कोल्हापूर : प्रतिनिधी : अखिल भारतीय महिला आंतर विद्यापीठ ज्युदो स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या समीक्षा शिवाजी शेलारने ७० किलो वजन गटामध्ये ब्राँझ पदक पटकावले. ती छत्रपती शहाजी कॉलेजची विद्यार्थीनी आहे. (Samiksha Shelar Wins Bronze Medal in University Judo Competition)
भोपाळ येथील सेग युनिव्हर्सिटी येथे झालेल्या साऊथ वेस्ट झोन मध्ये तिने रौप्य पदक प्राप्त केले होते. तिला शिवाजी विदयापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी ,प्रभारी प्र कुलगुरू डॉ.ज्योती जाधव, कुलसचिव डॉ.व्ही.एन शिंदे, क्रीडा संचालक शरद बनसोडे, जुदो प्रशिक्षक डॉ.धनंजय पाटील, प्रा.ज्योती लेंगरे यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले. (Samiksha Shelar Wins Bronze Medal in University Judo Competition)
प्रतिनिधी
प्रतिनिधी
मराठी भाषेतील स्वतंत्र माध्यम. अन्यायग्रस्तांच्या बाजूने पक्षपाती. ज्या घटकांना आवाज नाही, त्यांचा आवाज. सत्तेला प्रश्न विचारण्याबरोबरच विधायक बाबींचा खंबीर पाठपुरावा. संपादकः विजय चोरमारे
अखिल भारतीय विद्यापीठ महिला कुस्ती स्पर्धेत तन्वी मगदूमला सुवर्णपदक
कोल्हापूर : प्रतिनिधी : हरियाणातील कुरुक्षेत्र विद्यापीठ येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिला कुस्ती स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या तन्वी मगदूम हिने ५७ किलो वजन गटात अटीतटीच्या लढतीत सुवर्णपदकपदक पटकावले. तसेच सृष्टी जयवंत भोसले हिने ६५ किलो वजन गटात ब्राँझ पदक मिळवले. (Tanvi Magdum Wins Gold Medal in Wrestling Competition)
विजयी खेळाडूंना शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी व प्रभारी प्र -कुलगुरू प्रा. डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे आणि क्रीडा संचालक प्रा.डॉ. शरद बनसोडे यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच संघाचे प्रशिक्षक डॉ विक्रम नागरे पाटील आणि डॉ प्रताप जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. (Tanvi Magdum Wins Gold Medal in Wrestling Competition)
कोल्हापूर : प्रतिनिधी : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने देण्यात येणा-या राज्यस्तरीय वि. स. खांडेकर आणि जनाबाई पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन लेखक, प्रकाशकांना करण्यात आले आहे. २०२५ या वर्षात प्रसिद्ध झालेली पुस्तके पाठवण्याची मुदत ५ एप्रिल २०२६ आहे. जनाबाई पुरस्कार फक्त कवयित्रींसाठी आहे. ज्या कवयित्रींनी रत्नाकर काव्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठवली आहेत त्यांनी जनाबाई पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याची आवश्यकता नाही. (Call for Book Submissions for the Khandekar and Janabai Awards)
सातारा येथील कवयित्री प्रा. डॉ. रामकली पावसकर यांच्यामार्फत वडिल प्रा. मनोहर कोपर्डे यांच्या स्मरणार्थ वि. स. खांडेकर पुरस्कार आणि आई श्रीमती कमल मनोहर कोपर्ड यांच्या स्मरणार्थ जनाबाई पुरस्कार देण्यात येणार आहे. वि. स. खांडेकर पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून पहिला पुरस्कार संग्राम गायकवाड यांना ‘मनसमझावन’ या कादंबरीसाठी तर दुसरा पुरस्कार अमोल पालेकर यांच्या ‘ऐवज एक स्मृतिबंध ‘ साठी देण्यात आला होता. खांडेकर पुरस्कारासाठी कथा, कादंबरी, ललित आणि आत्मकथन या वाड्.मय प्रकारातील पुस्तके पाठवता येतील. जनाबाई पुरस्काराचे हे दुसरे वर्ष असून पहिला पुरस्कार प्रज्ञा दया पवार यांना ‘ हिल्लोळ हरवून आतबाहेरचा’ या संग्रहासाठी देण्यात आला होता. (Call for Book Submissions for the Khandekar and Janabai Awards)
दोन्ही पुरस्कारांचे स्वरुप प्रत्येकी २५ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र असे आहे. ०१ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकाच्या दोन प्रती पुढील पत्त्यावर दि. ०५ एप्रिल, २०२६ पर्यंत पाठवाव्यातः दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, ६, स्मृती अपार्टमेंट, ए वॉर्ड, बाबूजमाल रोड, कोल्हापूरः ४१६००२ (संपर्कः ९८५०४३३८०७). (Call for Book Submissions for the Khandekar and Janabai Awards)
नवी दिल्ली : डॉलरच्या तुलनेत रुपयांच्या दर घसरणीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. महागाई अटळ असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. एलपीजीच्या तुटवड्यामुळे देश आर्थिक अडचणींचा सामना करत असून केंद्रांच्या पोकळ घोषणांवर त्यांनी टीका केली आहे. चार राज्याच्या विधानसभा निवडणुकीनंतर पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या दरात वाढ होईल असा दावाही त्यांनी केला आहे. एप्रिल महिन्यात पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पाँडेचरी राज्यात विधानसभा निवडणूका होणार आहेत.
