मुंबई; वृत्तसंस्था : जर्मन अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान समूह सिमेन्सचे वरिष्ठ अधिकारी म्हणतात की, जर्मनी आणि फ्रान्ससारख्या देशांना मागे टाकून भारत पुढील तीन वर्षांत सिमेन्ससाठी शीर्ष ३ किंवा ४ सर्वात मोठी बाजारपेठ बनू शकेल. भारत सध्या सिमेन्सची पाचवी सर्वात मोठी बाजारपेठ आहे आणि कंपनीच्या एकूण महसुलात ३.५-४ टक्के योगदान देते.
भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ आहे. इतर देशांची कामगिरी काय आहे यावर ते अवलंबून आहे. त्यांनी भारताच्या वाढत्या क्षमतेवर भर दिला आणि सांगितले, की देशाने लोकोमोटिव्ह, सिमेंट आणि रसायने क्षेत्रासारख्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. त्यांच्या मते, भारतात जेवढ्या पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत. ते जगातील दुसऱ्या क्रमांकाचे आहे. ‘सिमेन्स’चा फोकस केवळ उत्पादनावर नाही, तर तंत्रज्ञानावरही आहे. भारताचे गेमिंग मार्केट पुढील ५ वर्षांत ९.२ अब्ज डॉलरपर्यंत वाढेल. अमेरिकेपाठोपाठ आता चीन हे पाऊल उचलणार, भारतासमोर मोठे आव्हान असेल का? भारत ही कामगिरी करत चीन, जपान आणि स्वित्झर्लंडनंतर चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. सिमेन्स कंपनी केवळ उत्पादन कंपनी न ठेवता तंत्रज्ञानावर अधिक लक्ष केंद्रित करण्याच्या दिशेने पावले उचलत आहे.
या अंतर्गत ‘सिमेन्स’ने ‘अल्टेअर इंजिनिअरिंग’ नावाची कंपनी १०.६ अब्ज डॉलर्समध्ये विकत घेतली आहे. मुंबईत आयोजित ट्रान्स्फॉर्म-इनोव्हेशन डे २०२४ कार्यक्रमादरम्यान ‘सिमेन्स’चे प्रमुख पीटर कोरेटे यांनी नवीन रणनीती आणि तंत्रज्ञानातील बदलांची माहिती दिली. कंपनीचे लक्ष केवळ उत्पादने विकण्यापुरते मर्यादित नाही, तर ते तांत्रिक उपाय आणि सॉफ्टवेअरमधून उत्पन्न वाढविण्याचे काम करत आहे. येत्या काही वर्षांत भारताला एक महत्त्वाची आणि वाढणारी बाजारपेठ म्हणून उदयास येण्यास मदत करण्याचे उद्दिष्ट आहे.
‘सिमन्स’चे भारतात ३२ कारखाने
‘सिमेन्स’चे भारतात ३२ कारखाने आहेत आणि ते त्यांचा विस्तारही करत आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने १०० दशलक्ष युरोच्या भांडवली खर्चाच्या विस्ताराची घोषणा केली. यातील काही भाग या कारखान्यांच्या विस्तारासाठी खर्च केला जाईल.