नवी दिल्ली : राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून संसदेच्या दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन तातडीने बोलावण्याची विनंती केली आहे. मंगळवारी काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी अधिवेशनाच्या संदर्भात ‘एक्स’ वर पोस्ट केली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर देशातील एकता प्रतिबिंबीत होण्यासाठी संसदेच्या विशेष अधिवेशनाची आवश्यकता व्यक्त केली आहे. (Parliament session)
पंतप्रधान मोदी यांना पाठवलेल्या पत्रात मल्लिकार्जुन खरगे यांनी लिहिले आहे की, “या क्षणी, एकता आणि अखंडता दाखवण्यासाठी दाखवण्याची वेळ आली आहे. विरोधी पक्षांचा असा विश्वास आहे की संसदेच्या दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन लवकरात लवकर बोलावणे महत्वाचे आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे निष्पाप नागरिकांवर झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याला तोंड देण्यासाठी आमच्या सामूहिक दृढनिश्चयाचे आणि इच्छाशक्तीचे हे एक शक्तिशाली प्रदर्शन असेल. आम्हाला आशा आहे की अधिवेशन त्यानुसार बोलावले जाईल.” (Parliament session)
सोमवारी काँग्रेस अध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला होता. राजस्थानमधील पक्षाच्या रॅलीत बोलताना, खरगे यांनी पहलगाम हल्ल्यावरील सर्वपक्षीय बैठकीला गैरहजर राहिल्याबद्दल त्यांच्यावर टीका केली आणि भाजप देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. “या संकटाच्या काळात, सर्वांना एकत्र लढायचे आहे, परंतु भाजप विष पसरवू इच्छित आहे आणि लोकांमध्ये फूट पाडू इच्छित आहे,” खरगे म्हणाले होते. (Parliament session)
दरम्यान, काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पाकिस्तानशी युद्धासंबधी प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या आणि पहलगाम हल्ल्यातील बळींच्या वृत्तावर शंका उपस्थित करणाऱ्या वक्तव्यांपासून स्वतःला दूर ठेवले आहे. पण काही काँग्रेसच्या नेत्यांनी पहेलगाम प्रश्नांवरुन पाकिस्तानाची युद्ध करण्यासंदर्भात आणि पहेलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. त्यावर बोलताना काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी “काही काँग्रेस नेते माध्यमांशी बोलत आहेत. ते स्वतःसाठी बोलतात आणि काँग्रेसचे विचार त्यांच्या बोलनातून प्रतिबिंबित करत नाहीत,” असे म्हणाले. (Parliament session)
हेही वाचा :
अस्तित्वाला धोका असेल तरच अण्वस्त्रांचा वापर