पॅरीस : अनेक दिवसांच्या अटकळीनंतर सोव्हिएत काळातील अंतराळयान कॉसमॉस ४८२ पृथ्वीवर कोसळले. रशियाची अंतराळ संस्था ‘रोसकॉसमॉस’ने त्याला दुजोरा दिला आहे. हे यान ते हिंदी महासागरातील मध्य अंदमान बेटापासून ५६० किमी पश्चिमेला पडले. (Kosmos 482)
अर्ध्या शतकाहून अधिक काळ कक्षेत अडकल्यानंतर सोव्हिएत काळातील एका अंतराळयानाचा काही भाग पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करेल अशी शक्यता युरोपियन स्पेस एजन्सीने वर्तवली होती.
१९७२ मध्ये शुक्र ग्रहाच्या मोहिमेवर सोव्हिएतचे कॉसमॉस ४८२ हे यान सोडण्यात आले होते. मात्र ते कधीही पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडू शकले नाही. त्याऐवजी त्याचे चार तुकडे झाले. ते पाच दशकांहून अधिक काळ ग्रहाभोवती फिरत होते. (Kosmos 482)
शुक्राकडे जाणारे ५३ वर्षे जुने शीतयुद्धकालीन सोव्हिएत अंतराळयान ते जमिनीवर कोसळू शकते, असे सांगण्यात येत होते. मात्र ते समुद्रात सुरक्षितपणे पडले.
पृथ्वीजवळील अवकाशातील धोकादायक परिस्थितींसाठी स्वयंचलित चेतावणी प्रणालीद्वारे या अंतराळयानाच्या उतरण्याचे निरीक्षण केले जात होते, असे रोसकॉसमॉसने टेलिग्राम अपडेटमध्ये म्हटले आहे. (Kosmos 482)
द गार्डियनच्या वृत्तानुसार, युरोपियन स्पेस एजन्सीच्या (ESA) अंतराळ कचऱ्याच्या कार्यालयानेही पुष्टी केली की ते जर्मन रडार स्टेशनवरून दिसू शकले नाही. त्याने पुन्हा वातावरणात प्रवेश केला.
१९७२ मध्ये हे यान प्रक्षेपित केले होते. त्याचे वजन ५०० किलोपेक्षा कमी होते. मात्र शुक्र ग्रहावर जाताना त्यात बिघाड झाला. टायमरच्या समस्येमुळे इंजिन लवकर बंद पडले. हे सोव्हिएत अंतराळयान अर्ध्या शतकाहून अधिक काळ पृथ्वीच्या कक्षेत अडकले. कॉसमॉस ४८२ चे लँडर कॅप्सूल शुक्र ग्रहाच्या वातावरणातील अति उष्णता आणि दाबापासून वाचण्यासाठी बनवण्यात आले होते, म्हणजेच त्याची एक मजबूत उष्णता ढाल आणि टिकाऊ रचना होती. त्यामुळेच ते पृथ्वीच्या अनियंत्रित उतरणीतून वाचले असावे, असे तज्ज्ञांना वाटते.
हेही वाचा :
शस्त्रसंधीनंतर शेअर बाजारात दणदणीत तेजी
भारतातील ३२ विमानतळे पुन्हा सुरू होणार