नवी दिल्ली : भारत जोडो यात्रेदरम्यान भारतीय सैन्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांच्याविरुद्धच्या कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (४ ऑगस्ट) स्थगिती दिली.(SC SLAMS RAHUL GANDHI)
त्याचवेळी न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती एजी मसीह यांच्या खंडपीठाने राहुल गांधी यांना त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्ल फटकारले. “तुम्ही विरोधी पक्षनेते आहात; तुम्ही सोशल मीडियावर नव्हे तर संसदेत बोला,.” असे सुनावले.
“२००० चौरस किमी जमीन चिनी लोकांनी व्यापली आहे हे तुम्हाला कसे कळते? सच्चा भारतीयाच्या तोंडी असे वक्तव्य शोभत नाही,” असेही खंडपीठाने म्हटले आहे.(SC SLAMS RAHUL GANDHI)
खंडपीठाने उत्तर प्रदेश सरकार आणि या प्रकरणातील तक्रारदाराला नोटीसही बजावली.
२२ डिसेंबर रोजी झालेल्या भारत-चीन संघर्षाबद्दल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भारतीय सैन्याची बदनामी झाली आणि त्यांचे मनोबल खच्ची झाले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. अरुणाचल प्रदेशात चिनी सैन्य भारतीय सैनिकांना “पिळून टाकत” आहे आणि मीडिया त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते.
हेही वाचा :
मोदी, शहांनी घेतली राष्ट्रपतींची भेट
…तर संसदेत गायी सोडू : शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
महत्त्वाच्या नोंदी
Raut in Panvel : स्वातंत्र्याच्या लढाईत भाजप, आरएसएस नव्हते, सर्व कॉम्रेड होते : संजय राऊत
पनवेल : प्रतिनिधी : स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे कोणीच नव्हते, स्वातंत्र्याच्या लढाईत सर्व कॉम्रेड होते, असा निशाना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि आरएसएस वर साधला. शेतकरी कामगार पक्षाच्या ७८ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे प्रमुख पाहणे होते. (Raut in Panvel)
या मेळाव्याला मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, माजी आमदार राजू पाटील , शेकाप सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील देखील मंचावर उपस्थित होते.
खासदार संजय राऊत म्हणाले, आम्ही जयंत पाटील यांच्या कार्यक्रमाला आलो आहोत. ही शेतकरी कामगार पक्षाची पुण्याई आहे, आमच्या वाटेला सतत संघर्ष आला आहेत. सातत्याने कार्यकर्ते लढे देत आले आहेत, तसेच शेतकरी कामगार पक्षाचे नेते एकेकाळी आमचे हिरो होते, त्यांच्याकडून आम्ही राजकारण शिकलो. (Raut in Panvel)
खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली. हा महाराष्ट्र गौतम अदानी आणि अंबानी यांनी निर्माण केला नाही. हा महाराष्ट्र ज्यांनी निर्माण केला त्यामध्ये शेतकरी, गिरणी कामगार आणि हा लाल बावटा सगळ्यात पुढे होता असे राऊत म्हणाले. स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे कोणीच नव्हते, स्वातंत्र्याच्या लढाईत सर्व कॉम्रेड होते. तसेच अख्या रायगड जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी समाज हा महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये होता, म्हणून आताच्या घडीला या महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस यांना भोगता येत आहे, असं राऊत म्हणाले.
