Home » Blog » राधानगरी धरणाचे स्वयंचलित दोन दरवाजे उघडले

राधानगरी धरणाचे स्वयंचलित दोन दरवाजे उघडले

by प्रतिनिधी
0 comments
Two gates of the Radhanagari Dam have been opened

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील महत्वाचे राधानगरी धरण शंभर टक्के भरले असून धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. दोन स्वयंचलित दरवाजे, पावर हाऊसमधून ४२५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणक्षेत्रात जोरदार सुरू झालेला पाऊस, धरणातून होणारा विसर्ग यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान सातारा जिल्ह्यातील महाराष्ट्राची जीवनवाहिणी असलेल्या कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दोन फुटांवरुन तीन फुटापर्यंत उघडले जाणार आहे. (Two gates of the Radhanagari Dam have been opened)

राधानगरी धरणातून ४२५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग

जिल्ह्यातील राधानगरी धरणात ८.३५ टीएमसी पाणीसाठा आहे. आज शुक्रवारी दुपारच्या चारच्या अहवालानुसार राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्रमांक ३ व ६ हे खुले झाले असून या स्वयंचलित द्वारामधून २८५६ व पावर हाऊस मधून १४०० असा एकूण ४२५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ,कासारी नदीवरील- यवलूज, ठाणे आळवे, बाजार भोगाव, कांटे, करंजफेण व पेंडाखळे, भोगावती नदीवरील- सरकारी कोगे, खडक कोगे, हळदी व राशिवडे, कुंभी नदीवरील- सांगरुळ दूधगंगा नदीवरील- दत्तवाड व सुळकूड, वारणा नदीवरील – चिंचोली, माणगाव, कोडोली,खोची व चावरे वेदगंगा नदी वरील- निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, चिखली, गारगोटी व म्हसवे, हिरण्यकेशी नदीवरील- साळगांव, ऐनापूर व निलजी असे एकूण ३५ बंधारे पाण्याखाली आहेत. (Two gates of the Radhanagari Dam have been opened)

जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा

           जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा (कंसात एकूण टक्केवारी)- राधानगरी 8.35 ( 100 टक्के), तुळशी 2.92 (84.23 टक्के), वारणा 29.48 (85.71 टक्के), दूधगंगा 16.54 (65.14 टक्के), कासारी 2.33 (83.97 टक्के), कडवी 2.50 (99.5 टक्के), कुंभी 2.16 (79.67 टक्के), पाटगाव 2.61 (70.18 टक्के), चिकोत्रा 0.85 (56.1 टक्के), चित्री 1.89 (100 टक्के), जंगमहट्टी 1.22 (100 टक्के), घटप्रभा 1.56 (100 टक्के), जांबरे 0.82 (100 टक्के), आंबेआहोळ 1.15 (92.77 टक्के), सर्फनाला 0.67 (100 टक्के), धामणी 1.29 (33.97 टक्के) टीएमसी इतका पाणीसाठा आहे. तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 30.9, सुर्वे 30.5, रुई 60.10, इचलकरंजी 57.9, तेरवाड 52, शिरोळ 44, नृसिंहवाडी 41.6 तर नजीकच्या सांगली जिल्ह्यातील अंकली येथे 19.8 फूट इतकी पाणीपातळी आहे. (Two gates of the Radhanagari Dam have been opened)

कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे तीन फुटापर्यंत उचलणार

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील चालू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे.  कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी आज शुक्रवारी ३१ जुलै  रोजी रात्री  दहा वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दोन फुटावरून तीन  फुटापर्यंत उघडून १६,५३५ क्युसेक  विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू असून त्याद्वारे १०५० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण १७,५८५ क्युसेक विसर्ग सुरू होईल.धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी एका पत्रकाद्वारे दिला आहे. (Two gates of the Radhanagari Dam have been opened)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!