Home » Blog » Five dead in train accident : रेल्वेतून पडून सात प्रवाशांचा मृत्यू

Five dead in train accident : रेल्वेतून पडून सात प्रवाशांचा मृत्यू

by प्रतिनिधी
0 comments
Five dead in train accident

मुंबई : प्रतिनिधी : ठाणे जिल्ह्यातील दिवा ते मुंब्रा स्थानकादरम्यान रेल्वेमधून पडून सात प्रवाशांच्या मृत्यू झाला आहे. रेल्वेतून किमान दहा ते बारा प्रवाशी पडल्याची माहिती पुढे आली आहे. हे प्रवासी लोकलमधून पडले की एक्सप्रेसमधून पडले याबाबत संभ्रमावस्था आहे. तर कसाराहून मुंबईकडे जाणाऱ्या फास्ट लेकलमध्ये असलेल्या गर्दीमुळे प्रवासी खाली पडल्याची प्राथमिक माहिती पुढे आहे. सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. (Five dead in train accident)

ठाण्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ काही प्रवासी रेल्वेतून खाली पडले. रेल्वेमध्ये प्रवाशांची जास्त गर्दी असल्याने प्रवासी पडल्याची माहिती पुढे आले आहे. गर्दीमुळे अनेक प्रवाशी दरवाजाजवळ लोंबकळत होते. दहा ते बारा प्रवासी पडले असून काही प्रवासी फलाटांवर तर काही प्रवासी बाजूच्या रेल्वे पुलवर पडले आहेत. जखमींना तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. रेल्वेकडून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रविण पाटील यांनी प्रवासी एक्सप्रेसमध्ये पडले की लोकल रेल्वेतून पडले हे माहित नसल्याचे सांगितले. कसारा लोकल गार्डने अपघाताची पहिल्यांदा माहिती दिल्याचे पाटील यांनी सांगितले. (Five dead in train accident)

दरम्यान मिळालेल्या माहिती नुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने लोकल निघाली होती. या लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. रेल्वे मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ आली असता सीएम्सएमटीकडून लखनौला जाणारी पुष्पक एक्सप्रेमस समोरुन आली. एक्सप्रेसची रेल्वे आणि लोकल रेल्वे बाजूने जात होत्या. मात्र लोकलच्या दारात लोंबकळत उभे असलेले प्रवाशी एक्सप्रेसला घासले गेले आणी ते खाली पडले. एकामागून एक प्रवाशी पडले. त्यापैकी पाच प्रवाशांच्या मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. (Five dead in train accident)

मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत

मुंब्रा येथील रेल्वे स्थानकाजवळ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या लोकल गाडीतून पडून मृत पावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. जखमींना ५० हजार ते दोन लाखांपर्यंतची मदत करण्यात येणार आहे. शिवाय, त्यांच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00