Home » Blog » मुख्यमंत्री शिंदेंविरोधात गुन्हा दाखल करा

मुख्यमंत्री शिंदेंविरोधात गुन्हा दाखल करा

नसीन खान यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

by प्रतिनिधी
0 comments
Naseem Khan file photo

मुंबई; विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीचे मतदान सुरु असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांदिवली मतदारसंघात अनधिकृतपणे भेट दिली. शिवसेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांच्यासाठी रोड शो करून मतदान करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री शिंदे यांची ही कृती आदर्श आचारसंहितेचा भंग करणारी आहे.  शिंदे आणि दिलीप लांडेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार महाविकास आघाडीचे उमेदवार नसीम खान यांच्या मुख्य पोलिंग एजंट गणेश चव्हाण यांनी निवडणूक अधिकाऱ्याकडे केली आहे. (Naseem Khan)

तक्रारीत असे म्हटले आहे की, निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतदानाच्या दिवसापूर्वी ४८ तास इतर मतदार संघातील उमेदवार किंवा कोणतेही राजकीय नेते यांना स्वतःच्या मतदारसंघाव्यतिरिक्त इतर मतदार संघात प्रवेश करण्यास मनाई आहे. असे असताना मुख्यमंत्री  शिंदे यांनी चांदिवलीतील शिवसेनेचे उमेदवार लांडे यांच्यासाठी मतदान सुरु असताना  दुपारी ३च्या सुमारास काजुपाडा घास कंपाऊंड ते सेंट ज्युड हायस्कूल भागात रोड शो केला. शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले. रोड शो काढलेल्या भागात अनेक मतदान केंद्रे आहेत. हा आचारसंहितेचा उघड भंग आहे. त्यामुळे शिंदे यांच्यावर कारवाई करावी.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00