Home » Blog » Gang Rape : भाजप प्रदेशाध्यक्षावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा

Gang Rape : भाजप प्रदेशाध्यक्षावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा

गायक जय भगवानचाही समावेश; दिल्लीच्या महिलेची तक्रार

by प्रतिनिधी
0 comments
Gang Rape

चंदीगढ : हरियाणा भाजप प्रदेशाध्यक्ष मोहनलाल बडोली आणि गायक रॉकी मित्तल उर्फ ​​जय भगवान या दोघांवर सामूहिक बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. यासंबंधीची तक्रार नवी दिल्लीतील एका महिलेने केली आहे. हिमाचल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बडोली यांनी आरोपांचे खंडन केले आहे. सर्व आरोप ‘निराधार’ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.(Gang Rape)

कथित गुन्हा ३ जुलै २०२३ रोजी मंकी पॉइंट रोड, कसौली येथील हिमाचल प्रदेश पर्यटन विकास महामंडळाच्या रॉस कॉमन हॉटेलमध्ये घडला होता. याबाबतची फिर्याद १३ डिसेंबर रोजी सोलन जिल्ह्यातील कसौली पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. मंगळवारी ही घटना समोर आली. एफआयआरमध्ये दोन्ही आरोपींचे तपशीलवार पत्ते आणि मोबाइल फोन नंबरचा उल्लेख आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने हे वृत्त दिले आहे. (Gang Rape)

या दोघांवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ ड (सामूहिक बलात्कार) आणि ५०६ (गुन्हेगारी-धमकावणे) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

फिर्यादीत तक्रारदाराने, ती ३ जुलै २०२३ रोजी तिच्या दिल्लीस्थित नियोक्ता आणि मित्रासह हिमाचल प्रदेशमध्ये पर्यटक म्हणून आली होती. त्यावेळी कथितपणे ही घटना घडली. ती तिच्या मैत्रिणीसह आरोपीला भेटली. त्यापैकी एकाने स्वत:ची ओळख मोहन लाल बडोली (ज्येष्ठ राजकारणी) तर दुसऱ्याने स्वत:ची ओळख रॉकी मित्तल उर्फ ​​जय भगवान, गायक म्हणून करून दिली, असे म्हटले आहे. (Gang Rape)

तिने पुढे सांगितले की, त्यांनी दोघींना त्यांच्या खोलीत बोलावले. जय भगवान यांनी मला सांगितले की ते मला त्यांच्या अल्बममध्ये नायिका म्हणून साइन करतील. मोहनलाल बडोली यांनी त्यांचे वरपर्यंत संबंध आहेत. सरकारी नोकरी मिळवून देऊ, असे सांगितले. मग त्यांनी आम्हाला दारूची ऑफर दिली, पण आम्ही नाकारली.

जीवे मारण्याची धमकी, आक्षेपार्ह फोटो

“तरीही त्यांनी आम्हाला जबरदस्तीने दारू प्यायला लावली. त्यानंतर त्यांनी मला त्रास देण्यास सुरुवात केली. मी आक्षेप घेतला. त्यानंतर त्यांनी  गंभीर परिणाम होतील, अशी धमकी दिली. मैत्रिणीला एका बाजूला बसायला सांगितले. सांगेल तसे करण्यास नकार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर या दोघांनीही माझ्यावर बलात्कार केला. त्यांनी आक्षेपार्ह अवस्थेतील छायाचित्रे आणि व्हिडिओ देखील केला,’ असे संबंधित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.

‘मी ही बाब पोलिसांना किंवा कोणाला सांगितल्यास त्यांनी मला गायब करण्याची धमकी दिली. सुमारे दोन महिन्यांपूर्वी त्यांनी आम्हाला पंचकुलाला बोलावून खोट्या फौजदारी खटल्यात अडकवण्याची धमकी दिली. त्यानंतर, आम्ही रॉकी मित्तलचा पंचकुला येथील पत्ता आणि बडोलीचा सोनीपतमधील पत्ता आणि त्यांचे मोबाईल नंबर शोधण्यात यशस्वी झालो. आता मला न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी माझी विनंती आहे. तसेच, माझे आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो आणि व्हिडिओ त्यांच्या मोबाईल फोन नंबरवरून हटवावेत,’ असे या महिलेने म्हटले आहे. (Gang Rape)

बडोलींनी आरोप फेटाळले

बडोली यांनी, हे सर्व निराधार आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. हा सर्व काय प्रकार आहे ते समजत नाही. खोटा एफआयआर असू शकेल.. दिल्लीतील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा खोट्या एफआयआरचे भांडवल केले जाऊ शकते, असे म्हटले आहे.

जबाब नोंदवले

तथापि, पोलिस अधीक्षक (सोलन), गौरव सिंह यांनी या संदर्भात गुन्हा दाखल झाल्याचे म्हटले आहे. कसौली पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. काही संशयितांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. काहींचे जबाब येत्या काही दिवसांत नोंदवायचे आहेत, असे त्यांनी सांगितले.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00