Home » Blog » Gold from crash side: विमान दुर्घटनेच्या ठिकाणी सापडले ७० तोळे दागिने

Gold from crash side: विमान दुर्घटनेच्या ठिकाणी सापडले ७० तोळे दागिने

by प्रतिनिधी
0 comments
gold from crash side

गांधीनगर : प्रचंड स्फोटानंतर मोठी आग लागली होती. सगळेकडे आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट… आरडाओरडा सुरू होता. अपघातस्थळी पाचच मिनिटांत पोहोचलो. स्ट्रेचर नव्हतेच. चादरी आणि साड्यांमध्ये जखमींना घातले आणि रुग्णवाहिकेतून रवाना केले. नंतर आम्ही प्रवाशांचे साहित्य एकत्र करायला सुरूवात केली. मौल्यवान दागिने, पुस्तके आणि रोख रक्कमही होती. जवळपास ७० तोळे सोन्याचे दागिने आम्हाला सापडले. ते सर्व तपासअधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. (gold from crash side)

बांधकाम व्यावसायिक राजू पटेल (वय ५६) ही माहिती सांगत होते. बी जे मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर विमान कोसळल्याची बातमी समजताच काही मिनिटांच्या अंतरावर असलेले राजू पटेल त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धावले. अपघातानंतर पाच मिनिटांतच ते पोहोचले.

सर्वत्र गोंधळ उडाला होता, दाट धुराचे लोट, ज्वाला वाढत होत्या आणि मदतीसाठी लोक ओरडत होते. आग आणि विध्वंस. पटेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जखमींना हलवण्यास मदत केली. नंतर सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि कागदपत्रे शोधण्याचे काम हाती घेतले. ते नंतर त्यांनी तपास अधिकाऱ्यांना दिले.

‘‘पहिल्या १५ ते २० मिनिटांपर्यंत आम्ही जवळ पोहोचू शकलो नाही. आग खूप भीषण होती. पण पहिली अग्निशमन दलाची गाडी आली आणि त्यानंतर १०८ रुग्णवाहिका आल्यावर आम्ही मदतीसाठी धावलो,’’ असे पटेल यांनी सांगितले. स्ट्रेचर नव्हतेच. जखमींना रुग्णवाहिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी साड्या आणि चादरी वापरल्या. (gold from crash side)

दुपारी ४ वाजेपर्यंत बचावकार्य जवळजवळ पूर्ण झाल्यानंतर पटेल आणि त्यांची टीम आणखी एका महत्त्वाच्या कामाकडे वळली. त्यांनी सर्वत्र पसरलेल्या जळालेल्या पिशव्यां तपासायला सुरुवात केली. ‘‘आम्हाला सोन्याच्या बांगड्या आणि इतर दागिन्यांसह बॉक्समध्ये ७० तोळे सोन्याचे दागिने सापडले. आम्हाला बॅगमधून ८०,००० रुपये रोख, भगवद्गीतेची प्रत आणि पासपोर्ट देखील सापडले,’’ असे त्यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना सांगितले.

अधिकाऱ्यांनी त्यांना त्या संध्याकाळी ९ वाजेपर्यंत घटनास्थळी काम सुरू ठेवण्याची परवानगी दिली. ‘‘आम्ही काहीतरी करू शकलो याचे आम्हाला समाधान आहे, त्याबद्दल आम्ही आभार मानतो,’’ असे त्यांनी सांगितले. (gold from crash side)

रविवारी, गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी सांगितले की, या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वस्तू गोळा केल्या जात आहेत, त्यांचे दस्तऐवजीकरण केले जात आहे आणि त्या अपघातात मृतांच्या नातेवाईकांना परत केल्या जातील. पटेल यांनी २००८ च्या अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोटातही स्वयंसेवक म्हणून काम केले आहे. ते सांगतात की, ही त्यांनी पाहिलेली सर्वात विनाशकारी घटना होती. ‘‘मी सिव्हिल हॉस्पिटलपासून फक्त १०० मीटर अंतरावर होतो तेव्हा बॉम्बस्फोट झाला आणि अनेक लोकांचा मृत्यू झाला. तथापि, त्यामुळे झालेला विनाश, आग आणि नुकसान मी कधीही विसरणार नाही,’’ असे ते म्हणाले.

हेही वाचा :
एअर इंडियाकडून पॅरिसला जाणारे विमान रद्द

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00