राहूल गांधी यांनी ‘एक्स’वर पोस्ट केली असून त्यात म्हटले आहे, डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर होऊन १०० च्या दिशेने जात आहे. त्याचबरोबर औद्योगिक इंधनाच्या किंमतीत वाढ झाली आहे. हे केवळ आकडे नाहीत तर आगामी काळातील महागाईचे स्पष्ट संकेत आहेत. (Fuel prices set to rise after the elections)
सरकार याला ‘सामान्य’ म्हणू शकते. पण वास्तव हे आहे की, उत्पादन आणि वाहतूक महाग होईल. सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना फटका बसेल. दैनंदिन वस्तूंच्या किंमती वाढतील. परदेशी गुंतवणूकदारांचा पैसा वेगाने बाहेर जाईल, ज्यामुळे शेअर बाजारावर अधिक दबाव येईल, असे राहूल गांधी यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. (Fuel prices set to rise after the elections)
दुसऱ्या शब्दात सांगायचे तर प्रत्येक कुटुंबाच्या खिशावर थेट आणि गंभीर परिणाम होणार आहेत. निवडणुकीनंतर पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या किंमतीही वाढतील. मोदी सरकारकडे ना दिशा आहे ना रणनिती. केवळ पोकळ घोषणांचा वर्षाव आहे. सरकार काय म्हणत आहे हा प्रश्न नाही. तर तुमच्या वाट्याला काय उरले आहे हा प्रश्न आहे. असे पोस्ट म्हटले आहे. (Fuel prices set to rise after the elections)
राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा चाकणकरांचा राजीनामा; अन्य नेत्यांवर कारवाई कधी?
मुंबई : प्रतिनिधी : नाशिकाचा भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात याला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर त्याच्या ट्रस्टशी संबधित राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी रात्री राजीनामा दिला. मुख्यमंत्र्याच्या नावाने राजीनाम्याचे पत्र त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना दिले. चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर मंत्रीमंडळातील मंत्री, नेत्यांचाही अशोक खरातशी संबध असल्याने त्यांच्यावर कारवाई कधी होणार? असा प्रश्न विचारला जात आहे. मंत्रीमंडळातील नऊ मंत्र्याचा कॅप्टन खरातच्या गैरकृत्याशी संबध होता असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान पुण्यामध्ये खरात आणि चाकणकरांच्या विरोधात काँग्रेस महिला आघाडीने निदर्शने केली.
