Home » Blog » Ayush Mhatre : आयुषने मोडला यशस्वी जैस्वालचा विश्वविक्रम

Ayush Mhatre : आयुषने मोडला यशस्वी जैस्वालचा विश्वविक्रम

‘लिस्ट ए’ स्पर्धेत दीडशतक झळकावणारा सर्वांत युवा खेळाडू

by प्रतिनिधी
0 comments
Ayush Mhatre file photo

मुंबई : मुंबई संघातील उदयोन्मुख खेळाडू आयुष म्हात्रेने ‘लिस्ट ए’ क्रिकेटमध्ये सर्वांत कमी वयात दीडशतक झळकावण्याचा विश्वविक्रम नोंदवला. विजय हजारे ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धेमध्ये नागालँडविरुद्ध खेळताना त्याने हा विक्रम केला. हा विक्रम अगोदर भारताच्याच यशस्वी जैस्वालच्या नावावर होता. (Ayush Mhatre)

अहमदाबादमध्ये रंगलेल्या या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ७ बाद ४०३ धावा केल्या. यामध्ये आयुषचे योगदान १८१ धावांचे होते. त्याने ११७ चेंडूंमध्ये १५ चौकार व ११ षटकारांसह १८१ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान आयुषने आंग्क्रिश रघुवंशीसोबत मुंबईला १५६ धावांची सलामीही दिली. मंगळवारी आयुषचे वय १७ वर्षे १६८ दिवस इतके होते. त्याच्याअगोदर यशस्वीने २०१९ मध्ये १७ वर्षे २९१ दिवस इतके वय असताना मुंबईतर्फे झारखंडविरुद्ध दीडशतकी खेळी केली होती. (Ayush Mhatre)

म्हात्रेने या वर्षी १९ वर्षांखालील आशिया कप स्पर्धेमध्ये ५ सामन्यांत ४४ च्या सरासरीने १७६ धावा केल्या होत्या. २०२६ साली होणाऱ्या १९ वर्षाखालील वर्ल्ड कपसाठी त्याच्याकडे भारतीय संघातील महत्त्वाचा खेळाडू म्हणून पाहिले जात आहे. दरम्यान, मुंबईने नागालँडविरुद्धच्या सामना १८९ धावांनी जिंकला. नागालँडला ५० षटकांत ९ बाद २१४ धावाच करता आल्या. नागालँडतर्फे जगदीश सुचितने ९७ चेंडूंमध्ये ७ चौकार व ४ षटकारांसह सर्वाधिक १०४ धावांची खेळी केली. मुंबईचा हा स्पर्धेतील तिसरा विजय असून गुणतक्त्यात ‘ग्रुप सी’मध्ये मुंबईचा संघ १२ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. (Ayush Mhatre)

हेही वाचा :

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00