Home » Blog » Sentences to death : प्रियकराचा खून; तरुणीला फाशीची शिक्षा

Sentences to death : प्रियकराचा खून; तरुणीला फाशीची शिक्षा

टॉनिकमध्ये घातले होते विष; केरळमधील घटना

by प्रतिनिधी
0 comments
Sentences to death

तिरुवअनंतपूरम : प्रेमसंबंध तोडण्यास नकार देणाऱ्या प्रियकराला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून मारल्याप्रकरणी तिरुवनंतपुरम जिल्हा न्यायालयाने २४ वर्षीय युवती ग्रीष्माला फाशीची शिक्षा सुनावली. या खुनाच्या गुन्ह्यातील पुरावे नष्ट करणाऱ्या तिच्या मामाला तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. न्यायालयाने ही दुर्मिळातील दुर्मिळ केस आहे. जी व्यक्ती तिच्यावर जीवापाड प्रेम करत होती त्याला धोका देण्यात आला. एवढेच नव्हे; तर त्याचा खून करण्यासारखे निर्दयी कृत्य केले. या तरुणीच्या कृतीतून समाजात चांगला संदेश गेला नाही, असे मतही कोर्टाने निकाल देताना नोंदवले. (Sentences to death )
ग्रीष्माचा विवाह ठरला होता, पण बॉयफ्रेंडपासून सुटका मिळवण्यासाठी तिने त्याला ठार मारले. ग्रीष्माच्या वकिलांनी युक्तिवाद करताना, ती शिकलेली आहे. ती एकुलती आहे. तिची कसलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. त्यामुळे तिची शिक्षा कमी व्हावी, अशी विनंती केली. मात्र कोर्टाने ती फेटाळली.
न्यायालयाने ५८६ पानी निकालपत्र दिले. कोर्टाने म्हटले की, हा गुन्हा अतिशय गंभीर आहे. आरोपीचे वय आणि अन्य परिस्थिती लक्षात घेण्याची गरज नाही. ग्रीष्माने नियोजनपूर्वक प्रियकर शेरॉन याची हत्या केली. अटक झाल्यानंतर तपास भरकटण्यासाठी तिने आत्महत्येचा प्रयत्न केला.
विशेष सरकारी वकील व्ही. एस. विनित कुमार यांच्या म्हणण्यानुसार, ग्रीष्माचा विवाह नागरकोयल येथील लष्करी जवानासोबत ठरला होता. त्यामुळे ती प्रियकार शेरॉन राजला प्रेमसंबंध तोडायला सांगत होती, पण शेरॉन तयार नव्हता.(Sentences to death )
१४ डिसेंबर २०२२ रोजी ग्रीष्माने शेरॉन राजला कन्याकुमारीतील रामवर्मनचिराई येथील घरात बोलावले. तिथे ग्रीष्माने शेरॉनला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष मिसळून दिले. शेरॉन ग्रीष्माच्या घरातून बाहेर पडला तेव्हा त्यांची तब्येत बिघडली. त्याला उलट्या सुरू झाल्या. घरच्यांनी त्याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. उपचार सुरू असताना ११ दिवसांनी शेरॉनचा मृत्यू झाला. शेरॉन तिरुवनंपुरममधील परसालाचा रहिवाशी होता.
सरकारी वकिल व्हीएस विनित कुमार यांनी सांगितले की, ग्रीष्माने त्याल ठार मारण्याचा आणखी एकदा प्रयत्न केला होता. तिने शेरॉनला ज्यूसमधून पॅरॉसिटामॉल गोळ्या मिसळून दिल्या होत्या. शेरॉनला ज्यूस कडवट लागल्यावर त्याने थुंकून दिला होता.(Sentences to death )
शेरॉनचे वडील जयराज आणि आई प्रिया यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

हेही वाचा :

संजय रॉयला जन्मठेप

 

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00