Home » Blog » बंडखोरांना रोखण्यासाठी फडणवीस ‘ॲक्शन मोड ‘वर!

बंडखोरांना रोखण्यासाठी फडणवीस ‘ॲक्शन मोड ‘वर!

by प्रतिनिधी
0 comments
Fadnavis is in 'action mode' to stop the rebels

 जमीर काझी :  मुंबई  :  बृहन्मुंबई, ठाणे महापालिकेसह राज्यातील २९ महापालिकेच्या निवडणुक प्रचाराचा ज्वर वाढत असताना राज्यात व केंद्रातील सत्तेत सर्वाधिक वाटा असलेल्या भाजपाला अनपेक्षितपणे मोठ्या प्रमाणात बंडखोरीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. तिकीट न मिळाल्याने  नाराजांनी पक्ष शिस्तीची पर्वा न करत उघडपणे बंडाचे निशाण फडकविल्याने चर्चेचा विषय बनला आहे. त्यांची समजूत काढून रोखण्यासाठी आता राज्यातील भाजपाचे सर्वोच्च नेते व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः मैदानात उतरले आहेत. नाराजाशी स्वतः बोलून त्यांना माघारीसाठी प्रवृत करीत आहेत. मुंबईसह राज्यभरातील ठिकठिकाणी प्रमुख बंडखोराशी संवाद साधत आहे. त्यांना अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अर्ज माघारीसाठी शुक्रवारी पर्यत मुदत असल्याने त्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न सुरु आहेत. (Fadnavis is in ‘action mode’ to stop the rebels)

 भाजपाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत ही सर्वात जास्त जागा जिंकण्यासाठी मोठी तयारी केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मोठया प्रमाणात विरोधी पक्षातील नेत्यांना प्रवेश दिला आहे. त्यापैकी अनेकांना तिकीट मिळाल्याने भाजपातील मूळ निष्ठावंत काहीसे दुखावले गेले आहेत. पक्षाने डावलल्याने नगरसेवक होण्याच्या स्वप्नांचा चुराडा झाला. त्यामुळे अनेकांनी अपक्ष म्हणून अर्ज भरल्याने पक्षापुढे संकट उभे ठाकले आहे. ज्या साहेबांसाठी पायाला भिंगरी लावून फिरलो. कार्यकर्ते जमा केले. पक्षाच्या सतरंज्यापासून ते मंडप टाकण्याची कामं केली. पक्षासाठी खस्ता खाल्या. अनेक कार्यक्रम राबवले. त्याला मंत्रिमहोदय उद्धघटनासाठी आले पण उमेदवारी कापली गेल्यानंतर ते साहेब फोन सुद्धा घेत नसल्याचा टाहो ते फोडत आहेत. त्यामध्ये अनेकांन भोवळ आली, कुणाला भावनावेग आवरता आला नाही. या सर्व नाराजीची दखल स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. (Fadnavis is in ‘action mode’ to stop the rebels)

राज्यातील प्रमुख शहरातील बंडखोरांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून संपर्क करण्यात येत आहे. पक्षातील निष्ठावंतांशी स्वतः मुख्यमंत्री बोलले आहेत. निवडणुकीत माघार घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांचा अनेक अपक्षांसोबत संवाद झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.बंडखोरी शमवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून बंडखोरांना राजकीय पुनर्वसनाचा शब्द दिल्याचीही माहिती समोर येत आहे. तर काही बंडखोरांना शांत करण्याची जबाबदारी स्थानिक नेत्यांवर सोपविली आहे.

स्थानिक बंडखोरी वेळीच रोखण्यासाठी स्थानिक नेते आता अनेक बंडखोरांच्या घरी जाऊन त्यांना समजावून सांगत असल्याचे समजते. या नेत्यांनी त्यांना भाजपची पक्ष शिस्तसह संयमाची आठवण करुन दिल्याचे समजते. त्यांच्या कुटुंबियांशी ही बडी नेते संवाद साधत आहेत. त्यातील काहींनी तर आपल्याला किती वर्षानंतर पक्षाने न्याय दिला याची उजळणी करत आहेत. बंडखोरांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (Fadnavis is in ‘action mode’ to stop the rebels)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00