कॅप्टन खरात याची चौकशी करण्यासाठी राज्यसरकारने एसआयटी नेमली आहे. पोलिस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली खरात आणि त्याच्या पिलावळीची चौकशी सुरू आहे. ही चौकशी समिती रुपाली चाकणकर आणि अन्य मंत्री, नेत्यांची चौकशी करणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Rupali Chakankar’s Resignation)
काल शुक्रवारी राजीनामा दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधना चाकणकर म्हणाल्या, खरात पती-पत्नीला माझ्या परिवाराने गुरु मानले होते. गुरुपोर्णिमा किंवा महाशिवरात्रीच्या कार्यक्रमांना आम्ही सहकुटुंब जात होतो. पण ही व्यक्ती पुढे जाऊन काय कृत्य करणार आहे किंवा तिचे वैयक्तिक आयुष्य कसं आहे याची आम्हाला सुतराम कल्पना नव्हती. त्यामुळे या प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे व्हावा यासाठी पोलिस महासंचालक आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन पत्र दिले आहे. खरातसोबत माझ्यासारख्या अनेक लोकांचे फोटो आहेत. परंतु एक महिला म्हणून माझ्यावर आरोप करण्यात आले याचे वाईट वाटतंय असेही त्या म्हणाल्या. (Rupali Chakankar’s Resignation)
चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सुनेत्रा पवारांकडे राजीनामा देताना चाकणकर यांची बॉडी लॅग्वेजबाबत दमानिया यांनी भाष्य केले. राजीनाम्याचे पत्र देताना सुनेत्रा पवारांचा चेहरा गंभीर होता तर चाकणकर यांची पोझ मॉडेलिंगसारखी होती अशी टीका केली. (Rupali Chakankar’s Resignation)
जंगलात राहणारे रेजंट हनीइटर पक्षी स्वतःच “गाण्याचे शिक्षक” बनले आणि पाळीव पक्ष्यांना त्यांनी त्यांचे हरवलेले गाणे पुन्हा शिकवले. हे एखाद्या गोष्टीतले वर्णन वाटेल. त्यावर विश्वास बसणार नाही. पण ते खरे आहे. एका नव्या संशोधनात ही गोष्ट आढळून आली आहे.
पूर्वी रेजंट हनीइटर पक्षी ऑस्ट्रेलियाच्या आग्नेय भागातील जंगलांमध्ये मोठ्या थव्यांनी दिसायचे. पण आज हे काळे-पिवळे सुंदर पक्षी अत्यंत संकटात आहेत — फार कमी संख्येने ते उरले आहेत.
गाणेही हरवू लागले.
जसजशी या पक्ष्यांची संख्या कमी झाली, तसतसे त्यांचे खास गाणेही हरवू लागले. नर पक्षी मादीला आकर्षित करण्यासाठी हे गाणे गात असतात. संशोधनातील निष्कर्षानुसार काही तरुण पक्ष्यांनी इतर प्रजातींची गाणी शिकायला सुरुवात केली. काहींनी मूळ गाण्याच्या छोट्या आणि सोप्या आवृत्त्या तयार केल्या. आणि प्राणीसंग्रहालयात जन्मलेले पक्ष्यांना तर आपल्या अशा काही गाण्याची खबरबात नव्हती. ते हे गाणे शिकलेच नाहीत. (When birds themselves become teachers and teach other birds to sing)
वैज्ञानिकांनी या समस्येवर उपाय शोधला आहे. त्यांनी काही अनुभवी पक्ष्यांना “गाण्याचे शिक्षक” बनवले. या पक्ष्यांनी प्राणीसंग्रहालयात वाढलेल्या लहान पक्ष्यांना मूळ गाणे शिकवले. त्यानंतर त्यांना जंगलात सोडण्यात आले. आश्चर्य म्हणजे, या शिकलेल्या पक्ष्यांनी पुढच्या पिढीलाही हे गाणे शिकवायला सुरुवात केली. वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, यासंदर्भात अजून संशोधनाची गरज आहे. पण हा उपक्रम यशस्वी ठरला, तर पक्ष्यांच्या प्रजननात वाढ होईल आणि पुन्हा सर्व पक्षी एकाच सुरात गातील. संशोधक डॅनियल अॅपलबी म्हणतात, “हे पारंपरिक गाणे फक्त सुंदर नाही, तर पक्ष्यांच्या प्रजननासाठी खूप महत्त्वाचे आहे.” (When birds themselves become teachers and teach other birds to sing)
प्राण्यांमध्ये संस्कृती असते
या अभ्यासातून आणखी एक महत्त्वाची गोष्ट समोर आली — प्राण्यांमध्येही “संस्कृती” असते. म्हणजेच काही गोष्टी ते एकमेकांकडून शिकतात. उदाहरणार्थ हे गाणे. त्यामुळे संरक्षणासाठी केवळ संख्या वाढवणे पुरेसे नाही, तर त्यांचे वर्तन आणि सवयीही जपाव्या लागतात. गेल्या शतकात जंगलांची मोठ्या प्रमाणावर तोड झाल्यामुळे या पक्ष्यांची संख्या खूप घटली. आज अंदाजे २५० पक्षीच उरले आहेत, आणि तेही मोठ्या भागात विखुरलेले आहेत. त्यामुळे त्यांचा अभ्यास करणेही खूप कठीण बनले आहे.
