मुंबई : प्रतिनिधी : उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू, असे वक्तव्य भाजपचे नेते कृपाशंकरसिंह यांनी केले. त्यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. मुंबईत मराठीच महापौर होईल या राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर कृपाशंकरसिंह यांनी केलेल्या वक्तव्याचे निवडणूकीत पडसाद उमटण्याची शक्यता आहे. (Controversial statement by Kripashankar Singh)
राज्यातील २९ महानगरपालिका निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून छाननी प्रक्रियाही पूर्ण झली आहे. मीरा भाईंदरमध्ये भाजप नेते कृपाशंकर सिंह म्हणाले, बिहारच्या निवडणुकीनंतर ही नववी सार्वजनिक निवडणूक आहे. लवकरच महानगरपालिका निवडणूका व्हाव्यात अशी जनतेची इच्छा होती. मीरा भाईंदरसह २९ महानगरपालिकांमध्ये भाजप महायुतीची सत्ता येईल. शिवाय इतके नगरसेवक निवडून आणू की उत्तर भारतीय महापौर बसेल असा दावा कृपाशंकरसिंह यांनी केले आहे. (Controversial statement by Kripashankar Singh)
नकली शिवसेना गेली असून आता खरी शिवसेना आमच्याबरोबर आहे असा दावाही कृपाशंकर सिंह यांनी केला. उत्तर प्रदेशात बाबा का बोलडोझर चालतो तसा देवेंद्र फडणवीस यांनी विकासाचा बुलडोझर महाराष्ट्रात सुरू केला आहे. जो कोणी विकासाच्या आड येईल त्यांना उद्धवस्त करुन भाजपच्या नेतृत्वाखाली २९ महानगरपालिकांमध्ये भाजप महायुतीची सत्ता येईल, असेही कृपाशंकरसिंह म्हणाले. (Controversial statement by Kripashankar Singh)