संजय राऊत पुढे म्हणाले, देशाच्या कानाकोपऱ्यात मी फिरतो. २५ वर्षे मी दिल्लीमध्ये आहे. तिथे पाहिलं तर जो काम करणारा व्यक्ती आहे तो कॉम्रेड लाल बावटा आहे. नरेंद्र मोदी हे राष्ट्रवादी नाहीत त्यांनी देश अंबानीला विकला, तसेच, देश आणि मुंबई विकली, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले त्यामुळे सगळ्या महाराष्ट्राला आनंद झाला. मराठी माणसासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसह सर्व संघटनांनी एकत्र येत लढा दिला पाहिजे तर या महाराष्ट्राचा विकास नक्की होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (Raut in Panvel)
Sapkal slams CM : फडणवीस सरकार मालेगाव निकालाविरुद्ध अपिल करणार का?: हर्षवर्धन सपकाळ
मुंबई : विशेष प्रतिनिधी : मुंबई रेल्वे साखळी बॉम्बस्फोट व मालेगाव बॉम्बस्फोट या दोन प्रकरणाचा निकाल न्यायालयाने दिला. रेल्वे बॉम्बस्फोटाच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय राज्य सरकारने लगेच जाहीर केला पण मालेगाव प्रश्नी अद्याप सरकारने भूमिका घेतलेली नाही. मालेगाव बॉम्ब स्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्याविरुद्ध फडणवीस सरकार उच्च न्यायालयात जाणार का?,असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला आहे. (Sapkal slams CM)
शिवसेना शिंदे गटाच्यावतीने शनिवारी (२ ऑगस्ट) प्रदेश कार्यालयावर मोर्चा काढला होता. मालेगाव बॉम्बस्फोटात हिंदू संघटनांना गोवल्याच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने केली. (Sapkal slams CM)
त्याला प्रत्युत्तर देताना प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले की, गद्दारसेनेने काँग्रेसला देशभक्तीचे प्रमाणपत्र देण्याची गरज नाही. काँग्रेसचा विचार हा पाकिस्तानचे दोन तुकडे करणारा तर भाजपा व रा. स्व. संघाचा विचार पाकिस्तान निर्मितीला पाठबळ देणारा आहे. स्वातंत्र्याची लढाई सुरु असताना देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाची मोहम्मद अली जिनांच्या मुस्लीम लिगशी युती होती, त्या सरकारमध्ये भाजपा नेते श्यामाप्रसाद मुखर्जी उपमुख्यमंत्री होते, त्यामुळे शिंदेसेनेला मोर्चाच काढायचा तर तो फडणवीसांच्या बंगल्यावर काढावा, असा टोला त्यांनी लगावला. (Sapkal slams CM)
ते म्हणाले की, भाजपाने हा मोर्चा त्यांच्याच सरकारमध्ये असलेल्या एका मंत्र्याच्या घरावर काढायला हवा होता. या मंत्र्याचे भाऊ ‘हू किल्ड करकरे’ पुस्तकाचे लेखक आहेत, या पुस्तकात सर्व गोष्टींचा उहापोह आहेच पण आरएसएसचा थेट संबंध कसा आहे हेही लिहिलेले आहे, त्यामुळे त्यांच्या मोर्चाचे लक्ष्य चुकीचे होते आणि हा मोर्चा काँग्रेस कार्यालयावर आलाच असता तर त्यांना सामोरे जाऊन हे पुस्तकही त्यांना भेट दिले असते, असे सपकाळ म्हणाले.
शहीद आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबद्दल महाराष्ट्राला नितांत आदर आहे, ते शहीद झाले. दरवर्षी २६/११ ला त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालता आणि आता त्यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करता हा भाजपा, देवेंद्र फडणवीस व त्यांच्या बगलबच्यांचा दुटप्पीपणा आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपाच्या लोकांनी शहीद करकरे आणि तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या सर्व मुलाखती पहाव्यात म्हणजे काय ते स्पष्ट होईल. या प्रकरणात चार्जशीट कसे बदलले, या खटल्यासाठी नियुक्त केलेल्या विशेष सरकारी वकील रोहिणी सालियन यांना प्रकरण सौम्य करण्यास कोणी सांगितले होते, या घटनाक्रमाची नीट सांगड घालून पहावे असेही ते म्हणाले.
भारतापासून वेगळ्या पाकिस्तानसाठी आग्रही असणाऱ्या जिन्ना यांच्या मुस्लिम लीगशी संघाची आघाडी होती. श्यामा प्रसाद मुखर्जी हे मुस्लिम लीगच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मोर्चा फडणवीसांच्या घराकडे नेला पाहिजे होता.