संख्या कमी असल्यामुळे तरुण पक्ष्यांना मोठ्यांकडून गाणे शिकण्याची संधीच कमी मिळाली. कैदेतही अशीच समस्या होती — लहान पक्ष्यांना मोठ्या नर पक्ष्यांशी संपर्क कमी मिळत होता. त्यामुळे जेव्हा हे पक्षी जंगलात सोडले गेले, तेव्हा ते अयोग्य आणि अपूर्ण गाणी गात होते, आणि त्यांना जोडीदार मिळणेही कठीण होत होते. म्हणून वैज्ञानिकांनी प्राणीसंग्रहालयातच त्यांना गाणे शिकवण्याचा प्रयोग केला. सुरुवातीला स्पीकरद्वारे रेकॉर्ड केलेले गाणे वाजवले, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. यानंतर त्यांनी दोन अनुभवी जंगली नर पक्ष्यांना “शिक्षक” म्हणून वापरले. जेव्हा लहान पक्षी त्यांच्या जवळ राहू लागले, तेव्हा त्यांनी हळूहळू तेच गाणे गाणे सुरू केले. तीन महिन्यांनंतरच योग्य गाण्याचे पहिले स्वर ऐकू येऊ लागले. (When birds themselves become teachers and teach other birds to sing)
एका शिक्षकाकडे पाच विद्यार्थी
वैज्ञानिकांना असेही आढळले की, एका शिक्षकाकडे जास्तीत जास्त पाचच विद्यार्थी असले पाहिजेत. अशा छोट्या गटात शिकलेले पक्षी अगदी मूळ गाण्यासारखेच गात होते. इतकेच नाही, तर पुढच्या वर्षी हेच शिकलेले पक्षी स्वतः शिक्षक बनले आणि त्यांनी नवीन पिढीला गाणे शिकवले. काही तज्ञांच्या मते, ही पद्धत दीर्घकाळ टिकणारी आहे आणि अनेक पिढ्यांपर्यंत चालू राहू शकते. आता हा कार्यक्रम सुरूच आहे. वैज्ञानिक या पक्ष्यांवर लक्ष ठेवणार आहेत — ते जंगलात कसे टिकतात आणि त्यांचे गाणे इतर पक्ष्यांपर्यंत पोहोचते का, याचे अवलोकन करण्यात येणार आहे. या संशोधनातून हे स्पष्ट झाले की, संकटात असलेल्या प्रजातींचे संरक्षण करताना त्यांच्या “संस्कृती”लाही जपणे आवश्यक आहे.
पतीनेही स्वयंपाकात हातभार लावलाच पाहिजे; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात क्रुरतेच्या कारणास्तवर पतीने घटस्फोट मागितल्याप्रकरणी सुनावणी झाली. या सुनावणीत पत्नीने घरातील कामे जसे स्वयंपाक करणे ही पुरेशा प्रमाणात न करणे यासारखे आरोप क्रुरता ठरत नाहीत असे तोंडी निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे.
न्यायालयाने स्पष्ट केले आहे की काळ बदलला आहे. पतीनेही स्वयंपाक, धुलाई इत्यादी कामामध्ये हातभार लावला पाहिजे, असे न्यायमूर्ती विक्रम नाथ म्हणाले. तुम्ही मोलकरणीशी विवाह करत नाही आहात. तुम्ही जीवनसाथीशी विवाह करत आहात असे न्यायमूर्ती संदीप मेहता म्हणाले. (Husband must also contribute in cooking)
पुढील तारखेला दोन्ही पक्षांना व्यक्तिश: हजर राहण्यास सांगितले आहे. न्यायालयाने दोन्ही पक्षांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला.
