मुंबई : पहेलगाममधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने तातडीने निर्णय घेत पाकिस्तानला दिलेला संदेश योग्यच आहे. अशावेळी सर्वपक्षीयांनी सरकारच्या पाठीशी राहिले पाहिजे. त्याचवेळी सरकारने घेतलेले निर्णयही तडीस नेले पाहिजे, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी शुक्रवारी (२५ एप्रिल) व्यक्त केली. (Sharad Pawar)
पहेलगाम येथील हल्याबाबत पवार यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. दहशतवाद्यांचे कृत्य घृणास्पद आहे. त्यांनी धर्म विचारून पुरूषांना मारले. या परिस्थितीचे गांभीर्य आता ओळखले पाहिजे. जे लोक धर्माबाबत अधिक बोलतात त्यांनाच सरकार पाठिंबा देते, हे योग्य नाही, असे पवार म्हणाले. (Sharad Pawar)
पहेलगाममध्ये घटनेनंतर केंद्र सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला आमच्या पक्षाकडून लोकसभेतील नेत्या सुप्रिया सुळे यांना पाठवले होते. अशा घटनेच्या पार्श्वभूमीवर सरकार जो निर्णय घेईल त्याला आमचा पाठिंबा असणार आहे. सर्वजण सरकार सोबत आहोत. हा हल्ला आपल्या देशावर झालेला आहे. अशावेळी सरकारला पाठिंबा देणे गरजेचे आहे. पण सरकारनेही पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावे. एखादा निर्णय घेतला तर तडीस नेण्यात यावा, असे आवाहन पवार यांनी केले. (Sharad Pawar)
काही निर्णय विचार करून घ्यायला हवेत
पाकिस्तानवर केंद्र सरकारने काही निर्बंध लादले आहेत, पण ते लादत असताना सरकारने थोडासा विचार केला पाहिजे. भारताची विमानसेवा पाकिस्तानातून जात असताना बंद केली तर त्याचा परिणाम भारतावरच होईल, असे अनेक निर्णय आहेत. असे असले तरी पाकिस्तानलाही एक संदेश जाईल, असेही पवार म्हणाले.
पवार गुरुवारपासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी त्यांनी नांगरतास येथील ऊस संशोधन केंद्राल भेट दिली. त्यानंतर पत्रकार परिषद घेतली.
हेही वाचा :
मोसादचा ‘तो’ अहवाल अन् रशियन प्रोपगंडा!
कुणाल कामरांचा जबाब चेन्नईत जाऊन नोंदवा