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) August 2, 2025
-श्री हर्षवर्धन सपकाळ… pic.twitter.com/bRR43L2SGa
Tejaswi alleges EC : मतदार यादीतून माझेच नाव गायब : तेजस्वी यादव; आयोग म्हणतो…
पाटणा : राष्ट्रीय जनता दल (राजद) नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी शनिवारी (२ ऑगस्ट) भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) १ ऑगस्ट २०२५ रोजी प्रकाशित केलेल्या बिहारच्या ‘मतदार यादीच्या मसुद्यात’ त्यांचे नाव गायब झाले असल्याचा दावा केला. मतदारांचे हक्क हिरावून घेत लोकशाहीची हत्या करण्याचे काम येथे सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला. (Tejaswi alleges EC)
जवळजवळ ६५ लाख मतदार म्हणजे एकूण मतदार संख्येच्या सुमारे साडे आठ टक्के मतदार वगळण्यात आले आहेत. त्यामुळे कुणाची नावे गायब आहेत हे ओळखणे कठीण झाले आहे, असा दावा यादव यांनी पत्रकार परिषदेत केला. (Tejaswi alleges EC)
त्याआधी, श्री यादव यांनी मोठ्या स्क्रीनवर निवडणूक आयोगाच्या अधिकृत साईटवर नाव शोधण्यासंदर्भातील प्रात्यक्षिक दाखवले. त्यांचा EPIC नंबर टाकून कॅप्चा टाकला. त्यावेळी स्क्रीनवर, ‘रेकॉर्ड सापडत नसल्याचा’ मेसेज दिसला.
पाटणा जिल्हा प्रशासनाचे स्पष्टीकरण
यादव यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केल्यानंतर पाटणा जिल्हा प्रशासनाची तारांबळ उडाली. या संदर्भात चौकशी केली असता तेजस्वी यादव यांचे नाव मसुदा मतदार यादीत नोंदलेले असल्याचे ते म्हणाले. (Tejaswi alleges EC)
“सध्या, त्यांचे नाव बिहार पशू विज्ञान विद्यापीठाच्या ग्रंथालय इमारतीतील मतदान केंद्र क्रमांक २०४ वर अनुक्रमांक ४१६ सह सूचीबद्ध आहे. पूर्वी, त्यांचे नाव बिहार पशू विज्ञान विद्यापीठाच्या ग्रंथालय इमारतीतील मतदान केंद्र क्रमांक १७१ वर अनुक्रमांक ४८१ सह नोंदवले गेले होते,” असा खुलासा जिल्हा प्रशासनाने ‘X’वरील पोस्टमध्ये केला आहे.
उपमुख्यमंत्र्यांकडून तेजस्वींच्या दाव्याचे खंडन
दरम्यान, उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते सम्राट चौधरी यांनी त्यांच्या एक्स हँडलवर एक पोस्ट टाकून तेजस्वी यादव यांच्या दाव्याचे खंडन केले. यादव यांच्याकडे मतदार यादीतील नाव कसे शोधावे, याचे ज्ञान नाही, त्यांच्याकडे ‘पात्रतेचा अभाव’ असल्याचा आरोप केला. “तुमचे नाव तुमच्या वडिलांच्या नावासोबत आहे, आदरणीय लालू प्रसाद [राजद सुप्रीमो]. फसवे आणि खोटे दावे करणारे तुमचे दुकान तुम्ही बंद केले तर चांगले होईल,” असा टोला श्री. चौधरी यांनी मारला आहे.
मेरा नाम वोटर लिस्ट में नहीं है। हम चुनाव कैसे लड़ेंगे?
