Home » Blog » जर्मनी, स्वीडनचे दणदणीत विजय; जपान,नेदरलँड सामना बरोबरीत

जर्मनी, स्वीडनचे दणदणीत विजय; जपान,नेदरलँड सामना बरोबरीत

by प्रतिनिधी
0 comments
Resounding victories for Germany and Sweden

नवी दिल्ली : फिफा वर्ल्डकप २०२६ च्या स्पर्धेतील साखळी सामन्यात बलाढ्य जर्मनी आणि स्वीडन संघांनी दणदणीत विजयाची नोंद केली. जर्मनीने विश्वचषक स्पर्धेत प्रथम खेळणाऱ्या कुराकाओ चा ७-१ असा धुव्वा उडवला. स्वीडनने ट्युनिशिआवर ५-१ अशा एकतर्फी विजयाची नोंद केली. बलाढ्य नेदरलँडला चुरशीच्या सामन्यात जपानने २-२ असे बरोबरीत रोखले तर आयव्हरी कोस्टने इक्वाडेरला १-० असे पराभूत केले.  (Resounding victories for Germany and Sweden)

ट्युनिशिया विरुध्द झालेल्या सामन्यात स्वीडनचे वर्चस्व होते. सातव्या मिनिटाला अयारीने लांब पल्लयाच्या वेगवान फटकाने गोल जाळ्याचा वेध घेतला. ३० व्या मिनिटाला स्वीडनने आघाडी वाढवली. व्हिक्टर ग्योकेरेसने टयूनिशिआच्या गोलक्षेत्रात चढाई केली. त्याने अलेक्झांडरला पास दिला. त्याने बचावफळी आणि गोलरक्षक मौहिब चमाखला चकवत गोल नोंदवला. त्याचा हा १८ वा आंतरराष्ट्रीय गोल होता. मध्यंरापूर्वी ओमर रेकिकने सुरेख हेडरद्वारे गोल करत स्वीडनची आघाडी कमी करत सामना २-१ अशा स्थितीत आणला.

उतरार्धात स्वीडनचे सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व होते. खेळ सुरू झाल्यावर इसाकने चेंडूला ताबा मिळवून ग्योकेरेसला पास दिला. त्याने कोणतीही चूक न करता गोल नोंदवला. ८४ व्या मिनिटाला मॅटियास स्वानबर्गने गोल केला. स्टॉपेज टाईमध्ये अयारीने वेगवा फटक्यावर गोल केला. चार गोलची घसघशीत आघाडी मिळवत स्वीडनने सामना ५-१ अशा फरकाने जिंकला. (Resounding victories for Germany and Sweden)

जर्मनीचा कुराकाओ वर विजय

विश्वचषक स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या कुराकाओ विरुद्ध जर्मनीच्या फेलिक्स नमेचाने गोल नोंदवत आघाडी मिळवून दिली. त्यानंतर कुराकाओचा लिवोनो कोमेनेन्सियाने गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला. त्यानंतर जर्मनीच्या गोलचा धडका सुरू झाला. ३८ व्या मिनिटाला निको श्वॉटरबेकने जर्मनीला पुन्हा आघाडी मिळवू दिली. त्यानंतर जर्मनीला मिळालेल्या पेनल्टी किकचे रुपांतर हावर्टझ् ने गोलमध्ये केले. त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये जुमाल मुसियाला, नॅथॅनियल ब्राऊन, डेनिझ उंडावने गोल केले.

जपानने नेदरलँडला रोखले

रविवारी टेक्सासमध्ये एटी अँड स्टेडियमवर झालेल्या सामन्यात ८८ व्या मिनिटाला जपानच्या दाइची कामाडाने अखेरच्या क्षणी गोल करत नेदरलँडविरुद्ध जपानला २-२ अशी बरोबरी मिळवून दिली. अतिशय रोमांचक झालेल्या सामन्यात कोकी ओगावाच्या कॉर्नरवर कामाडाने मारलेला हेडर डच गोलरक्षक बार्ट वब्रुगेनला चकवून गोलजाळ्यात गेला.

या सामन्यात पूर्वार्धात गोलफलक कोरा होता. उत्तरार्धात गोलची कोंडी फुटली. डच कर्णधार व्हर्जिल व्हॅन डाईकने गोल केला. रायन ग्राव्हनबर्चने दिलेल्या पाचवर डेडरद्वारे त्याने गोल केला. त्यानंतर जपानने प्रत्युत्तर दिले. ताफेकुसा कुबोने केटा नाकामुराला दिलेल्या पासवर व्हब्रुर्गुनला चकवून सामना १-१ असा बरोबरीत आणला. ६४ व्या मिनिटाला डचांनी गोल करत सामन्यात आघाडी घेतली. क्रिसेंशियो समरवेलने गोल केला.

आयव्हरी कोस्टचा इव्केडरवर विजय

फिलाडेफ्लिया स्टेडियमवर इ गटात आयव्हरी कोस्ट आणि इक्वेडर यांच्यात सामना झाला. दोन्ही संघांनी आघाडीसाठी जोरदार चढाया केल्या पण त्यांना यश मिळत नव्हते. सामनाच्या शेवटी ९० व्या मिनिटाला सामन्यात रोमांच आला. बदली खेळाडू अमाद डायलोने गोल केला. डायलोने डाव्या पायाने मारलेला वेगवान फटका गोलरक्षक हर्नान गॅलिंडेझला रोखता आली.  (Resounding victories for Germany and Sweden)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00