Home » Blog » Vishakhapattnam  : मंदिरातील भिंत पडून आठ भाविकांचा मृत्यू

Vishakhapattnam  : मंदिरातील भिंत पडून आठ भाविकांचा मृत्यू

विशाखापट्टमधील सिंहचिलम येथील घटना

by प्रतिनिधी
0 comments
Vishakhapattnam

विशाखापट्टणम :  विशाखापट्टणममधील सिंहचलम येथील श्री वराह लक्ष्मी नरसिंह भिंत कोसळून किमान सात भाविकांचा मृत्यू झाला. बुधवारी (दि. ३०) पहाटे ही घटना चंदनोत्सवम मंदिराच्या उत्सवादरम्यान घडली. यावेळी भाविकांची मोठी गर्दी होती. मुसळधार पाऊस आणि वारा यामुळे भिंत कोसळली असण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.  आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २५ लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ३ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली आहे. (Vishakhapattnam)

महसूल देणगी विभागाचे सचिव विनय चंद यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले की, बुधवारी पहाटे अडीच ते साडेतीनच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडला. जोरदार वारे आणि अचानक या भागात येणाऱ्या पाण्याचा मोठा प्रवाह यामुळे भिंत कोसळली असावी, असे त्यांनी सांगितले.  ते म्हणाले  “भिंत मातीच्या आवरणाने वेढलेली आहे. ती माती कदाचित सैल झाली असेल. वाऱ्यामुळे, काही पंडलचे खांबही खाली पडलेले आम्हाला दिसले आहेत. वाऱ्यामुळे भिंतीभोवतीची माती सैल होण्यासही हातभार लागला असावा,” असे ते म्हणाले, ज्यामुळे भिंतीचा आधार गेला आणि ती कोसळली. (Vishakhapattnam)

मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पीडितांना शोकसंवेदना व्यक्त करताना म्हटले आहे की, “श्री वराह लक्ष्मी नरसिंह स्वामींच्या चंदनोत्सवादरम्यान भिंत कोसळून झालेल्या सात भाविकांच्या मृत्यूमुळे मला खूप दुःख झाले आहे. मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून झालेल्या या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना माझी तीव्र संवेदना आहे.”मुख्यमंत्र्यांनी घटनेची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले. तसेच मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २५ लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ३ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली. (Vishakhapattnam)

हेही वाचा :

पत्नी, मुलाची हत्या करुन सीईओची आत्महत्या

पत्नी, मुलाची हत्या करुन सीईओची आत्महत्या

भारत २४ ते ३६ तासात हल्ला करणार

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00