— Office of Tejashwi Yadav (@TejashwiOffice) August 2, 2025
ताज्जुब की बात है!- श्री @yadavtejashwi जी।
{EPIC- RAB2916120} pic.twitter.com/HjxS3rTwHX
Nandani : आणू महादेवीला घरी.. दोन लाख कोल्हापुरकरांनी दिली स्वाक्षरी
कोल्हापूर : प्रतिनिधी : नांदणी येथील स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठातील महादेवी हत्तीणीला पोलीस बंदोबस्तात गुजरातच्या वनतारामध्ये रवाना करण्यात आल्यानंतर आता लाडक्या महादेवीला परत आपल्या घरी आणण्यासाठी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी स्वाक्षरी मोहीम सुरु केली होती. (Nandani)
या मोहिमेत कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल सव्वा दोन लाखहून अधिक नागरिकांनी सहभाग घेत आपली महादेवी नांदणी मठातच राहिली पाहिजे असा संदेश यानिमित्ताने दिला आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी सुरु केलेल्या या स्वाक्षरी मोहिमेला कोल्हापुरकरांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. आज सकाळी ही पत्रे माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी नांदणी येथील मठात महास्वामीजी यांच्या हस्ते स्वाक्षरी केलेल्या या सर्व फॉर्मचे पूजन करण्यासाठी रवाना झाले. (Nandani)
शनिवारी दुपारी एक वाजता रमणमळा पोस्ट ऑफीस येथून हे सर्व फॉर्म भारताचे राष्ट्रपती महामहीम द्रोपदी मूर्म यांना पाठविण्यात येणार आहेत. माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह कार्यकर्ते नांदणी गावात दाखल झाले आहेत या ठिकाणी महा स्वामीजी यांच्या हस्ते पत्रांची पूजन करून पोस्ट कार्यालयाकडे जाणार आहे. नांदणी येथे स्वाक्षरी केलेल्या फॉर्मचे पूजन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी केले. यावेळी दत्त सहकारी साखर कारखाना शिरोळचे अध्यक्ष गणपतराव पाटील, राहूल खंजिरे, जिल्हा परिषद माजी सदस्य शशिकांत खोत, प्रा. महादेव नरके यांच्यासह कार्यकर्ते, नांदणीचे ग्रामस्थ उपस्थित होते. (Nandani)
Kolhapur Circuit Bench : ‘कोल्हापूर खंडपीठ’ साठी नेत्यांनी दिले जनतेला श्रेय
कोल्हापूर : प्रतिनिधी : तब्बल चाळीस वर्षानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूरात होण्याच्या मागणीला यश आल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात आनंदाचे उधान आले आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील पक्षकारांना या निर्णयाने फायदा होणार आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यासह जिल्ह्यातील नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना खंडपीठ निर्मितीचे श्रेय सरन्यायाधीश भूषण गवई आणि जनतेच्या लढ्याला दिले आहे.
जनतेचा लढ्याला यश : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूरात व्हावे अशी या भागातील नागरिकांची ही फार जुनी मागणी होती. अनेक वर्ष हा लढा चालला. सातत्याने ते यासाठी मला भेटायचे. पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो, तेव्हापासून यासाठी पाठपुरावा सुरु केला होता. अखेर त्याला यश आले. मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि गोवा असे तीन खंडपीठ होतेच. त्याला आता या सर्किट बेंचची जोड असणार आहे.
भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई, महाराष्ट्राचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे यांचे अतिशय मनापासून आभार मानतो. न्यायदानाचे कार्य अधिक गतिमान होण्यास यामुळे निश्चितपणे मोठी मदत होईल. शिवाय नागरिकांचा वेळ, श्रम, पैसा याचीही यामुळे बचत होणार आहे. (Kolhapur Circuit Bench)
शाहू छत्रपती मानले सरन्यायाधीश भूषण गवईंचे आभार
कोल्हापूरला मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच होणे ही काळाची गरज होती. त्यासाठी समाजातील सर्व थरातून आंदोलने झाले. सर्वांचे प्रयत्न आज यशस्वी झाले. आजचा दिवस हा आनंदाचा आहे. भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सोबत आमच्या दोन बैठका झाल्या होत्या. या बैठकीतून झालेल्या चर्चेत कोल्हापूरला सर्किट बेंच का होणे आवश्यक आहे यावर आमची चर्चा झाली होती. सरन्यायाधीश गवई देखील याबाबतीत आग्रही होते. त्यांची राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीवर श्रद्धा होती. या श्रद्धेपोटी तसेच कोल्हापूर सह सहा जिल्ह्यातील सर्किट बेंचच्या आवश्यकतेची जाणीव त्यांना होती.
