पटना : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील १२४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ६४.४६ टक्के मतदान झाले आहे. मोठ्या संख्येने मतदान झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएला बहुमत मिळेल असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान ११ नोव्हेंबर रोजी होणार आहे, तर १४ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. (Bihar Voting)
भारतीय निवडणूक आयोगाने सायंकाळी पाच वाजता ६०.१२ टक्के मतदान झाल्याचा दावा केला होता. आज १८ जिल्ह्यामध्ये मतदान झाले. सर्वात जास्त मतदा बेगुसरायामध्ये ६७.३२ टक्के झाले. गोपळगंजमध्ये ६४.९६ टक्के तर मुझफ्फरमध्ये ६४.६३ टक्के मतदान झाले. बिहारची राजधानी पटना जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी ५५.०२ इतकी होती. (Bihar Voting)
बिहारचे उप मुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांना धमकावण्याचा प्रकार झाला. लखीमसराई येथील मतदान केंद्रावर भेट देण्यासाठी गेलेल्या उप मुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांना जमावाने अडवले. त्यांच्या वाहनावर शेण आणि चप्पल फेकले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान सकाळपासून मतदारांमध्ये उत्साह दिसत होता. महिला मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडल्या होत्या. मतदान केंद्राबाहेर मोठ्या रांगा लागल्या होत्या. महिलांच्या खात्यात दहा हजार रुपये बिहार जमा केल्याने महिला मोठ्या संख्येने मतदानांसाठी बाहेर आल्याने त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांना होणार का याकडे लक्ष लागले. विरोधी पक्षांनी बेरोजगारीचा मुद्दा ठळकपणे मांडल्याने त्याचा फायदा विरोधी आघाडीला होण्याची शक्यता वर्तवली आहे. महिलांबरोबर तरुणाईची संख्या लक्षणीय होती. दरम्यान अनेक ठिकाणी मोबाईलवर ओळखपत्र दाखवणाऱ्यांना मतदान करु न दिल्याने अनेक मतदारांना मतदानापासून वंचित रहावे लागले आहे. (Bihar Voting)
बिहारचे मुख्य निवडणूक अधिकारी विनोद गुंज्याल यांनी माहिती दिली. मतदान संपेपर्यंत १४३ तक्रारी प्राप्त झाल्या. त्या सर्व वेळेवर सोडवण्यात आल्या. शिवाय, थेट फोनद्वारे आलेल्या सर्व तक्रारी वेळेवर सोडवण्यात आल्या. बक्सर जिल्ह्यातील ब्रह्मपूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक ५६, फतुहा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक १६५ आणि १६६ आणि लखीसराय जवळील सूर्यगढ येथील मतदान केंद्र क्रमांक १, २ आणि ५ यासह काही मतदान केंद्रांवर बहिष्काराची माहिती देखील प्राप्त झाली. आज संपलेल्या पहिल्या टप्प्यातील मतदानात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मतदान शांततेत आणि सुरळीत पार पडले,”. (Bihar Voting)