Home » Blog » Lottery : कोल्हापुरातील लॉटरीच्या तिकीटाला ५० लाखाचे बक्षीस

Lottery : कोल्हापुरातील लॉटरीच्या तिकीटाला ५० लाखाचे बक्षीस

महाराष्ट्र गुढीपाडवा सोडत

by प्रतिनिधी
0 comments
Lottery

मुंबई : प्रतिनिधी :  महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात मासिक सोडती तसेच साप्ताहिक सोडती काढल्या जातात. महाराष्ट्र गुढीपाडवा भव्यतम सोडतील ५० लाख रुपयांचे बक्षिस कोल्हापुरातील लॉटरी सेंटरमधील तिकीटाला लागले आहे. महाराष्ट्र गुढीपाडवा भव्यतम सोडत तिकीट क्रमांक GP-0५ / 19259 या  कोल्हापुरातील महावीर लॉटरी सेंटर मधून  विक्री झालेल्या तिकीटास रक्कम ५०  लाखाचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षीस जाहीर झाले आहे. (Lottery)

महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात मासिक सोडती तसेच साप्ताहिक सोडती काढल्या जातात. मार्च २०२५ मध्ये २९ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्र गुढीपाडवा (भव्यतम) सोडत काढण्यात आली.  ७ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्र सहयाद्री, १२ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्र गणेशलक्ष्मी होळी विशेष, १९ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्र गौरव, २१ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्र तेजस्विनी व २५मार्च २०२५ रोजी महाराष्ट्र गजराज या मासिक सोडती काढण्यात आल्या. असल्याचे वाशी येथील महाराष्ट्र राज्य लॉटरी कार्यालयाचे उपसंचालक (वित्त व लेखा), यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे. (Lottery)

महाराष्ट्र गुढीपाडवा भव्यतम सोडत तिकीट क्रमांक GP-0५ / 19259 या महावीर लॉटरी सेंटर, कोल्हापूर यांचेकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम ५० लाखाचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षीस जाहीर झाले आहे. महाराष्ट्र गौरव तिकिट क्रमांक G 11 / 1590 या श्रीगणेश एंटरप्रायजेस, मुंबई यांचेकडून -विक्री झालेल्या तिकिटास रक्कम ३५ लाखाचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस जाहिर झाले आहे. तसेच महा. सागरलक्ष्मी ते महाराष्ट्रलक्ष्मी या साप्ताहिक सोडतीमधून रक्कम ७ लाखाचे प्रथम क्रमांकाचे एकूण पाच बक्षिसे जाहीर झाली आहेत. (Lottery)

मार्च- २०२५ मध्ये मासिक व भव्यतम सोडतीतून १९ हजार ३४८ तिकीटांना १ कोटी ६३ लाख १३ हजार ५०० रुपयांचे बक्षिस जाहीर झाले आहे.  साप्ताहिक सोडतीतून ५५ हजार ७०२ तिकीटांना १ कोटी ९९ लाख ७२ हजार ७०० रुपयाचे बक्षिसे जाहीर झाली आहेत. (Lottery)

सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या संकेतस्थळावर नमूद प्रक्रिया पूर्ण करून दहा हजार रुपया वरील बक्षिसाची मागणी उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाशी या  कार्यालयाकडे सादर करावी. रक्कम  दहा हजार रुपयांच्या आतील बक्षिस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावी, असे उपसंचालक (वित्त व लेखा) यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे. (Lottery)

हेही वाचा :

नॅशनल हेराल्ड : नेहरू ते गांधी

अमित शहा महाराष्ट्रातील तीन पक्ष चालवतात

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00