे. ड्रेनेजचे काम सुरू असल्याचे कारण सांगत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी गेल्या दीड दोन वर्षापासून दुर्लक्ष केले आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले एखादे मोठे वाहन गेल्यानंतर सर्वत्र धुळीचे लोट उठतात. परिणामी नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत. याबाबत स्थानिक नागरिकांनी महापालिका अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी तक्रार केली पण त्यांची दखल घेतलेली नाही, याकडे अॅड. इंदुलकर यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे लक्ष वेधले आहे.
केलेले रस्ते खोदले
गेल्या दोन वर्षांपासून शहरातील रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. दयनीय स्थिती आहे. काही रस्त्यांचे दीड दोन वर्षापूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु काही महिन्यांपूर्वी रस्त्यांसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी आल्यानंतर महापालिकेने पूर्वी जे रस्ते झाले होते त्यातीलच काही रस्ते नवीन ड्रेनेज लाईन घालण्यासाठी पुन्हा खोदले