Home » Blog » Doklam Tourism: डोकलाममध्ये पर्यटन सुरू करणार

Doklam Tourism: डोकलाममध्ये पर्यटन सुरू करणार

by प्रतिनिधी
0 comments
Doklam Tourism

नवी दिल्ली : भारत, चीन आणि भूतानमधील भू-राजकीय तणावाचे केंद्र असलेल्या डोकलाम प्रदेशात आता पर्यटन सुरू करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत सिक्कीम सरकार पर्यटकांसाठी हा परिसर खुला करण्याची योजना आखत आहे. (Doklam Tourism)

२०१७ मध्ये, भारत आणि चीन यांच्यात १६ जून ते २८ ऑगस्ट या कालावधीत डोकलाम येथे ७३ दिवसांचा लष्करी संघर्ष झाला. डोकलाम हा चीन आणि भूतानमधील वादग्रस्त भाग आहे. तो भारताच्या सीमेला लागूनच आहे.

सिक्कीम पर्यटन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सी.एस. राव म्हणाले की, सरकार सैन्याच्या सहकार्याने हा प्रदेश पर्यटकांसाठी खुला करण्याची योजना आखत आहे.

“आम्ही डोकलाम आणि जवळच्या चोला येथे पर्यटक पाठवण्याची योजना आखत आहोत,” राव यांनी या ‘द टेलिग्राफ’ला सांगितले. (Doklam Tourism)

केंद्राच्या रणभूमी पर्यटनाचा एक भाग ही योजना राबविण्यात येणार आहे.

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने यापूर्वी म्हटले होते की, “भारतीय सशस्त्र दलांच्या बलिदानाचे प्रतीक असलेल्या ऐतिहासिक महत्त्वाच्या आणि शौर्याच्या जागा भारतीय नागरिकांसाठी खुल्या करण्यासाठी” हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

 “आम्हाला या ठिकाणी पार्किंग सुविधा, स्वच्छतागृहे आणि प्रतीक्षालय अशा सुविधा द्याव्या लागतील. दोन्ही ठिकाणी सध्या त्याचे काम सुरू आहे,” असे राव म्हणाले, परंतु त्यासाठी किती कालावधी लागेल हे त्यांनी स्पष्ट केले नाही.

भारतीय सैन्य या भागात पायाभूत सुविधाही विकसित करत आहे. (Doklam Tourism)

डोकलाम आणि चोला दोन्ही ठिकाणी चांगू तलाव आणि नाथू-ला ही लोकप्रिय पर्यटनस्थळे पाहून जाता येणार आहे.

भारत-चीन सीमेवरील नाथु-ला येथे भेट देण्याबाबत, सूत्रांनी सांगितले की पर्यटकांना सीमेवर थेट जाण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही परंतु “हवाई दृश्य” ला परवानगी दिली जाऊ शकते.

“अंतिम निर्णय केंद्रीय अधिकारी आणि सैन्याशी सल्लामसलत करून घेतला जाईल,” असे एका सूत्राने सांगितले.

डोकलाम आणि चोला हे लोकप्रिय पर्यटन स्थळ, चांगु सरोवरापासून ३० किमीच्या परिघात आहेत.

“या ठिकाणी पर्यटनाची मोठी क्षमता आहे,” असे सूत्राने सांगितले.

सुत्रांनी सांगितले की, सिक्किम सरकारने पर्यटनाच्या व्यवहार्यता आणि इतर पैलूंचा आढावा घेण्यासाठी भूभागावर मोटारसायकल मोहीम राबवली. या दोन्ही स्थळांमुळे या प्रदेशात पर्यटकांना नवीन स्वारस्य निर्माण होण्याची अपेक्षा आहे. सिक्किममधील गुरुडोंगमार, चांगु आणि नाथु-ला सारखी ठिकाणे मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करतात परंतु डोकलाम आणि चोला येथेही मोठ्या प्रमाणात पर्यटनवृद्धीची क्षमता आहेत, असे एका ट्रॅव्हल एजंटने सांगितले.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00