पालकमंत्री आबिटकरांनी मानले जनतेचे आभार
कोल्हापुरात सर्किट बेंचसाठी जनतेच्या लढ्याला अखेर यश आले. आता कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात सर्किट बेंचला मंजूरी मिळाली असून कोल्हापुरात पुढच्या काळात खंडपीठ होण्यासाठीच्या पहिल्या टप्प्याला यश आले आहे. या लढ्यात योगदान दिले आहे त्या जनतेचे आभार मानतो. (Kolhapur Circuit Bench)
न्यायदानाचा मार्ग सुकर होणार : मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूरमध्ये होत आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे. पश्चिम महाराष्ट्रातील लाखो नागरिकांच्या दशकांहून अधिक काळ चाललेल्या संघर्षाला अखेर यश आले आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, न्यायदानाचा मार्ग आता अधिक सुकर होईल, असा विश्वास व्यक्त करतो. पुणे बेंचसाठी कायदे तज्ज्ञांच्या स्थानिक शिष्टमंडळानेही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन मागणी केली आहे. त्यावर मार्ग काढण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले आहे. त्यामुळे त्यासाठीही पाठपुरावा करू, अशी ग्वाही यानिमित्ताने देतो.
सर्किट बेंच” वकिलांच्या एकजुटीचा विजय : आमदार राजेश क्षीरसागर
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांसाठी मे.उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे स्थापन व्हावे, अशी गेली ४० वर्षापासूनची मागणी होती. मंजूर झालेले सर्किट बेंच हा गेली अनेकवर्षे आंदोलने, उपोषणे, निवेदनाद्वारे शासनाचे लक्ष वेधणाऱ्या वकिलांच्या एकजुटीचा विजय असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिले आहे.
कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे हि मागणी रास्त होती. त्यानुसार वकील आणि पक्षकारांनी लढा उभारला होता. या लढ्यामध्ये नेहमीच सहभागी होवून वकिलांच्या या मागणीस पाठींबा दिला आहे. विधिमंडळात विविध आयुधांद्वारे शासनाचे लक्ष वेधणे, मुख्यमंत्री ,उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांची भेट, पत्रव्यवहार आदींमध्ये सातत्याने पाठपुरावा केला आहे. सर्किट बेंच मुळे कोल्हापूरसह सहाही जिल्ह्यातील वकील, पक्षकारांना न्याय मिळणार आहे. हे यश खऱ्या अर्थाने वकिलांच्या एकजूटीचे आहे. (Kolhapur Circuit Bench).
कोल्हापूर व पश्चिम महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी : माजी खासदार संभाजीराजे
आज दिल्ली येथून नागपूरला हवाई प्रवास करत असताना योगायोगाने भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे व माझे विमानातील आसन लगतच होते. यावेळी भेट होताच माननीय सरन्यायाधीश महोदय अत्यंत आनंदाने मला म्हणाले की, “राजे, पहिली आनंदाची बातमी तुम्हालाच देतो, कोल्हापूरचे खंडपीठ… सर्किट बेंच आजच नोटिफाय झालेले आहे.”
अगदी अचानक खुद्द देशाच्या सरन्यायाधीश महोदयांनीच दिलेली ही आनंदवार्ता ऐकून मन क्षणभर स्तिमित झाले. गेल्या अनेक वर्षांचा कोल्हापूर जिल्ह्यातील वकील बांधवांचा खंडपीठासाठीचा सातत्यपूर्ण लढा डोळ्यांसमोर तरळला. मी खासदार असताना केंद्रीय स्तरावर केलेला पाठपुरावा नजरेसमोरून गेला. अखेर या अनेक वर्षांच्या लढ्याला यश आल्याचे समाधानही मिळाले आणि खुद्द सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांकडून ही आनंदवार्ता ऐकायला मिळाली, याचेही मनोमन समाधान व हर्ष वाटला… या खंडपीठासाठी लढा दिलेले वकील बांधव व सर्व कोल्हापूरकर व पश्चिम महाराष्ट्रातील जनता यांचे मन:पूर्वक अभिनंदन !
