Home » Blog » blood-sucking flies : रक्त शोषणाऱ्या माशांच्या २३ प्रजातींचा शोध

blood-sucking flies : रक्त शोषणाऱ्या माशांच्या २३ प्रजातींचा शोध

भारतात प्रथमच आढळल्या १३ प्रजाती

by प्रतिनिधी
0 comments
blood-sucking flies

कोलकात्ता : भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण विभागाने (ZSI) अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये केलेल्या संशोधनात रक्त शोषणाऱ्या माशांच्या २३ प्रजाती आढळल्या आहेत. त्यांपैकी १३ प्रजाती भारतात पहिल्यांदाच आढळल्या आहेत. क्युलिकोइड्स वंशातील या माशांच्या शोधाने महत्त्वाचा अभ्यास पुढे आला आहे. (blood-sucking flies)

प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय जर्नल ‘पॅरासाइट्स अँड व्हेक्टर्स’मध्ये नुकतेच या संशोधनाचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहे. या द्वीपसमूहातील या कीटकांचे हे पहिले व्यापक सर्वेक्षण मानले गेले आहे.

स्थानिक पातळीवर ‘भुसी माशी’ म्हणून हे कीटक ओळखले जातात. हे लहान कीटक दिसायला माश्यासारखेच असले तरी त्यांच्या आहाराच्या सवयींचे साधर्म्य डासांशी अधिक जवळचे आहेत. ते प्रामुख्याने शेळ्या, मेंढ्या आणि गुरेढोरे तसेच हरणांसारख्या प्राण्यांचे रक्त शोषतात. विशेष चिंतेची बाब म्हणजे ब्लू टंग रोग विषाणूंचा प्रसार यातील पाच प्रजातींच्या माशा चावण्यामुळे होतो. पशुधनासाठी ते अत्यंत घातक ठरू शकते. पर्यायाने पशुपालन क्षेत्राचे लक्षणीय आर्थिक नुकसान होते. (blood-sucking flies)

‘झेडएसआय’च्या संचालक डॉ. धृती बॅनर्जी यांनी या शोधाचे महत्त्व अधोरेखित केले. ‘एक प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून विचार करता येथील बहुविध क्युलिकोइड माशांची प्रजाती, विशेषत: ब्लू टंग व्हायरसच्या प्रसारासाठी जबाबदार असलेल्या माशांच्या प्रजातीवर योग्य नियंत्रण आणि उपाय आवश्यक आहेत. त नियमीत निरीक्षण आणि संशोधन होणे गरजेचे आहे. कारण प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून अंदमान-निकोबारचे महत्त्व लक्षात घेता त्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे,’ असे त्या म्हणाल्या. (blood-sucking flies)

२०२२ आणि २०२३ मध्ये हा अभ्यास करण्यात आला. या २३ प्रजातींपैकी १७ प्रजाती मानवांना चावतात, तथापि आतापर्यंत कोणत्याही मानवी रोगाचा प्रसार झाला नाही, याकडे संशोधकांनी लक्ष वेधले.

रोगाच्या प्रसारामध्ये या कीटकांची भूमिका समजून घेण्यासाठी संपूर्ण द्वीपसमूहाचे पद्धतशीर सर्वेक्षण करणे आवश्यक असल्याची गरज ‘झेडएसआय’चे प्रभारी अधिकारी डॉ. अतनु नस्कर यांनी व्यक्त केली.

अभ्यासात सहभागी असलेल्या संशोधकांपैकी एक वरिष्ठ संशोधन सहकारी कौस्तव मुखर्जी यांनी नमूद केले की, बेटांमधील अनेक भाग अद्याप शोधलेले नाहीत. ‘आमचे सर्वेक्षण पुढे सुरू राहणार आहे. यादरम्यान आणखी क्युलिकोइड प्रजाती मिळतील, अशी अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त, आम्ही या माशांची संख्या आणि अनुवांशिकतेवर अभ्यास करत आहोत,’ असे ते म्हणाले. (blood-sucking flies)

अंदमान, निकोबारमधील पर्यटन आणि देशाच्या इतर भागातील पशुधनाचा विचार करता नव्याने शोध लागलेल्या या माशांच्या पैदासीवर लक्ष ठेवणे आणि नियंत्रण ठेवण्याची गरज हे संशोधन अधोरेखित करते.

हेही वाचा :

युद्धभूमीचे पर्यटन घडणार

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00