Home » Blog » India’s Win : भारताचा सलग दुसरा विजय

India’s Win : भारताचा सलग दुसरा विजय

प्रतिकाच्या ७८ धावा; स्नेह राणाच्या पाच विकेट

by प्रतिनिधी
0 comments
India’s Win

कोलंबो : प्रतिका रावलचे अर्धशतक आणि स्नेह राणाच्या पाच विकेटच्या जोरावर भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेचा १५ धावांनी पराभव केला. तिरंगी वन-डे मालिकेतील भारताचा हा सलग दुसरा विजय आहे. (India’s Win)

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. प्रतिका व स्मृती मानधना या जोडीने सलग दुसऱ्या सामन्यात भारताला अर्धशतकी सलामी दिली. स्मृती ३६ धावांवर बाद झाल्यानंतर प्रतिकाने हरलीनसोबत दुसऱ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी रचून संघाचे दीडशतक धावफलकावर लावले. प्रतिकाने मालिकेतील सलग दुसरे अर्धशतक झळकावताना ९१ चेंडूंमध्ये ७ चौकार व एका षटकारासह ७८ धावांची खेळी केली. प्रतिका व हरलीन बाद झाल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर व जेमिमा रॉड्रिग्ज यांनी संघाचे द्विशतक पूर्ण केले. जेमिमा ४१ धावांवर बाद झाली, तर हरमनप्रीतने ४१ धावांवर नाबाद राहत संघाला पावणेतीनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. (India’s Win)

भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेची कर्णधार लॉरा वॉल्वर्ट व तेन्झिम ब्रिट्स या सलामी जोडीने १४० धावांची भागीदारी रचली. लॉराला ४३ धावांवर बाद करून दीप्ती शर्माने भारताला पहिले यश मिळवून दिले. तेन्झिमने आक्रमक शतक झळकावत १०७ चेंडूंमध्ये १३ चौकार व ३ षटकारांसह १०९ धावा केल्या. ३३ व्या षटकात स्नेह जखमी निवृत्त झाली. आफ्रिकेने ४१ व्या षटकात २०० धावा धावफलकावर लावल्या, तेव्हा ते भारताचे आव्हान सहज पार करतील, असे वाटत होते. ४७.१ षटकात आफ्रिकेने अडीचशे धावा पूर्ण केल्या, तेव्हा त्यांना विजयासाठी १७ चेंडूंमध्ये २७ धावांची आवश्यकता होती. परंतु, या षटकात स्नेहने तीन विकेट घेऊन सामना भारताच्या बाजूने वळवला. अखेर आफ्रिकेचा डाव ४९.२ षटकांत २६१ धावांत आटोपला. स्नेहने ४३ धावांत आफ्रिकेचा निम्मा संघ गारद करत वन-डे कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. (India’s Win)

संक्षिप्त धावफलक : भारत – ५० षटकांत ६ बाद २७६ (प्रतिका रावल ७८, हरमनप्रीत कौर नाबाद ४१, जेमिमा रॉड्रिग्ज ४१, नॉनिकुलेको मालबा २-५५) विजयी विरुद्ध दक्षिण आफ्रिका – ४९.२ षटकांत सर्वबाद २६१ (तॅन्झिम ब्रिट्स १०९, ॲन्मेरी डेर्कसन ३०, सून लुस २८, स्नेह राणा ५-४३, दीप्ती शर्मा १-४०).
हेही वाचा :
वैभवची विक्रमांना गवसणी

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00