Home » Blog » नागनाथअण्णांच्या कन्या प्रगती पाटील यांचे निधन

नागनाथअण्णांच्या कन्या प्रगती पाटील यांचे निधन

by प्रतिनिधी
0 comments
Pragati Patil has passed away

वाळवा :  पद्मभूषण क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णा नायकवडी यांच्या द्वितीय कन्या सौ. प्रगती उमाजी पाटील (वय ६९), रा. सागाव) यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले. 

विश्वास कारखान्याचे माजी चीफ इंजिनिअर तसेच पद्मभूषण क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याचे तांत्रिक सल्लागार उमाजी पाटील यांच्या त्या पत्नी होत. (Pragati Patil has passed away)

प्रगती नायकवडी या राष्ट्रीय खो-खो खेळाडू होत्या. त्यांचे शिक्षण एम.ए. पर्यंत झाले होते. त्या विद्यार्थी दशेपासून क्रांतिवीर नागनाथअण्णांच्या सर्व चळवळीत सहभागी असत. विश्वास सहकारी पतसंस्थेत त्या संचालकही होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा व सून असा परिवार आहे.  प्रगतीताईंच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान सांगलीतील भारती हॉस्पीटल येथे करण्यात आले. देहदान करुन वैद्यकीय शिक्षणासाठी मौलाचे योगदान देऊन क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णांच्या विचाराचा वारसा खऱ्या अर्थाने जपला आहे. (Pragati Patil has passed away)

त्यांच्या निधनाने हुतात्मा शिक्षण व उद्योग समुहाने व कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व संस्थांनी दुखवटा जाहिर केला. सांगलीतील भारती हॉस्पीटल येथे जाऊन विविध क्षेत्रातील लोकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेऊन आदरांजली वाहिली. (Pragati Patil has passed away)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00