Home » Blog » मुलगा जन्माला यावा यासाठी पतीने पत्नीचे केस कापून स्मशानात जाळले

मुलगा जन्माला यावा यासाठी पतीने पत्नीचे केस कापून स्मशानात जाळले

by प्रतिनिधी
0 comments
Husband cuts wife's hair

विजयपूरा : तीन मुलीनंतर मुलगा जन्माला यावा यासाठी पतीने पत्नीचे केस कापून स्मशानात जाळले. भोंदू महिलेच्या सल्ल्यानंतर हे कृत्यू केले. केस कापताना महिलेच्या डोक्याला जखमा झाल्याने तिला हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आल्यानंतर संबधित प्रकार उघड झाला आहे. संबधित महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. (Husband cuts wife’s hair)

३१ वर्षीय ज्योती दुंदेश दुलावायीने पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. तक्रारीत तिने म्हटले आहे की आठ वर्षापूर्वी तिचा विवाह दुंदेश दलावायीशी झाला. त्यांना तीन मुली आहेत. आम्हाला मुलगा नसल्याने सासरचे लोक आणि पती एक वर्षापासून छळ करत होते. पती दारुच्या नशेत सतत मारझोड करत होता. ज्योतीचा पती दुंदेश आणि तिच्या नातेवाईकांनी २५ नोव्हेंबरला एका मंगला नावाच्या भोंदू महिलेला बोलावून घेतले. तिने माझ्या घरच्यांना सांगितले की माझ्यात एक राक्षस आहे. माझे केस कापून आणि ब्लेडने माझ्यावर डोक्यावर रक्त सांडून टाकावे असे सांगितल्यावर माझ्या पतीने माझे केस कापले. केस कापताना माझ्या डोक्याला दुखापती झाल्या. दुखापती बऱ्या करण्यासाठी मला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. (Husband cuts wife’s hair)

पोलिस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी यांनी विजयपुरा ग्रामीण पोलिस ठाण्यात पती आणि नातेवाईकांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती दिली. दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये सात वर्षापेक्षा कमी शिक्षेची तरतूद आहे. त्यासाठी आम्हाला संशयितांचे जबाब घ्यावे लागतील. पती दुंदेश आणि भोदू महिला मंगला यांना कोर्टासमो हजर केल आहे. वृद्ध सासू सासऱ्यांना नोटीस पाठवली आहे. चारही संशयितांविरोधात आरोपपत्र दाखल केले जाईल असेही निंबर्गी यांनी सांगितले. (Husband cuts wife’s hair)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00