Home » Blog » उपमुख्यमंत्रीच सुरक्षित नसतील तर राज्यात कोणीच सुरक्षित नाही; अमित देशमुख यांचा विधानसभेत हल्लाबोल 

उपमुख्यमंत्रीच सुरक्षित नसतील तर राज्यात कोणीच सुरक्षित नाही; अमित देशमुख यांचा विधानसभेत हल्लाबोल 

by प्रतिनिधी
0 comments
Amit Deshmukh's attack in the Assembly

जमीर काझी : मुंबई : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन होऊन दीड महिना होत आला असला तरी, हा अपघात कशामुळे घडला आणि त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची होती? हे अद्याप कोणत्याही यंत्रणेने पुढे येऊन सांगितलेले नाही. त्यामुळे, उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर या राज्यात कोणीच सुरक्षित नाही, अशी भावना आता राज्यातील सामान्य जनतेची झाली असल्याचे टीका काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी बुधवारी विधानसभेत केली. (Amit Deshmukh’s attack in the Assembly)

 अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होऊन बोलताना त्यांनी अजित पवार यांच्या अपघातासंदर्भाने प्रश्न उपस्थित सरकारला घेरले. ते म्हणाले की ,’अजित पवारांच्या अपघाती मृत्यूबाबत राज्याचा गृह विभाग किंवा राज्य शिष्टाचार विभाग यांच्या सचिवाकडूनही अद्याप अधिकृतरित्या काहीही सांगितले गेलेले नाही. राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री यांच्या सुरक्षितेच्या संदर्भात नक्कीच नियमावली आहे. मात्र, राज्यातील सुरक्षा यंत्रणा असोत किंवा ज्या विभागामार्फत बारामती विमानतळाचे संचालन होते त्या एमआयडीसी आणि एमएडीसी हे कोणतेच विभाग या संदर्भाने पुढे येऊन काहीच भाष्य करत नाहीत,ही अत्यंत गंभीर बाब आहे. शासनाने या संदर्भात सविस्तर निवेदन करावे, अशी मागणीही अमित देशमुख यांनी केली. त्यामुळे अजित पवारांच्या अपघाती निधनाबद्दल रोहित पवार यांनीही आता विधानसभेतही आवाज उठविला आहे.

दरम्यान, विधान परिषदेचे सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदें यांनी हा सवाल उपस्थित केला. ते म्हणाले,’ अपघात प्रकरणाची चर्चाच सभागृहात होऊ देत नाहीत. मी स्थगन प्रस्ताव आणला होता मात्र त्याला परवानगी दिली नाही. अल्पकालीन चर्चेला परवानगी दिली. मागील पाच दिवस झालं, याबाबतची चर्चा स्वीकारली मात्र अद्याप सभागृहात चर्चा होऊ दिली नाही. विधानसभा, विधानपरिषदेप्रमाणे लोकसभेत देखील बोलू देत नाहीत. त्यांच काय झालं हे आम्हाला कळायला हवं? असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला आहे. (Amit Deshmukh’s attack in the Assembly)

   रोहित पवाराकडून आभार

अमित देशमुख यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या या मुद्द्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आभार मानले. अमित देशमुख यांनी  दादांच्या अपघाताचा मुद्दा सभागृहात उपस्थित करून सरकारने स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. त्यांनी तांत्रिक बाबी उपस्थित करत सरकारला जाब विचारला आहे. या अधिवेशनातच याविषयी चर्चा घेऊन सरकार ठोस भूमिका मांडेल ही अपेक्षा आहे, अशी पोस्ट त्यांनी ‘एक्स ‘वर  केली. (Amit Deshmukh’s attack in the Assembly)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00