नवी दिल्ली : न्यझीलंडविरुद्ध् होणार एक दिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. शुभमन गिल कर्णधार असून १५ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला विश्रांती देण्यात आली आहे. (Indian squad announced for the series against New Zealand)
दुखापतीमुळे बाहेर असलेल शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर दोघेही संघात परत आहेत. गिलकडे कर्णधारपद तर अय्यरकडे उप कर्णधारपद दिले आहे. जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराज संघात परतला आहे. ऋतुराज गायकवाड आणि तिलक वर्माला संघातून वगळले आहे. ऋषभ पंतने संघात आपले स्थान कायम ठेवले आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या नीतीश कुमार रेड्डी, हर्षित राणाला संघात स्थान दिले आहे. मोहम्मद शमीचा संघात समावेश केलेला नाही. (Indian squad announced for the series against New Zealand)
असा आहे संघ
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल (यष्टिरक्षक), श्रेयस अय्यर, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, हर्षित राणा आणि नीतीश कुमार रेड्डी. (Indian squad announced for the series against New Zealand)