नंदूरबार : एक,दोन, तीन नव्हे तर तब्बल ५१ अल्पवयीन मुलांसह समवयस्क मुलींवर लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी २२ वर्षीय तरुणाला अटक केली. चेतन प्रकाश कोळी असे त्याचे नाव आहे. कोणतीही तक्रार नसताना पोलिसांनी ही कारवाई केली आहे. (Sexual assault on 51 minors)
ब्लॅकमेल करुन लैंगिक अत्याचार
मिळालेल्या माहितीनुसार नंदूरबार शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रायसिंगपुरा भागात राहणाऱ्या २२ वर्षीय चेतन कोळी याला पोलिसांनी अटक केली. गेल्या चार वर्षापासून तो अल्पवयीन मुलांना आणि तरुणांना हेरुन त्यांच्याशी जवळीक साधत होता. या मुलांना पैशांचे अमिष दाखवून, अश्लील व्हिडिओ आणि फोटोंचा वापर करुन अल्पवयीन मुलांना आणि तरुणांना ब्लॅकमेल करुन वारंवार लैगिंक अत्याचार करत असल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. (Sexual assault on 51 minors)
मोबाईलमध्ये ३०० क्लिप्स सापडल्या.
चेतन कोळी यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता, पॉक्सो कायदा, बाल न्याय कायद्यानुसार विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. संशयित कोळीने आणखी किती जणांचे लैगिंक शोषण केले आहे? या रॅकेमध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे का? याचा पोलिस तपास करत आहेत. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरुन डिजिटल पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. चेतन कोळी याच्या मोबाईलमध्ये २०० ते ३०० हून अधिक व्हिडिओ क्लिप्स आणि फोटोज सापडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. व्हिडिओच्या आधारे इतर पिडितांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक अमोल देशमुख तपास करत आहे. (Sexual assault on 51 minors)