लंडन : ओव्हल मैदानावर पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी जलदगती गोलंदाजांचे वर्चस्व पहायला मिळाले. पहिल्या दिवशी भारताचे सहा गडी बाद झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अवघ्या वीस धावात भारताचे चार गडी बाद करत इंग्लंडने भारताला २२४ धावांवर रोखले. इंग्लंडने समाधानकारक सुरुवात करुनही उपाहारानंतर भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत इंग्लंडच्या फलंदाजीला वेसन घातले. चहापानानंतर खेळ सुरू झाला तेव्हा इंग्लंडने ८ बाद २४१ धावा केल्या होत्या. (Gus Atkinson)
कालच्या ६ बाद २०४ धावसंख्येवरुन भारतीय संघाने डाव सुरू केला. पण जोश टंगने अर्धशतकवीर करुण नायरला बाद करुन अडथळा बाजूला केला. नायरने आठ चौकारांसह ५७ धावा केल्या. भारतीय संघाकडून सर्वात जास्त धावा करणार फलंदाज नायर ठरला. त्यानंतर गस अटकिन्स माऱ्यासमोर भारताची तळची फळी गारद झाली. अटकिनसने वॉशिगंटन सुंदरला (२६) बाद केले. त्यानंतर महमंद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाला भोपळाही फोडून दिला नाही. आकाश दीप शून्य धावांवर नाबाद राहिला. गस अटकिनसने ३३ धावात पाच गडी बाद केले. जोश टंगने ५७ धावात तीन गडी बाद केले. ख्रिस वोक्सने एक बळी मिळवला. (Gus Atkinson)
इंग्लंडच्या सलामी जोडीने संघाला दमदार सुरुवात करुन दिली. झॅक क्रॉली आणि बेन डकेटने वेगवान गोलंदाजी फोडून काढत पहिल्या गड्यासाठी ९१ धावांची भागीदारी केली. आकाश दीपने बेन डकेटला बाद करत सलामीची जोडी फोडून भारताला पहिले यश मिळवून दिले. यष्टीरक्षक ध्रुव जुरेलने त्याचा झेल घेतला. ३८ चेंडूत ४३ धावा करणार डकेटने पाच चौकार आणि दोन षटकार मारले. त्यानंतर झॅक क्राऊलीने अर्धशतक झळकावले. प्रसिद्ध कृष्णाने त्याला रवींद्र जडेजाकडे झेल देण्यास भाग पाडले. १४ चेंडू सीमापार करत त्याने ५७ चेंडूत ६४ धावांची खेळी केली. इंग्लंडने उपाहारापर्यंत २ बाद १२९ अशी समाधानकारक धावसंख्या उभारली.
उपाहानंतर चहापानापर्यंत भारताची भेदक गोलंदाजी पहायला मिळाली. कर्णधार ओली पोपे याला महम्मद सिराजने इनस्विंगरवर चकवले. तो एलबीडब्लू झाला. त्याने २२ धावा केल्या. त्यानंतर हॅरी ब्रुक जो रुटची जोडी जमली. पण सिराजच्या एका यॉर्करवर जो रुट बाद झाला. त्याने सहा चौकारांच्या सहाय्याने २२ धावा केल्या. दुसरीकडे हॅरि ब्रुकची फटकेबाजी सुरू होती. जोकब बेथेलला (६) सिराजने पायचित पकडले. फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेला जेमी स्मिथ एका बाहेर जाणाऱ्या चेंडूवर चकला. के.एल. राहूलने त्याचा झेल टिपला. चहापानास खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने ७ बाद २१५ धावा केल्या होत्या.
