Home » Blog » Kill terrorists: बाबांचे डोके रक्ताने माखले होते…

Kill terrorists: बाबांचे डोके रक्ताने माखले होते…

दहशतवाद्यांना मारून टाका; मोने, जोशी, लेले कुटुंबीयांची मागणी

by प्रतिनिधी
0 comments
Kill terrorists

मुंबई : विशेष प्रतिनिधी : आम्ही सर्वजण मनसोक्तपणे निसर्गाचा आनंद लुटत होतो. एकमेकांचे फोटो काढत होते. दुपारी एकच्या सुमारास अचानक दहशतवादी आले. त्यांनी आमच्यासमोर सर्व कृर्त्या पुरूषांना मारले. मला गोळी लागली म्हणून मी खाली पडलो. थोड्या वेळाने उठलो तर बाबांचे डोके रक्ताने माखले होते…पहेलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संजय लेले यांचा मुलगा लेले सांगत होता. (Kill terrorists)

आम्ही काहीच करु शकले नाही. या सर्व दहशतवाद्यांना ठार करा, ‘शूट ॲट साइट’चे आदेश द्या, अशी मागणी दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले डोंबिवलीतील पर्यटक अतुल मोने, हेमंत जोशी आणि संजय लेले यांच्या कुटुंबीयांकडून  एकमुखाने करण्यात आली. (Kill terrorists)

पहेलगाम येथे झालेल्या हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला. त्यातील सहा जण महाराष्ट्रातील आहेत. डोंबिवली येथील अतुल मोने आणि त्यांचे नातेवाईक हेमंत जोशी आणि संजय लेले यांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी नेमकी घटना कशी घडली? त्याबद्दल माहिती दिली. (Kill terrorists)

संजय लेले यांचा मुलगा हर्षल लेलेच्या हाताला गोळी लागून गेली. त्या घटनेबाबत तो म्हणाला  की, २१ तारखेला आम्ही पहेलगाममध्ये पोहचलो. त्या परिसरात फिरत असताना अचानक गोळीबाराचा आवाज आला. सुरुवातीला आम्ही दुर्लक्ष केले. त्यानंतर गोळीबाराचा आवाज वाढू लागला. आम्ही थांबलेल्या ठिकाणी दहशतवादी आले. हिंदू वेगळे आणि मुस्लीम वेगळे व्हा, असे आम्हाला सांगितले. त्यावेळी माझ्या मामांनी सांगितले, आम्हाला जाऊ द्या, आम्ही काहीच करणार नाही. त्याचवेळी दहशतवाद्यांनी त्यांना गोळ्या घातल्या. माझ्या वडिलांनी हात वर केला तर त्यांच्या डोक्यात गोळी मारली. माझा हात त्यावेळी वडिलांच्या डोक्याजवळ होता. मला वाटले मला गोळी लागली. मी खाली पडलो. ती गोळी माझ्या हातावर लागली होती. परंतु मी जेव्हा उठलो तेव्हा पाहिले माझ्या बाबांचे डोके पूर्ण रक्ताने माखलेले होते.

दोघा दहशतवाद्यांना स्वत: पाहिले

स्थानिक लोकांनी आम्हाला त्या ठिकाणावरुन दुसरीकडे पाठवले. महिलांना घोड्यावरुन खाली पाठवले. आम्ही चालत आलो. माझ्यावर रुग्णालयात उपचार झाले. आम्हाला घटनेची काहीच माहिती दिली गेली नव्हती. पोलिस कंट्रोल रुममध्ये आम्हाला आणण्यात आले होते. त्याठिकाणी गृहमंत्री अमित शहा सर्वांची चौकशी करत होते. सकाळी सात वाजता मृतांची ओळख पटल्याचे सांगितले. या घटनेत आमच्या तिन्ही नातेवाईकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. गोळीबार करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना स्वत: पाहिले, असे हर्षलने सांगितले. (Kill terrorists)

‘तुम्ही दहशत माजवता…’

अनुष्का मोने यांनी घटनेची माहिती देताना सांगितले की, दुपारी एक ते दीडची वेळ होती. आम्ही सर्व आनंदात होते. फोटो काढत होते. त्यावेळी दहशतवादी आले. हिंदू कोण विचारले? आमच्या समोर सर्वांना मारले. आम्ही काहीच करु शकले नाही. तुम्ही या ठिकाणी दहशत माजवण्यास येता, असे ते दहशतवादी बोलत होते.  त्यांचा पर्यटकांवर राग दिसत होता, असे अनुष्का मोने यांनी सांगितले.

हेही वाचा :
दहशतवाद्यांना शोधून काढून अद्दल घडवू
सिंधू करारांतर्गत पाणी रोखणे युद्धजन्य स्थिती मानली जाईल

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00