या खटल्याची माहिती अशी आहे की घटस्फोटाचा अर्ज दाखल करण्यापूर्वी पती पत्नीचा विवाह २०१७ मध्ये झाला. त्यांना आठ वर्षाचा मुलगा आहे. पती सरकारी शाळेत शिक्षक तर पत्नी प्राध्यापिका आहे. पत्नीची आर्थिक परिस्थिती पतीपेक्षा चांगली आहे पण तिने पोटगीची मागणी केलेली नाही. (Husband must also contribute in cooking)
घटस्फोटाच्या प्रक्रियेनंतर पतीने असा आरोप केला आहे की विवाहानंतर एका आठवड्यात पत्नीचे वागणे बदलले. तिने त्याला वाईट वागणूक देण्यास सुरुवात केली. पत्नीने सासू सासऱ्यांच्याविरुद्ध अश्लील भाषा वापरली. त्यांच्यासाठी जेवण बनवण्यास नकार दिला आहे आणि त्यानंतर त्यांना मुलगा झाला. मुलगा झाल्यावर बारशासाठी त्याला आमंत्रित केले नाही.
पत्नीने दावा केला आहे की पती आणि त्यांच्या कुटुंबियांच्या समंतीने बाळतंपणासाठी माहेरी गेले होते. पती बारश्याला उपस्थित राहिला नाही. तिच्या आईवडिलांकडे रोख रक्कम आणि दागिन्यांची मागणी केला. तिला तिचा पगार देण्यास भाग पाडले असा दावा केला आहे.
कौटुंबिक न्यायालयाने पतीची विनंती मान्य केली आणि क्रुरतेच्या कारणास्तव घटस्फोटासाठी परवानगी दिली. पत्नीने उच्च न्यायालयात अपिल केले. उच्च न्यायालयाने घटस्फोटाचा निर्णय रद्द केला. त्यानंतर पतीने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. (Husband must also contribute in cooking)
बांगलादेशींच्या प्रश्नावर शाह व फडणवीस यांचा राजीनामा मागा : वर्षा गायकवाड
जमीर काझी : मुंबई : मुंबईच्या महापौरांची जबाबदारी वीज, रस्ते, पाणी आणि इतर नागरी सुविधा पुरवण्याची आहे पण त्या सतत बांगलादेशींबद्दल बोलत राहतात. भाजपच्या १२ वर्षांच्या राजवटीनंतरही जर मुंबईत बांगलादेशी असतील, तर तो केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दोष आहे. दोन्ही गृहमंत्री अपयशी ठरले आहेत, त्यामुळे महापौर रितु तावडे यांनी या दोघांचा राजीनामा मागण्याची हिम्मत दाखवावी, असे आव्हान मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी दिले . (Demand the resignations of Shah and Fadnavis)
तावडे यांच्या विधानाचा समाचार घेत त्या म्हणाल्या की,’ १२ वर्षांपासून भाजपाचे सरकार केंद्रात सत्तेत आहे. देश मोदींच्या हातात मजबूत आहे असा दावा भाजपा करते. तर राज्यात फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार आहे. असे असताना बांगलादेशी नागरिकांचा प्रश्न येतोच कसा?. हे बांगलादेशी व रोहिंग्या भारतात आलेच कसे?. असा सवाल वर्षा गायकवाड यांनी केला. (Demand the resignations of Shah and Fadnavis)
वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘अवैध बांग्लादेशी लोक भारतात येतात, चीन आक्रमण करून भारताचा भूभाग बळकावते याचा अर्थ मोदी सरकार काही काम करत नाही. आपल्या सीमा सुरक्षित नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना हा प्रश्न विचारणे संयुक्तिक ठरेल पण महापौर मात्र काँग्रेस पक्षाला दोष देत आहेत. अजून किती दिवस भाजपा स्वतःच्या अपयशाचे खापर काँग्रेस वर फोडणार आहे, अशी विचारणाही त्यांनी केली. (Demand the resignations of Shah and Fadnavis)
जनतेच्या प्रश्नावरून लक्ष वळवण्यासाठी राहुल गांधी यांच्यावर टीका
एलपीजी गॅस ची देशात टंचाई आहे, लोकांना गॅस सिलेंडर साठी रांगा लावाव्या लागतात. हॉटेल व छोटे व्यवसाय गॅस अभावी बंद पडत आहेत. मुंबईतही छोटे व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. गॅस टंचाई व एपस्टीन फाईल वरून देशातील जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपाचे नेते विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर पातळी सोडून टीका करत आहेत. भाजपाच्या नेत्यांनी राहुल यांना कितीही बदनामीचा प्रयत्न केले तरी काँग्रेसला त्याचा काहीही फरक पडत नाही. जनतेच्या प्रश्नावर आम्ही आवाज उठवत राहु. राहुल गांधी यांच्यावर बोलण्याआधी अशा वाचाळवीरांनी आपला इतिहास पहावा. राहुल यांच्यावर बोलण्याची त्यांची लायकी नाही असा टोलाही गायकवाड यांनी लगावला आहे. (Demand the resignations of Shah and Fadnavis)
कॅप्टन खरातचे भक्त असलेले नऊ मंत्र्यांकडून घृणास्पद विधी : संजय राऊत
मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळातील नऊ मंत्री हे कॅप्टन थोरात या भोंदूबाबाचे नियमित भक्त होते. त्यांच्याकडे जाऊन अत्यंत घृणास्पद विधी करत होते, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली.
