Home » Blog » All party meet : सुरक्षा यंत्रणेत त्रुटी असल्याची कबुली

All party meet : सुरक्षा यंत्रणेत त्रुटी असल्याची कबुली

by प्रतिनिधी
0 comments
All party meet

नवी दिल्ली : प्रतिनिधी : जम्मू काश्मीरमधील पहेलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा अंदाज घेण्यात आम्ही अपयशी ठरलो. तसेच सुरक्षा यंत्रणेत त्रुटी होत्या हेही गृह मंत्रालय आणि गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले. सरंक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विरोधी पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत अधिकाऱ्यांनी आयबी गुप्तचर विभाग आणि गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी पहेलगाम दहशतवादी हल्ल्याची माहिती दिली. बैठकीला गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर उपस्थित होते. (All party meet)

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारी (२४ एप्रिल) सर्वपक्षीय बैठकीत पहेलगाम दहशतवादी हल्ल्यात सुरक्षा यंत्रणेत त्रुटी असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी मान्य केले. पहेलगाममध्ये दहशतवादी हल्ला करतील, अशी अपेक्षा नव्हती. असा हल्ला होऊ शकतो याचा आम्ही अंदाज बांधला नव्हता, असेही अधिकाऱ्यांनी या बैठकीत सांगितले. (All party meet)

सरंक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत आयबी गुप्तचर विभाग आणि गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी पहेलगाम दहशतवादी हल्ल्याची माहिती दिली, असे संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठक झाल्यानंतर पत्रकारांना सांगितले. सरकारला कोणतीही कारवाई करण्यासाठी विरोधी पक्षांनी पूर्ण पाठिंबा दिला आहे, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कालच स्पष्ट केले आहे. (All party meet)

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या प्रतिनिधींनी बैठकीत सुरक्षेतील त्रुटीचा मुद्दा उपस्थित केला होता. यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी यापूर्वी पहेलगाम आणि अनंतनाग येथे देणाऱ्या पर्यटकांवर कधीही हल्ला केला नव्हता. कारण त्याचा थेट परिणाम जीवितावर होतो, पण हा हल्ला अनपेक्षित होता, असे सूत्रांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सांगितले. (All party meet)

मंत्री रिजिजू म्हणाले की, सर्व पक्षांनी भारताने दहशतवादाविरुद्ध एकत्रितपणे लढावे यावर सहमती दर्शविली आहे. सरकारने घेतलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या उपाययोजनांना पाठिंबा दिला आहे. “भारताने भूतकाळात दहशतवादाविरुद्ध कडक कारवाई केली आहे आणि पुढेही कारवाई करत राहणारच आहे.  सरकारच्या वतीने सर्वपक्षीय बैठकीत यावर चर्चा झाली. दहशतवादाविरुद्धच्या या लढाईत ते सरकारसोबत असल्याचे सांगितले आहे. बैठकीत सकारात्मक चर्चा झाली,” असे ते म्हणाले.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बिहारला गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी या बैठकीचे अध्यक्षपद भूषवायला हवे होते, अशी अपेक्षा व्यक्त केली. संरक्षणमंत्र्यांनी हल्ल्याची आणि कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीने घेतलेल्या निर्णयांची माहिती सहभागींना दिली. गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि त्यांनी त्यांना उदयोन्मुख परिस्थितीची माहिती दिल्याचे सांगितले जाते. (All party meet)

हेही वाचा :

दोन दहशतवाद्याची घरे स्फोटात उद्धवस्त

बाबांचे डोके रक्ताने माखले होते…

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00