चहापानानंतर गस अटकिन्सला प्रसिद्ध कृष्णाने बाद केले. आकाश दीपने त्याचा झेल टिपला. त्याने ११ धावा केल्या. प्रसिद्ध कृष्णाने चार गडी बाद केले. तर महम्मद सिराजने तीन बळी घेतले होते. शेवटचे वृत्त हाती आली तेव्हा इंग्लंडने ८ बाद २४२ धावा केल्या होत्या. भारतावर इंग्लंडने १८ धावांचे लिड घेतले होते. (Gus Atkinson)
Mahadevi elephant : महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी न्यायालयीन लढाई : पालकमंत्री आबिटकर
कोल्हापूर : प्रतिनिधी : उद्योगपती अनंत अंबानी यांच्या वनतारा वन्यजीव बचाव, पुनर्वसन, संवर्धन केंद्रात कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी येथून नेलेल्या महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी न्यायालयीन लढाई लढावी लागणार आहे. कायदेशीर लढाई लढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्याची गरज असून त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया केली जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात वनताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी व नांदणी मठाधीश यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनंतर पालकमंत्री आबिटकर यांनी ही माहिती दिली. (Mahadevi elephant)
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील जैन मठातून महादेवी हत्तीणीला गुजरातमधील वनतारामध्ये नेण्यात आल्यानंतर नांदणीवासियांसोबत कोल्हापूर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. वनतारातून महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी मोहीम सुरू झाली आहे. बायकॉट जिओ, एक लाख सह्यांची मोहिम, नांदणी ते कोल्हापूर ४५ किलो मीटरची पदयात्रा अशा मोहिमा सुरू झाल्या आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन महायुतीतील खासदार धैयर्शिल माने, धनंजय महाडिक यांनी वनताराशी संपर्क साधला. शुक्रवारी वनताराची टीम आज कोल्हापूरात खास विमानाने कोल्हापुरात दाखल झाली. ही टीम नांदणीला जैन मठाधीशांना भेटण्यासाठी जाणार होती. पण कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने या टीमला नांदणीला जाण्यासाठी परवानगी नाकारली. (Mahadevi elephant)
त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात वनताराची टीम आणि नांदणी मठाचे जैन महास्वामी यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीतून जैन महास्वामी तडकाफडकी बाहेर पडले. माध्यमांशी बोलायला महास्वामींनी नकार दिला.
बैठकीनंतर पालकमंत्री आबिटकर यांनी माहिती दिली. नांदणी मठाने सर्व कायदेशीर बाबी पूर्ण कराव्यात. वनतारा त्यासाठी सर्व सहकार्य करेल, असे वनताराच्या सीईओंनी स्पष्ट केले. जर न्यायालयाच्या सूचना आल्या तर आम्ही त्यापद्धतीने कार्यवाही करु. आमचा या प्रकरणाशी संबध नाही असे वनताराच्या सीईओंनी म्हटल्याचे आबिटकरांनी माहिती दिली. (Mahadevi elephant)
Rahul attacks EC: निवडणूक आयोग भाजपसाठी ‘मत चोरी’ करतो : राहुल गांधी
नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी (१ ऑगस्ट) देशाच्या निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. (Rahul attacks EC)
आम्हाला जे सापडले आहे तो एक ‘अणुबॉम्ब’ आहे; निवडणूक आयोग भाजपसाठी ‘मत चोरी’ करत असल्याचे १००% पुरावे आमच्याकडे आहेत, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. (Rahul attacks EC)
निवडणूक आयोग भाजपसाठी मत चोरीचा मार्ग अवलंबत आहे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले.
भारतीय निवडणूक आयोगावर (ECI) भाजपसाठी मत चोरीचा आरोप करत, राहुल गांधी यांनी दावा केला की त्यांनी आम्ही जे शोधले आहे तो ‘एक अणुबॉम्ब आहे, त्याचा स्फोट झाल्यावर आयोग गायब होईल, हे तुम्ही एकदा पहालच.’’
संसद संकुलात पत्रकारांशी बोलताना श्री. गांधी म्हणाले की, सुरूवातीला मध्य प्रदेशात आणि त्यानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आम्हाला संशय आला होता. त्यानंतर महाराष्ट्रात, काँग्रेसने हा मुद्दा हाताळत एक पाऊल पुढे टाकले आणि राज्य पातळीवर त्याची चौकशी केली.
‘हे उघड सत्य आहे. निवडणूक आयोग भाजपसाठी मतदान चोरीचा मार्ग अवलंबत आहे,’’ असे गांधी म्हणाले. (Rahul attacks EC)
इंडिया आघाडीच्या नेत्यानी लोकसभ अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन बिहारमधील विशेष सखोल पुनरावलोकन कार्यक्रमावर चर्चा करण्याची मागणी करावी, असे पत्र दिले. त्यानंतर राहुल गांधी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर हल्ला चढविला आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांनी केलेले आरोप निराधार असल्याचे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिले आहे. तसेच त्यांच्या या ‘निराधार आरोपांकडे दुर्लक्ष करा,’ असे म्हटले आहे.
