Home » Blog » Budgujar enter in BJP : सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये प्रवेश

Budgujar enter in BJP : सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये प्रवेश

by प्रतिनिधी
0 comments
Budgujar enter in BJP

मुंबई : शिवसेना उद्धव ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आलेल्या सुधाकर बडगुजर यांनी सोमवारी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. बडगुजर यांच्या प्रवेशाने नाशिकमध्ये महानगरपालिका निवडणूकीत भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शक्तीप्रदर्शन करत बडगुजर यांचा प्रवेश झाला. (Budgujar enter in BJP)

बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनीही जाहीरपणे त्यांच्या प्रवेश विरोध करत मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत माजी आमदार बबन घोलप यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्याने नाशिकमध्ये भाजपची ताकद वाढली आहे. पण त्यांचा प्रवेश होणार आहे की नाही हे माहित नाही असे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी सकाळी सांगितले होते. त्यानंतर दोघेही बडगुजर यांच्या प्रवेशांवेळी उपस्थित होते. (Budgujar enter in BJP)

भाजप प्रवेशानंतर बडगुजर म्हणाले, आज माझा भाजपमध्ये प्रवेश झाला. मी भाजपच्या नेत्यांचे आभार मानतो. कोरोना काळात मी अनेक रक्तदान शिबिरे घेतली. कोणी बाहेर येत नव्हते त्यावेळी मी कोविड सेंटर सुरू केले. पक्षासाठी काम केले. पण माझ्यावर पक्षाने कारवाई केली. ज्या पक्षाने माझा अनादर केला त्यांना आगामी महानगरपालिका निवडणूकीत ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होईल. असेही ते म्हणाले. (Budgujar enter in BJP)

कोण आहेत बडगुजर

बडगुजर यांच्या राजकीय कारकीर्दीला २००७ मध्ये सुरुवात झाली. ते अपक्ष आमदार होते. त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. २००८ मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. २००९ ते २०१२ या काळात ते नाशिक महानगरपालिका सभागृह नेते होते. २०१२ ते २०१५ या काळात बडगुजर नाशिक महानगरपालिकेत विरोधी पक्षनेते होते.

ते खासदार संजय राऊत यांचे ते विश्वासू होते. २०१४ ते २०१९ च्या निवडणूकीत त्यांनी नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली. पण दोन्ही निवडणूकीत त्यांचा पराभव झाला. (Budgujar enter in BJP)

सलीम कुत्ता बरोबर पार्टी

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता यांच्यासमवेत एका फॉर्महाऊसमध्ये बडगुजर यांनी पार्टी केली होती. या पार्टीचा व्हिडोओ बाहेर आल्यावर भाजपने त्यांच्याविरोधात रान उठवले होते. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी त्यांच्या व्हिडिओची क्लिप मुख्यमंत्री फडणवीस यांना सादर केली होती. मंत्री दादा भुसे यांनीही विधानसभेत बडगुजर यांच्याविरोधात आवाज उठवला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशीचे आदेश दिले होते. त्याच बडगुजर यांचा आज भाजपमध्ये प्रवेश झाला. त्यांच्या प्रवेशाला भाजपच्या काही नेत्यांचा विरोध होता. मंत्री गिरीष महाजन यांनी बडगुजर यांच्या प्रवेशासाठी प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00