Home » Blog » विटा सांगलीत दोन एसटी बसची समोरासमोर धडक; दोन ठार, १६ जखमी

विटा सांगलीत दोन एसटी बसची समोरासमोर धडक; दोन ठार, १६ जखमी

by प्रतिनिधी
0 comments
Accident involving two ST buses at Vita

सांगली : प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा जवळील रेवणसिद्ध घाटात दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोघां प्रवाशांचा मृत्यू झाला असून १५ ते १५ प्रवासी जखमी झाले आहेत. गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. (Accident involving two ST buses at Vita)

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार एक एसटी विटा येथून भिवाघाटच्या दिशेने जात होती. तर दुसरी बस विजापूरहून मेढ्याकडे निघाली होती. रेवणसिद्ध घाटातील एका वळणावर दोन्ही बसची अमोरासमोर जोरदार धडक झाली. अपघात होताच मोठा आवाज झाला. प्रवाशांच्या किंकाळ्यांनी परिसर हादरुन गेला. (Accident involving two ST buses at Vita)

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक घटनास्थळी धावले त्यांनी प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. पोलिसही घटनास्थळी आले. जखमी प्रवाशांना विटा उपजिल्हा रुग्णालयात आणि काहींना खासगी हॉस्पिटलमध्य उपचारास दाखल करण्यात आले. मयत व्यक्तींची अद्याप ओळख पटलेली नाही. (Accident involving two ST buses at Vita)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!