वोट चोरी करने वाले याद रखें- बख्शा नहीं जाएगा pic.twitter.com/SkFiZt7M08
— Congress (@INCIndia) August 1, 2025
SC warns Himachal Govt: …अख्खा हिमाचल नकाशावरून नाहीसा होईल : सुप्रिम कोर्ट
नवी दिल्ली : हिमाचल प्रदेश राज्यातील पर्यावरणीय असंतुलनाबद्दल चिंता व्यक्त करताना, अनिर्बंध विकास असाच सुरू राहिला तर संपूर्ण राज्य देशाच्या नकाशावरून नाहीसे होईल, असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिला. (SC warns Himachal Govt)
पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील भागात पर्यावरणाची किंमत मोजून महसूल निर्माण करणे हे सरकारचे प्राथमिक उद्दिष्ट असू नये, असे निरीक्षणही सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले.
न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावली आणि या प्रदेशातील बिघडत्या पर्यावरणीय परिस्थितीला तोंड देण्यासाठी सरकारने काय पावले उचलली याची माहिती चार आठवड्यांच्या आत सादर करण्याचे निर्देश दिले.(SC warns Himachal Govt)
असंबंधित कारणांसाठी हरित कर निधीचे वळण रोखण्यासाठी योग्य देखरेख आवश्यक आहे हे लक्षात घेता,
“आम्ही राज्य सरकार आणि भारत केंद्राला हे पटवून देऊ इच्छितो की महसूल मिळवणे हे सर्वस्व नाही. पर्यावरण आणि पर्यावरणाची किंमत मोजून महसूल मिळवता येत नाही. हा प्रकार असाच सुरू राहिल्या तर अख्खा हिमाचल देशाच्या नकाशवरून एक दिवस गायब होईल, तो दिवस दूर नाही,” असे न्यायालयाने म्हटले आहे.
“आज आपण फक्त एवढेच सांगू इच्छितो की, हिमाचल प्रदेश राज्याने आपण जे पाहिले आहे त्याकडे लक्ष देण्याची आणि योग्य दिशेने लवकरात लवकर आवश्यक ती कारवाई करण्याची वेळ आली आहे. राज्यातील पर्यावरणीय असंतुलन आणखी बिघडू नये आणि नैसर्गिक आपत्ती येऊ नयेत हे पाहण्याची जबाबदारी भारत सरकारची आहे. अर्थातच आतापर्यंत बरेच नुकसान झाले आहे, परंतु ‘‘काहीच नसण्यापेक्षा काहीतरी चांगले आहे’’ अशी एक म्हण आहे, असे न्यायालयाने पुढे म्हटले.(SC warns Himachal Govt)
श्री तारा माता टेकडीवरील हॉटेल बांधकाम करता येणार नाही, अशी अधिसूचना राज्य सरकारने काढली आहे. तसेच हा परिसर ‘ग्रीन एरिया’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. या निर्णयाविरुद्ध मेसर्स प्रिस्टाइन हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड उच्च न्यायालयात गेली होती. कोर्टाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध दाखल केलेल्या अपीलावर निर्णय देताना न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने हे निरीक्षण नोंदवले. या निर्णयामुळे राज्य सरकारने श्री तारा माता टेकडीवरील हॉटेल बांधण्याचा अधिकार नाकारला आणि त्या जागेवर सर्व खाजगी बांधकामांना बंदी घातली.
न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आणि राज्यातील पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी अशी अधिसूचना आणल्याबद्दल राज्याचे कौतुक केले असले तरी, अशा अधिसूचना खूप आधीच लागू करायला हव्या होत्या, कारण राज्यातील पर्यावरणाचे आधीच बरेच नुकसान झाले आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.
न्यायालयाने कुल्लू आणि मनाली येथे अलिकडच्या ढगफुटीच्या घटनांकडे लक्ष वेधले आणि परिणामी दुर्घटनांना बेकायदेशीर वृक्षतोड आणि अनियंत्रित पायाभूत विकासाचे श्रेय दिले. असे निरीक्षण नोंदवले की अशा अनियंत्रित कृतींमुळे मातीची रचना कमकुवत झाली आहे, ज्यामुळे धूप वाढली आहे आणि नैसर्गिक आपत्तींना बळी पडण्याची शक्यता वाढली आहे.