नाशिकमधील अंकशास्त्रज्ञ कॅप्टन अशोक खरात याला पोलिसांनी बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केली आहे. खरातचे अनेक राजकीय नेत्यांशी संबध होते. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे खरात यांच्याशी संबध असल्याने विरोधी पक्षासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडूनही त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. खरात याच्या कृष्णकृत्यावर टीका करतात खासदार राऊत यांनी टीकास्त्र सोडले. जगात एपस्टीन फाईल्स तर महाराष्ट्रात खरात फाईल्स गाजत आहे अशी टीका केली. खरात प्रकरणाची पाळेमुळे उखडून काढण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या कारवाईबद्दल संजय राऊत यांनी मुख्यमंत्री कौतुकास पात्र आहेत अशी स्तुती केली. (Nine ministers were performing a despicable ritual)
खासदार राऊत म्हणाले, अशोक खरात हा फडणवीसांच्या कॅबिनेटमधील अनेक मंत्र्यांचे गुरुमहाराज आहेत. त्याची चौकशी सुरू आहे. त्याच्या मोबाईलवर अनेक आक्षेपार्ह क्लिप्स सापडल्या आहेत. फडणवीसांच्या मंत्रीमंडळातील अर्धे मंत्री तणावाखाली आहेत. काही लोकांना आयसीयूमध्ये भरती करावं लागलं आहे, अशी माहिती समोर येत आहे. या भोंदूबाबाने पोलिसांना जी माहिती दिली आहे. सध्याच्या मंत्रीमंडळातील नऊ मंत्री या भोंदूबाबाचे नियमित भक्त आहेत. त्याच्याकडे जाऊन अत्यंत घृणास्पद विधी करत होते, अशी टीका केली. (Nine ministers were performing a despicable ritual)
रुपाली चाकणकराबाबत त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, हा विषय फक्त महिला आयोगाच्या अध्यक्षापुरता मर्यादीत नाही. या प्रकरणात काही मंत्री, नेतेही आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षांना जावेच लागेल. त्यांना घालवण्यात मुख्यमंत्री कमी पडले तर ते राज्याचे दुर्देव ठरेल, असेही संजय राऊत म्हणाले. (Nine ministers were performing a despicable ritual)
मुंबई : प्रतिनिधी : इराणने भारताला अनेक वर्षे साथ दिली आहे. इराणला साथ दिली नाही तर भविष्यात भारताला त्रास होईल, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांनी व्यक्त केले. मुंबईतील शिवाजी पार्कवर झालेल्या गुढी पाडवा मेळाव्यात ते बोलत होते. सरकारला प्रश्न विचारु नये म्हणून करमणुकीमध्ये गुंतवून ठेवले आहे या कडे लक्ष वेधत करमणुकीच्या जंजाळातून बाहेर पडण्याचे आवाहनही त्यांनी केले.
