Home » Blog » डोकाडिया कुटुंबियांचा मृत्यू  कलिंगडमुळे नसून उंदीर मारण्याच्या औषधामुळे  

डोकाडिया कुटुंबियांचा मृत्यू  कलिंगडमुळे नसून उंदीर मारण्याच्या औषधामुळे  

0 comments
Death of Dokadiya family due to medicine to kill Undir

जमीर काझी : मुंबई :  पायधुनीतील डोकाडिया कुटुंबातील चार जणांचा अकस्मित झालेल्या मृत्यूचे नेमके कारण अखेर वैद्यकीय तपासातून समोर आले आहे. डकोडिया दाम्पत्य आणि त्यांच्या दोन्ही मुलीच्या शरीरात  उंदीर मारण्यासाठी वापरले जाणारे झिंक फॉस्फाइट औषधाचे अंश आढळले आहे. त्यामुळे  बिर्याणी आणि त्यानंतर  कलिंगड खाल्ल्याने विषबाधा झाल्याच्या नसल्याचे स्पष्ट झाले आहे. (Death of Dokadiya family due to medicine to kill Undir)

   २६ एप्रिलला अवघ्या काही तासांच्या अंतरात  अब्दुल्ला डोकाडिया (वय ४४) त्यांची पत्नी नसरीन (३५) आयेशा (१६) आणि झैनब (१३) यांचा अचानक मृत्यू झाला होता. चौघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. ‘फुड पॉयझनिंग’मुळे त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली गेली.त्यामुळे कलिंगडाच्या विक्रीवर मोठी घट झाली होती. (Death of Dokadiya family due to medicine to kill Undir)

 चौघांच्याही शरीरात  उंदीर मारण्याच्या औषधाचे झिंक फॉस्फाइट चे अंश आढळून आले आहेत. चौघांच्या शरीरात देखील झिंक फॉस्फाइट आढळून आले आहे. चौघांनी २५ एप्रिलला रात्री बिर्याणी व त्यानंतर मध्यरात्री कलिंगड खाल्ले होते.त्यानंतर सकाळपासून त्यांना जुलाब व उलट्या सुरू झाल्या.

सुरुवातीला फूड पॉइजनिंगचे प्रकरण असल्याचं मानले जात होते . मात्र फॉरेन्सिक रिपोर्टमुळे प्रकरणाने वेगळच वळण घेतलं. सूत्रांनुसार, जेव्हा मृतांच्या शरीराचा तपास झाला, तेव्हा डॉक्टरही हैराण झाले. मृतांचे अंतर्गत अवयव उदा, मेंदू, हृदय आणि आतड्यांचा रंग हिरवा झाला होता. सर्वसाधारणपणे शरीरातील अवयवांचा रंग बदलण्यामागील कारण विषामुळे होत असल्याचे दिसते. (Death of Dokadiya family due to medicine to kill Undir)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00