Home » Blog » Jewellery theft : निवृत्त शिक्षिकेच्या घरातून तीस तोळे दागिने लंपास

Jewellery theft : निवृत्त शिक्षिकेच्या घरातून तीस तोळे दागिने लंपास

रोख एक लाख रुपये चोरले

by प्रतिनिधी
0 comments
Jewellery theft

कोल्हापूर : प्रतिनिधी : नातेवाईकांच्या घरी गेल्यावर बंद असलेल्या निवृत्त शिक्षिकेच्या घरात मंगळवारी रात्री चोरी झाली. चोरट्यांनी तीस तोळे सोन्याचे दागिने आणि रोख एक लाख रुपये चोरुन नेले. शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. (Jewellery theft)

नलिनी भिकाजीराव गायकवाड (वय ६९, रा. साळोखे मळा, कदमवाडी, कोल्हापूर) या निवृत्त शिक्षिका असून त्या कदमवाडीतील घरात एकट्याच राहतात. काल २३ रोजी त्या गडहिंग्लज येथील नातेवाईकांकडे गेल्या होत्या. चोरट्यांनी काल मंगळवारी रात्री घराचा दरवाजा तोडून लोखंडी कपाटातील लॉकर तोडून ३० तोळे वजनाचे सोने, रोख एक लाख रुपये चोरुन नेले. (Jewellery theft)

 पाच तोळे सोन्याचा राणी हार, पाच तोळ्याचे बिलवर, एक तोळ्याचा जोंधळा मणी पोत, तीन तोळ्या पाटल्या, पाच तोळ्याची मोहन मोळ, सव्वा तोळ्याचा नेकलेस, अर्धा तोळ्याचा वेल, एक तोळ्याच्या रिंगा, तीन तोळ्याच्या सोन्याच्या दोन चेन, दोन तोळ्याचे नाणे, ती ग्रॅम वजनाचे टॉप, दीड तोळ्याच्या दोन अंगठ्या असे दागिने लंपास केले. सकाळी आठ वाजता चोरी झाल्याचे उघडकीस आले. पोलिस उप निरीक्षक जाधव तपास करत आहेत. (Jewellery theft)

हेही वाचा :

बाबांचे डोके रक्ताने माखले होते…

तीन नक्षलवादी ठार

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00