राज ठाकरे यांनी आखाती युद्ध, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, ड्रगचा विळखा, महाराष्ट्रावरील कर्ज या विषयावर मते व्यक्त केली. महाराष्ट्राला लाभलेल्या महान व्यक्तीमत्वाची आठवण करुन देत महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी सत्ता घेणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्र घडवण्यासाठी जनेतकडून येणाऱ्या सूचनांसाठी मनसेकडून सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्र नेक्स्ट नवीन वेबसाईटची घोषणा केली. (Raj Thackeray’s support for Iran)
काश्मीर प्रश्नांवर इराणची भारताला साथ
गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन राज ठाकरे यांनी भाषणास सुरूवात केली. महाराष्ट्राला गतवैभव मिळवून देण्यासाठी सत्ता घेणार आहे आहे असा विश्वास व्यक्त केला. आखाती युद्धावर भाष्य करताना भारताने इराणला साथ दिली पाहिजे असे मत व्यक्त केले. इराणकडून भारतात येणारे तेल डॉलरमध्ये न देता भारतीय मुल्यामध्ये रुपयामध्ये देतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. इराणवर झालेल्या हल्यानंतर पंतप्रधानांनी एकही निषेधाचे पत्रक काढायला पाहिजे, असे मत व्यक्त केले. इराणला आपण साथ द्यायला हवी होती. इराण अनेक वर्षे आपल्याला साथ देता होता. काश्मीर प्रश्नांवर आपण साथ देतो होता. इराणला साथ दिली नाही तर भविष्यात आपल्याला त्रास होईल, असेही मत व्यक्त केले. (Raj Thackeray’s support for Iran)
सरकारला प्रश्न विचारु नये म्हणून करमणुकीच्या जाळे
इन्स्टाग्रॅममधून बाहेर पडा असे आवाहन करताना देशात सर्वांना करमणुकीमध्ये गुंतवणूक ठेवले जात ठेवले आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. आयपीएल सुरू आहे. चित्रपट येत आहेत. हाऊसफुल्ल होतायेत. सरकारला प्रश्न विचारु नये यासाठी गुंतवून ठेवले आहे असा आरोपही त्यांनी केला. देश विचित्र व्यवस्थेत अडवले आहेत. करमणुकीच्या गटारगंगेत तुम्ही वाहून जाऊ नका असे आवाहनही त्यांनी केले.
महाराष्टावर ११ लाख कोटीचे कर्ज
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था तीन ट्रिलियनच्या वर नेण्याची घोषणा मुख्यमंत्री करत आहेत पण राज्यावरचे कर्ज ११ लाख कोटीवर गेले आहे याकडे लक्ष वेधताना २०१४ मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात राज्यावरचे कर्ज दोन लाख कोटीपर्यंत होते. १२ वर्षात कर्ज कुठे पोचले आहे या असा सवालही त्यांनी केला.
तीनवेळा कर्जमाफी होऊनही देशात सर्वात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. शहरातील सगळ्या जमिनी जात आहेत. सगळ्या जमिनी अदानी विकत घेत आहे. महाराष्ट्र स्वत: अस्तित्व, भाषा गमावून बसणार आहोत. त्यासाठी सर्वांनी सजग राहण्याचे आवाहनही केले.
गृहखात्याचे वाभाडे
मुख्यमंत्री गृहमंत्री असून सगळीकडे ड्रग विकले जात आहे. शाळांमध्ये ड्रग विकले जात आहे. तरुण तरुणी ड्रगच्या विळख्यात आहेत. महाराष्ट्रात लहान मुले, युवक, युवती बेपत्ता होत आहेत. एनसीआरटीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात साडेचार ते साडेपाच हजार बेपत्ता होत आहेत. त्यांच्या आईवडीलांची स्थिती काय होत असेल असा सवाल राज ठाकरे यांनी करत गृहखात्याचे वाभाडे काढले. (Raj Thackeray’s support for Iran)
महाराष्ट्राची परंपरा सांगताना महाराष्ट्रातील संत, समाजसुधारक, कलाकार, राजकारणी, सहकारातील प्रमुख महनीय व्यक्तींची नामावली वाचून दाखवता बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या कार्याचा गौरव केला. शरद पवारांचे फलोत्पादानातील क्रांतीचा त्यांनी गौरव केला. नवीन महाराष्ट्र घडवण्यासाठी तज्ज्ञांची मते जाणून घेण्यासाठी त्यांनी नवीन वेबसाईटची घोषणा केली. (Raj Thackeray’s support for Iran)